मुंबई इंडियन्ससाठी चांगली बातमी, हा बडा खेळाडू आता मैदानात उतरणार
MI vs DC IPL 2024: आयपीएल 2023 मधील 16 सामन्यात सूर्यकुमार यादवे 605 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवने 2012 मध्ये आयपीएल डेब्यू मुंबई इंडियंसकडून केला होता. आयपीएल 2012 मध्ये मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार याला 10.00 लाख रुपयांत घेतले होते.
आयपीएल 2024 मध्ये रोमांच वाढत आहे. चौकार, षटकारांची अतिषबाजी पाहण्यास क्रिकेटप्रेमींना मिळत आहे. परंतु क्रिकेट प्रेमींचे लक्ष असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाला अजून सूर गवसला नाही. मुंबई इंडियन्सचा सलग तिसरा पराभव झाल्यानंतर रविवारी चौथा सामना होत आहे. हार्दिक पांड्या याच्या कर्णधारपदाखाली पहिला विजय मिळवण्यासाठी मुंबईचा संघ आज प्रयत्न करणार आहे. मुंबईच्या संघासाठी चांगली बातमी आली आहे. मुंबईचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव आज खेळणार आहे. सूर्यकुमार यादव आता पूर्ण फिट झाला आहे. यामुळे प्लेइंग इलेवनमध्ये त्याचा समावेश असणार आहे.
सूर्यकुमार यादवकडून अपेक्षा
मुंबई इंडियंस आणि दिल्ली कॅपिटल्सच्या या सामन्यात सर्वाधिक लक्ष मुंबईच्या सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. कारण सूर्यकुमार यादव दुखापतीनंतर आता संघात पुनरागमन करीत आहे. तो नसताना मुंबईने आतापर्यंत खेळलेले तिन्ही सामने गमावले आहेत. सूर्यकुमार यादवच्या आगमनामुळे मुंबईची फलंदाजी मजबूत होणार आहे. सूर्यकुमारच्या आगमनामुळे नमन धीर याला प्लेइंग इलेवनमधून बाहेर केली जाण्याची शक्यता आहे.
सूर्यकुमार यादवची कामगिरी
आयपीएल 2023 मधील 16 सामन्यात सूर्यकुमार यादवे 605 धावा केल्या होत्या. सूर्यकुमार यादवने 2012 मध्ये आयपीएल डेब्यू मुंबई इंडियंसकडून केला होता. आयपीएल 2012 मध्ये मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार याला 10.00 लाख रुपयांत घेतले होते. त्यावेळी तो फक्त एक सामना खेळला होता आणि शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर आयपीएल 2014 मध्ये कोलकाता नाइट राइडर्सने त्याला 70.00 लाख रुपयांत घेतले. त्याने चांगली कामगिरी केली. तो केकेआर संघाचा उपकर्णधारही होता. 2014 ते 2017 दरम्यान तो केकेआरकडून खेळला. त्यानंतर 2018 मध्ये मुंबई इंडियंसने त्याला 3.20 कोटी रुपयांत घेतले. तेव्हापासून आतापर्यंत तो मुंबई इंडियंसकडून खेळत आहे. आता त्याची किंमत 8 कोटी झाली आहे.
Sunday ची तयारी फुल जोरात 💪 ➡️ https://t.co/7h9OYE1ExZ
Catch it all on #MIDaily now, streaming on our website and MI App! 🏏#MumbaiMeriJaan #MumbaiIndians pic.twitter.com/ONMfLLwyB4
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2024
सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये आतापर्यंत 139 सामने खेळला आहे. त्यात 124 डावांमध्ये फलंदाजी केली आहे. 143.32 चा स्ट्राइक रेट आणि 32.17 सरासरीने त्याने 3249 धावा केल्या आहेत. त्यात 1 शतक आहे. त्याचा बेस्ट स्कोर 103* नाबाद राहिला आहे.
मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमारची कामगिरी
- आयपीएल 2018 : 512 धावा
- आयपीएल 2019 : 424 धावा
- आयपीएल 2020 : 480 धावा
- आयपीएल 2023 : 605 धावा