IPL 2025 GT vs RR : गुजरातला रोखण्याचं आव्हान, संजू सॅमसनच्या नेतृत्वात राजस्थान ‘हल्ला बोल’ करणार?
Gujarat Titans vs Rajasthan Royals Preview : गुजरात टायटन्सने गेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आता राजस्थानसमोर गुजरातला त्यांच्याच घरात विजयी होण्यापासून रोखण्याचं आव्हान असणार आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 23 व्या सामन्यात बुधवारी 9 मार्चला गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आमनेसामने असणार आहेत. हा सामना गुजरातच्या घरच्या मैदानात अर्थात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. राजस्थान आणि राजस्थान या दोन्ही संघांचा हा या मोसमातील पाचवा सामना आहे. गुजरातच्या तुलनेत राजस्थानने आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे राजस्थानसमोर गुजरातला घरच्या मैदानात रोखण्याचं आव्हान असणार आहे.
गुजरातची या हंगामात पराभवाने सुरुवात झाली. मात्र त्यानंतर गुजरातने शुबमन गिल याच्या नेतृत्वात जबरदस्त कमॅबक केलं. जीटीने त्यानंतर सलग तिन्ही सामने जिंकले. तर दुसऱ्या बाजूला सलग 2 सामने गमावणाऱ्या राजस्थाननेही मुसंडी मारली. राजस्थानने सलग 2 सामने जिंकले. त्यामुळे राजस्थानचा गुजरातला अहमदाबादमध्ये पराभूत करून विजयी चौकार लगावण्यापासून रोखण्याचा प्रयत्नात असणार आहे. राजस्थानने हा सामना जिंकल्यास त्यांचा सलग आणि एकूण तिसरा विजय ठरेल.
पॉइंट्स टेबलमध्ये कोण कुठे?
गुजरात टायटन्स पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर दिल्ली कॅपिट्ल्स पहिल्या स्थानी आहे. दिल्लीने खेळलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवलाय. दिल्ली आतापर्यंत एकमेव अजिंक्य टीम आहे. तर गुजरातने 4 पैकी 3 सामने जिंकले आहेत. गुजरातचा नेट रनरेट हा +1.031 असा आहे. तर राजस्थान रॉयल्स 4 पैकी 2 सामने जिंकलेत आणि तेवढेच गमावले आहेत. राजस्थान 4 गुणांसह 7 व्या स्थानी आहे. राजस्थानचा नेट रनरेट हा 0.185 असा आहे. त्यामुळे राजस्थानला गुजरातविरुद्ध विजय मिळवून पॉइंट्स टेबलमध्ये पुढे सरकण्याची संधी आहे. तर गुजरातचं नंबर 1 होण्याकडे लक्ष असणार आहे. त्यामुळे आता दोघांपैकी कोण विजयी होतो? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
गुजरात टायटन्स टीम: साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), राहुल तेवतिया, शाहरुख खान, अर्शद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा, शेरफेन रदरफोर्ड, ग्लेन फिलिप्स, इशांत शर्मा, अनुज रावत, वॉशिंग्टन सुंदर, महिपाल लोमरोर, जयंत यादव, निशांत सिंधू, कुलवंत खेजरोलिया, करीम जनात, जेराल्ड कोएत्झी, मानव सुथार, कुमार कुशाग्रा आणि गुरनूर ब्रार.
राजस्थान रॉयल्स टीम : यशस्वी जैस्वाल, शुभम दुबे, नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिमरोन हेटमायर, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा, फजलहक फारुकी, संजू सॅमसन (कर्णधार), कुणाल सिंग राठौर, आकाश मढवाल, कुमार कार्तिकेय, क्वेना मफाका, वानिंदू हसरंगा, युधवीर सिंग चरक, अशोक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी.