IPL 2025 LSG vs PBKS Live Streaming : पंजाब सलग दुसर्या विजयासाठी सज्ज, लखनौ रोखणार का?
Lucknow Super Giants vs Punjab Kings Live Streaming: आयपीएल स्पर्धेतील 18 व्या हंगामातील 13 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात लढत होणार आहे. या सामन्याला किती वाजता सुरुवात होणार? जाणून घ्या सर्वकाही.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील (IPL 2025) 13 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) आमनेसामने असणार आहेत. लखनौचा हा या मोसमातील तिसरा तर पंजाबचा दुसरा सामना असणार आहे. पंजाबने श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात या हंगामात विजयी सुरुवात केली. तर लखनौ विजयी सलामी देण्यात अपयशी ठरली. मात्र लखनौने दुसर्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 5 विकेट्सने मात करत विजयाचं खातं उघडलं. त्यामुळे लखनौचा ही विजयी वाटचाल अशीच कायम ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. तर पंजाब सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अशात आता कोणता संघ यशस्वी ठरतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना केव्हा?
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना मंगळवारी 1 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना कुठे?
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनौ येथे आयोजित करण्यात आला आहे.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येईल?
लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहता येईल. तर लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओ हॉटस्टार एपवर पाहायला मिळेल. तसेच टीव्ही9 मराठी वेबसाईटवर सामन्याचे लाईव्ह अपडेट्स जाणून घेता येतील.
लखनौ सुपर जायंट्स संघ: अर्शीन कुलकर्णी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार आणि विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आरएस हंगरगेकर, रवी बिश्नोई, शमर जोसेफ, आकाश दीप, शाहबाज अहमद, मणिमरन सिद्धार्थ, आकाश महाराज सिंग, एडन मार्कराम, आवेश खान, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, आर्यन जुयाल, युवराज चौधरी, मयंक यादव, प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी.
पंजाब किंग्स टीम: जोश इंग्लिस (विकेटकीपर), प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कॅप्टन), ग्लेन मॅक्सवेल, नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, हरप्रीत ब्रार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, विजयकुमार वैशाख, प्रवीण दुबे, लॉकी फर्ग्युसन, झेवियर बार्टलेट, विष्णू विनोद, यश ठाकूर, आरोन हार्डी, अजमतुल्ला ओमरझाई, कुलदीप सेन, प्रियांश आर्य, सूर्यांश शेडगे, हरनूर सिंग, मुशीर खान आणि पायला अविनाश.