IPL 2024: रवींद्र जडेजा याचा हवेत जबरदस्त झेल, अंपायरसुद्धा झाला कंफ्यूज

Ravindra Jadeja Flying Catch LSG vs CSK: रवींद्र जडेजा याने घेतलेल्या या झेलवर अंपायर गोंधळला. अंपायर वाटले खाली पडताना जडेजाच्या हातातील चेंडू जमिनीला स्पर्श झाला असेल. मात्र, रिव्यू घेतल्यानंतर जडेजाने चांगला झेल पकडल्याचे स्पष्ट झाले.

IPL 2024: रवींद्र जडेजा याचा हवेत जबरदस्त झेल, अंपायरसुद्धा झाला कंफ्यूज
Ravindra Jadeja Flying Catch
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 9:19 AM

चेन्नई सुपर किंग्सचा खेळाडू रवींद्र जडेजा आपल्या दर्जेदार फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे ओळखला जातो. परंतु मैदानात असताना सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी त्याची ओळख आहे. अनेक वेळा त्याचा फिल्डींगचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. शुक्रवारी त्याने पुन्हा एक जबरदस्त कॅच घेतला. लखनऊ सुपर जायंट्स विरोधातील सामन्यातील या कॅचमुळे अंपायरसुद्धा कंफ्यूज झाला होता. या कॅचचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

के. एल. राहुलचा घेतला झेल

17व्या षटकापर्यंत लखनऊचा संघ भक्कम स्थितीत होता. कर्णधार के. एल. राहुल 52 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 82 धावा केल्यानंतर खेळत होता. यावेळी चेन्नई सुपर किंग्सकडून के. एल. राहुलची विकेट घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मग मथिशा पाथिराना 18 वे षटक टाकण्यासाठी आला. त्याने पहिला चेंडू टाकला तेव्हा के.एल. राहुल याने बॅकवर्ड पॉईंटवर शॉट मारला. परंतु त्या ठिकाणी जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षक रवींद्र जडेजा उभा होता. त्याने चित्यासारखी झेप घेत एका हाताने अप्रतिम कॅच पकडला.

हे सुद्धा वाचा

रिव्यू घेतल्यानंतर झाले स्पष्ट

जडेजाच्या याने घेतलेल्या या झेलवर अंपायर गोंधळला. अंपायर वाटले खाली पडताना जडेजाच्या हातातील चेंडू जमिनीला स्पर्श झाला असेल. मात्र, रिव्यू घेतल्यानंतर जडेजाने चांगला झेल पकडल्याचे स्पष्ट झाले. नियमानुसार, क्षेत्ररक्षक त्याचा हात पडताना जमिनीला स्पर्श केलेला चालतो. परंतु चेंडू त्याच्या हातात राहिला पाहिजे. चेंडू जमिनीला स्पर्श झाला असता तर जडेजाची मेहनत वाया गेली असती.

रवींद्र जडेजा यांच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणामुळे के. एल. राहुल याची धमाकेधार खेळ संपुष्टात आली. त्याला शतकही पूर्ण करता आले नाही. मात्र, राहुल याच्यानंतर संघातील निकोलस पूरन आणि मार्कस स्टॉइनिस यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांनी शानदार फलंदाजी करत आपल्या संघाला 6 चेंडू बाकी असताना 8 विकेट्स राखून नेत्रदीपक विजय मिळवून दिला.  केएलने 82 धावा केल्या. तर क्विंटन डी कॉकने 54 रन्स केल्या. निकोलस पूरन आणि मार्कस स्टोयनिस या जोडीने अनुक्रमे 23 आणि 8 धावा केल्या.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.