IPL Play Off 2024 : ऋषभची दिल्ली प्लेऑफसाठी ‘या’ दोन टीम्सवर अवलंबून, SRH विरुद्ध इतक्या धावांनी विजय हवाच

IPL Play Off 2024 : दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सला 19 धावांनी हरवलं. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच प्लेऑफच तिकीट पक्क झालं. पण दिल्ली कॅपिटल्सला प्लेऑफसाठी अन्य दोन टीम्सच्या प्रदर्शनावर अवलंबून रहाव लागेल. त्यासाठी SRH विरुद्ध अन्य टीम्सनी इतक्या धावांनी विजय मिळवणं गरजेच आहे.

IPL Play Off 2024 : ऋषभची दिल्ली प्लेऑफसाठी 'या' दोन टीम्सवर अवलंबून, SRH विरुद्ध इतक्या धावांनी विजय हवाच
DC Captain Rishabh PantImage Credit source: PTI
Follow us
| Updated on: May 15, 2024 | 11:47 AM

तुम्ही जर ऋषभ पंतचे फॅन आहात, त्याला प्लेऑफमध्ये खेळताना पहायच आहे, पण यामुळे हैराण आहात की, दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफमध्ये कशी पोहोचणार? तर, तुम्हाला हताश होण्याची गरज नाहीय. हे खरं आहे की दिल्ली कॅपिटल्सचा IPL 2024 च्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग कठीण आहे. पण अशक्य नाहीय. क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे, यात काहीही शक्य आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या बाबतीत असंभव वाटणारी गोष्ट कशी शक्य होईल?

दिल्ली कॅपिटल्सच्या टीमने IPL 2024 च्या ग्रुप स्टेजमध्ये आपले सर्व सामने खेळले आहेत. 14 सामन्यानंतर त्यांचे 14 पॉइंट्स झाले आहेत. सध्या रँकिंगमध्ये ते पाचव्या स्थानावर आहेत. आता पाचमधून टॉप 4 मध्ये एंट्री करण्यासाठी स्वत: काही करु शकत नाहीत. पण दुसऱ्या टीम्स खासकरुन पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्सच्या प्रदर्शनावर अवलंबून रहाव लागेल.

दोन मॅचच्या रिझल्टवर त्यांचं प्लेऑफच तिकीट

पंजाब किंग्स आणि गुजरात टायटन्स आधीच IPL 2024 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेले आहेत. या दोन्ही टीम्सनी सनरायजर्स हैदराबादला हरवलं, तर दिल्ली कॅपिटल्सचा प्लेऑफमध्ये प्रवेश होऊ शकतो. IPL मध्ये ऑरेंज आर्मी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सनरायजर्स हैदराबादचे टीमचे दोन सामने बाकी आहेत. यात एक सामना 16 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध आहे. दुसरा सामना 19 मे रोजी पंजाब किंग्स विरुद्ध आहे. ऋषभ पंतची दिल्लीची टीम स्वत: काही न करता हे सामने फक्त पाहणार आहे. कारण या दोन मॅचच्या रिझल्टवर त्यांचं प्लेऑफच तिकीट अवलंबून आहे.

किती धावांच्या अंतराने विजय हवा?

दिल्ली कॅपिटल्सच्या टीमला प्रार्थना करावी लागेल, SRH विरुद्ध सामन्यात गुजरात आणि पंजाबच्या टीमने पहिली बॅटिंग करावी. दोघांनी प्रथम फलंदाजी करताना 200 धावांचा स्कोर उभा करुन SRH ला हरवलं पाहिजे. दिल्लीसाठी गोष्ट इथेच संपत नाही, गुजरात आणि पंजाब दोघांना सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध कमीत कमी 100 धावांच्या अंतराने विजय मिळवावा लागेल.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.