RR vs MI Weather Report : राजस्थान-मुंबई सामन्यात पावसाची बॅटिंग? कसं असेल हवामान?
Rajasthan Royals vs Mumbai Indians Weather Forecast : मुंबई इंडियन्स राजस्थान विरुद्ध त्यांच्या होम ग्राउंड सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर येथे खेळणार आहे. मुंबई या सामन्यात राजस्थानचा धुव्वा उडवून गेल्या पराभवाचा वचपा घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

आयपीएलच्या 17 व्या मोसमात आज 22 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात आमनासामना होणार आहे. जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये हा सामना होणार आहे. मुंबई आणि राजस्थान या दोन्ही संघांचा हा या हंगामातील आठवा सामना आहे. राजस्थानने याआधीच्या 7 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. राजस्थान 12 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी आहे. तर आयपीएलच्या इतिहासात 5 वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सला या हंगामात लौकीकाला साजेशी अशी कामगिरी करता आली नाही. मुंबईने 7 पैकी फक्त 3 सामने जिंकले आहेत. मुंबई 6 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये सातव्या स्थानी आहे.
खेळपट्टी कुणासाठी फायदेशीर?
राजस्थान विरुद्ध मुंबई सामन्यानिमित्ताने जयपूरमधील पिच आणि वेदर रिपोर्टबाबत आपण जाणून घेऊयात. आतापर्यंत राजस्थानच्या या होम ग्राउंडमध्ये 17 व्या हंगामात एकूण 4 सामने खेळवण्यात आले आहेत. सवाई मानसिंह स्टेडियममध्ये पहिले बॅटिंग करणाऱ्या टीमने 180 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. जयपूरमध्ये 4 पैकी 2 वेळा विजयी आव्हानाचा पाठलाग करणारी टीम जिंकली आहे. तर 2 संघ 170 पेक्षा अधिक धावा करुनही विजय मिळवण्यात अपयशी ठरली.
हवामान कसं असेल?
एक्युवेदर या वेबसाईटनुसार, जयपूरमध्ये दिवसा तापमान 35 सेल्सियस तर रात्री 25 सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. तर दिवसा पावसाची शक्यता 2 तर रात्री 4 टक्के इतकी आहे.
राजस्थान रॉयल्स टीम : संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, टॉम कोहलर-कॅडमोर, रियान पराग, रोव्हमन पॉवेल, कुणाल सिंग राठोड, रविचंद्रन अश्विन, डोनोवन फरेरा, आवेश खान, ट्रेंट बोल्ट, नांद्रे बर्गर , युझवेंद्र चहल, प्रसिध कृष्णा, नवदीप सैनी, संदीप शर्मा, कुलदीप सेन, आबिद मुश्ताक आणि तनुष कोटियन.
मुंबई इंडियन्स टीम : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, टीम डेव्हिड, इशान किशन, विष्णू विनोद, नेहल वढेरा, सूर्यकुमार यादव, देवाल्ड ब्रेविस, पीयुष चावला, श्रेयस गोपाल, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शम्स मुलानी, रोमॅरियो शेफर्ड, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, जेराल्ड कोएत्झी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर, नुवान तुषारा, नमन धीर, शिवालिक शर्मा, ल्यूक वुड आणि क्वेना माफाका.