IPL 2025 MI vs CSK : पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळणार? कर्णधारावरील बंदीची शिक्षा रद्द
आयपीएलमध्ये मागच्या पर्वात स्लो ओव्हर रेटचा फटका ऋषभ पंतला बसला होता. त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. आता हार्दिक पांड्याही त्या शिक्षेस पात्र ठरला आहे. मागच्या पर्वात स्पर्धेतील मुंबईचं आव्हान संपुष्टात आल्याने यंदाच्या पर्वात त्याला फटका बसला आहे. पण बीसीसीआयने नियम बदलल्याने पहिल्या सामन्यात खेळणार की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेतील मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणार आहे. हा सामना 23 मार्चला होणार असून या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने कर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवलं आहे. कारण मागच्या पर्वात स्लो ओव्हर रेटचा फटका मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला बसला आहे. त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. मात्र स्पर्धेतील आव्हान तेव्हाच संपुष्टात आल्याने ती शिक्षा या पर्वात पूर्ण करावी लागणार आहे. पण बीसीसीआयने आयपीएल 2025 स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच स्लो ओव्हर रेटच्या नियमात बदल केला आहे. आता कर्णधारांवर बंदी घातली जाणार नाही असा कौल दिला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सकडून पहिल्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळणार की नाही? या चर्चांना उधाण आलं आहे. असाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर त्याचं उत्तर ‘नाही’ असं आहे. नियम बदलला असला तरी हार्दिक पांड्या पहिल्या सामन्याला मुकणार आहे.
बीसीसीआयने स्लो ओव्हररेट नियमात आयपीएल 2025 पासून बदल केला आहे. या पर्वात स्लो ओव्हररेटसाठी कोणत्याही कर्णधाराला बंदीची शिक्षा भोगावी लागणार नाही. पण हार्दिक पांड्या मागच्या पर्वात तीन वेळा स्लो ओव्हररेटसाठी दोषी ठरला आहे. त्यामुळे त्याला शिक्षा भोगावी लागणार आहे. पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव संघाचं नेतृत्व करेल. दुसरीकडे, स्लो ओव्हररेटसाठी बीसीसीआयने आयसीसीच्या पावलावर पाऊल ठेवलं आहे. नव्या नियमानुसार, स्लो ओव्हररेटसाठी कर्णधाराला दंड भरावा लागेल आणि डिमेरिट पॉइंट दिले जातील. पण स्लो ओव्हर रेटचं प्रकरण गंभीर असेल तर लेव्हल 2 अंतर 4 डिमेरिट पॉइंट दिले जातील. जर असं झालं तर सामनाधिकारी कर्णधाराची पूर्ण 100 टक्के सामना फी कापणार किंवा अतिरिक्त डिमेरिट पॉइंट देऊ शकतो.
आयपीएल 2025 साठी मुंबई इंडियन्सचा पूर्ण संघ
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, तिलक वर्मा, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, नमन धीर, रॉबिन मिंज, कर्ण शर्मा, रायन रिकेल्टन, दीपक चहर, मुजीब उर रहमान, विल जॅक्स, अश्वनी कुमार, मिचेल सँटनर, रीस टोपले, कृष्णन राजवाजी, कृष्णन राजवासी, कृष्णन राजे, रॉबिन मिंज. जेकब्स, अर्जुन तेंडुलकर, कॉर्बिन बॉश , विघ्नेश पुथूर