IPL 2024 : लोकसभा निवडणुकीआधीच आयपीएल स्पर्धेच्या तारखा जाहीर! कसं असेल वेळापत्रक जाणून घ्या

आयपीएल स्पर्धेसाठी पूर्ण तयारी झाली आहे. पण गेल्या काही दिवसांपासून तारखांचा घोळ कायम होता. कारण भारतात लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यामुळे स्पर्धेचं आयोजन, सुरक्षा आणि ठिकाणावरून गोंधळ होता. आता बीसीसीआने स्पर्धेच्या तारखा जवळपास निश्चित केल्या आहेत.

IPL 2024 : लोकसभा निवडणुकीआधीच आयपीएल स्पर्धेच्या तारखा जाहीर! कसं असेल वेळापत्रक जाणून घ्या
आयपीएल 2024 स्पर्धेच्या तारखा आल्या समोर! लोकसभेच्या रणधुमाळीत कशी असेल प्लानिंग? जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jan 22, 2024 | 3:40 PM

मुंबई : आयपीएल स्पर्धेच्या 17 व्या पर्वाची जोरदार तयारी सुरु आहे. आयोजनासाठी बीसीसीआयने कंबर कसली आहे. मात्र लोकसभा निवडणुकांचा कालावधी असल्याने तारखांबाबत घोळ होता. स्पर्धेचं आयोजन कसं आणि कधी करावं याबाबत खलबतं सुरु होती. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा संपल्यानंतर लगेचच पाच दिवसानंतर आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. आयपीएल स्पर्धा 22 मार्च ते 26 मे दरम्यान होणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी क्रिकबझला दिली आहे. तर वुमन्स प्रीमियर लीगची सुरुवात 22 फेब्रुवारी ते 17 मार्चदरम्यान होणार आहे. वुमन्स प्रीमियर लीग बंगळुरु आणि दिल्ली या दोन ठिकाणी आयोजित होणार आहे. बीसीसीआय दोन ते तीन दिवसांनी किंवा सोमवारी या तारखांची अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. स्पर्धेचं संपूर्ण आयोजन भारतात होणार असल्याचं बीसीसीआय सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.  लोकसभेच्या निवडणुका ज्या टप्प्यात जिथे असतील तो भाग सोडून इतरत्र आयोजन केलं जाईल.

बीसीसीआयला बहुतांश सर्व क्रिकेट मंडळाकडून खेळाडूंच्या उपलब्धतेबाबत आश्वासन मिळाले आहे. दुसरीकडे, सध्याच्या तारखा पाहता स्पर्धा 26 मे रोजी संपेल. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी अवघ्या 5 दिवसांचा अवधी मिळेल. कारण टी20 वर्ल्डकप स्पर्धा 1 जूनपासून सुरु होमआर आहे. त्यामुळे काही खेळाडू स्पर्धेच्या मध्यातून माघारी परतण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे, बीसीसीआयला निवडणुकांच्या तारखांशी जुळवून घेणं आणि भारतात लीग आयोजित करण्याचं मोठं आव्हान आहे.

आयपीएल 2024 स्पर्धेसाठीचा मिनी लिलाव नुकताच पार पडला. स्पर्धेत दोन बाउंसरची परवानगी असल्याने वेगवान गोलंदाजांचा भाव वधारल्याचं पाहायला मिळाले. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांवर कोट्यवधी रुपयांची उधळण झाली आहे. कोलकाता नाइट रायडर्सने 24.75 कोटी रुपये खर्च करत मिचेल स्टार्कला आपल्या ताफ्यात घेतलं. तर सनरायझर्स हैदराबादने पॅट कमिन्सने 20.50 कोटी रुपये मोजले.

आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्सने पाचवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने दोन वेळा जेतेपद मिळवलं. गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद, डेक्कन चार्जर्स आणि राजस्थान रॉयल्सने प्रत्येकी एकवेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.