Irfan Pathan : ‘हे सत्य आहे’, मुंबई हरल्यानंतर इरफान पठाणचा हार्दिक पांड्यावर जिव्हारी लागणारा वार
Irfan Pathan : मुंबई इंडियन्सने यंदाच्या सीजनमध्ये आपल्या चाहत्यांना निराश केलय. मुंबईची प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता जवळपास मावळली आहे. मुंबईच्या टीममध्ये स्टार खेळाडूंचा भरणा आहे. टीम इंडियातून खेळणारे अनेक खेळाडू आहेत. मात्र, तरीही टीमची अशी स्थिती आहे. आता इरफान पठाणने मुंबईच्या पराभवानंतर हार्दिक पांड्यावर जिव्हारी लागणारा वार केला आहे.
यंदाचा आयपीएलचा सीजन मुंबई इंडियन्ससाठी खूपच खराब ठरतोय. काल लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. मागच्या 10 सामन्यातील मुंबई इंडियन्सचा हा सातवा पराभव ठरला. या प्रदर्शनामुळे मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये खेळण्याची शक्यता मावळली असून आता फक्त जर-तर वर गोष्टी अवलंबून असतील. मुंबई इंडियन्सने कामगिरी उंचावण्यासाठी कॅप्टन बदलला. रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याकडे नेतृत्व दिलं. पण टीमची कामगिरी अजूनच ढासळली. आयपीएलचा निम्मा सीजन संपला आहे. आता प्रदर्शन उंचावूनही मुंबई इंडियन्सला फार फायदा होईल अशी स्थिती नाहीय. मैदानावरच्या प्रदर्शनापेक्षापण नेतृत्व बदल, टीममधील अंतर्गत मतभेद, हार्दिक पांड्याला प्रेक्षकांकडून मिळणारी वागणूक यामुळे मुंबई इंडियन्सची टीम जास्त चर्चेत राहिली.
काल लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सला आणखी एक धक्का दिला. पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सकडून फॅन्सना असं प्रदर्शन अपेक्षित नाहीय. मुंबईला काल लखनऊ विरुद्धच्या सामन्यात 20 ओव्हर्समध्ये फक्त 7 बाद 144 धावा करता आल्या. असं नाहीय की, मुंबईने विजयाचे प्रयत्न केले नाहीत, पण काल लखनऊ सुपर जायंट्सने 4 चेंडू आणि 4 विकेट राखून विजय मिळवला. मुंबईचे स्टार प्लेयर रोहित शर्मा (4), सूर्यकुमार यादव (10) आणि कॅप्टन रोहित शर्मा (0) फलंदाजीत फ्लॉप ठरले. परिणामी मुंबईला 150 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. तिघांचा फॉर्म हा टीम इंडियासाठी सुद्धा चिंतेचा विषय ठरणार आहे. कारण आयपीएल 2024 संपल्यानंतर 2 जूनपासून T20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे.
The team mumbai Indians that qualified last year didn’t had Jasprit Bumrah but this season they had his services. Still they are in this situation. Purely because the team wasn’t managed well on the ground. Too many mistakes by their captain Hardik Pandya. It’s the truth.
— Irfan Pathan (@IrfanPathan) April 30, 2024
इरफान पठाण काय म्हणाला?
मुंबई इंडियन्सच्या या सुमार प्रदर्शनानंतर इरफान पठाणने पुन्हा एकदा हार्दिक पांड्यावर निशाणा साधला. इरफान पठाणने संधी मिळेल, तेव्हा हार्दिक पांड्याला लक्ष्य केलय. आताही त्याने हार्दिकच्या जिव्हारी लागणारा वार केलाय. “मागच्यावर्षी जसप्रीत बुमराह टीममध्ये नव्हता, तरी ते प्लेऑफसाठी पात्र ठरले होते. यावेळी जसप्रीत बुमराह टीममध्ये आहे, तरीही अशी स्थिती आहे. कारण मैदानावर टीमला प्रदर्शनाचा स्तर उंचावता आला नाही. हार्दिक पांड्याने बऱ्याच चूका केल्या, हे सत्य आहे” असं इरफान पठाण म्हणाला.