IPL 2025 : बीसीसीआयकडून कोलकाता- लखनौ सामन्याच्या तारखेत बदल, 8 एप्रिलला डबल हेडर, नक्की कारण काय?
Ipl 2025 Match No 19 Rescheduled : बीसीसीआयकडून पोलिसांच्या विनंतीनंतर आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 19 व्या सामन्याच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. जाणून घ्या सविस्तर.

आयपीएलच्या 18 व्या मोसामातून मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने एका सामन्याची तारीख बदलली आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात 6 एप्रिलला सामना होणार होता. हा सामना ईडन गार्डनमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र बीसीसीआयने या सामन्याच्या तारखेत बदल केला आहे. बीसीसीआयने केलेल्या बदलानुसार, आता उभयसंघातील हा सामना 2 दिवसांनंतर होणार आहे. केकेआर विरुद्ध लखनौ यांच्यातील सामना 6 ऐवजी 8 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकातून याबाबतची माहिती दिली आहे.
रविवारी एकच सामना, मंगळवारी डबल हेडर
केकेआर विरुद्ध लखनौ सामन्याची तारीख बदलल्याने आता रविवारी 6 एप्रिल रोजी एकच सामना होणार आहे. तर मंगळवारी 8 एप्रिलला डबल हेडर होणार आहे. केकेआर-लखनौ सामना 8 एप्रिलला दुपारी साडे तीन वाजता सुरु होईल. तर संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी पंजाब किंग्स विरुद्ध सीएसके हा नियोजित सामना पार पडेल.
सामन्याची तारीख बदलण्याचं कारण काय?
बीसीसीआयने शुक्रवारी 28 मार्चला केकेआर-लखनौ सामन्याच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला. रविवारी 6 एप्रिल रोजी राम नवमी आहे. राम नवमीच्या पार्श्वभूमीवर कोलकाता पोलिसांनी बंगाल क्रिकेट बोर्डाला केकेआर-लखनौ सामन्याला सुरक्षा पुरवण्यावरुन असमर्थता दर्शवली.
बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, रामनवमीच्या पार्श्वभूमीवर केकेआर-लखनौ सामन्याची तारीख बदलण्यात यावी, अशी विनंती कोलकाता पोलिसांनी केली होती. बीसीसीआयने ही विनंती मान्य केलीय. त्यामुळे या सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. तसेच इतर सामने हे नियोजित वेळापत्रकानुसार होतील, असंही बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.
बीसीसीआयकडून केकेआर-लखनौ सामन्याच्या तारखेत बदल
🚨 News 🚨
Match No. 19 of #TATAIPL 2025 between #KKR and #LSG at Eden Gardens, Kolkata has been rescheduled from Sunday, April 6th to Tuesday, April 8th at 3.30 PM IST.
Read to know more 🔽
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2025
कोलकाता नाईट रायडर्स टीम: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, एनरिच नॉर्खिया, मनीष पांडे, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, लवनीथ सिसोदिया, चेतन साकारिया, रहमानउल्ला गुरबाज, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल आणि मोईन अली.
लखनौ सुपर जायंट्स संघ: अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आरएस हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, आकाश दीप, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी.