MI vs LSG : मुंबई इंडियन्सच्या हातून सामना गेला, कर्णधार हार्दिक पांड्याने पराभवाचं खापर असं फोडलं
आयपीएल 2025 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्सने 12 धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला. हा सामना एक क्षण मुंबई इंडियन्सच्या पारड्यात झुकला होता. पण शार्दुल ठाकुर आणि आवेश खानने विजयी धावा करण्यापासून रोखलं. मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील तिसरा पराभव आहे.

आयपीएल 2025 स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हार्दिक पांड्याने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबई इंडियन्ससारखा तगडा संघ समोर असताना मोठी धावसंख्या असायला हवी याचा अंदाज होता. मिचेल मार्श आणि मार्करम यांनी चांगली सुरुवात करून दिली. मार्शने 31 चेंडूत 60 धावांची खेळी केली. तर एडन मार्करमने 38 चेंडूत 53 धावांची खेळी केली. या दोघांच्या खेळीमुळे लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 8 गडी गमवून 203 धावा केल्या आणि विजयासाठी 204 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने 5 गडी गमवून 191 धावा केल्या आणि 12 धावांनी पराभव झाला. खरं तर 12 चेंडूत 29 धावांची गरज होती. पण शार्दुल ठाकुरने जबरदस्त ओव्हर टाकली आणि फक्त 7 धावा दिल्या. तर शेवटच्या षटकात 22 धावांची गरज असताना फक्त आवेश खानने फक्त 9 धावा दिल्या. हार्दिक पांड्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारून सामन्यात रंगत आणली होती. पण त्यानंतर पाच चेंडू आवेश खानने इतके जबरदस्त टाकले की हार्दिक पांड्या जागेवरच उभा राहिला.
‘खूपच निराशाजनक.. हरल्यानंतर निराशाजनक वाटतो. आम्ही 10-15 धावा या मैदानावर जास्त दिल्या आणि त्याच पराभवाचं कारण ठरलं. फलंदाजीत मी कोणालाही यासाठी जबाबदार धरू शकत नाही.मला वाटते की फलंदाजी युनिट म्हणून आम्ही कमी पडलो. आम्ही एक संघ म्हणून जिंकतो. आम्ही एक संघ म्हणून हरतो. कोणाला जबाबदार धरायचं नाही. जबाबदारी संपूर्ण फलंदाजी युनिटने घ्यावी लागते. मी या पराभवाची जबाबदारी स्वीकरतो.’ तिलक वर्माला रिटायर करून सँटनरला मैदानात पाठवलं यामागचा निर्णय काय होता? यावर हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘आम्हाला काही फटके हवे होते. क्रिकेटमध्ये असे काही दिवस येतात. जेव्हा तुम्ही प्रयत्न करता पण ते बाहेर पडत नाहीत. फक्त चांगले क्रिकेट खेळा. मला ते सोपे ठेवायला आवडते. चांगले निर्णय घ्या. गोलंदाजीत हुशार व्हा. फलंदाजीत संधी घ्या. काही आक्रमकतेसह साधे क्रिकेट खेळा. ही एक लांबलचक स्पर्धा असल्याने काही विजय आणि आपण लयीत येऊ शकतो.’
दोन्ही संघांची प्लेइंग 11
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर/कर्णधार), आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, दिग्वेश सिंग राठी, आकाश दीप, आवेश खान.
मुंबई इंडियन्स (प्लेइंग इलेव्हन): विल जॅक्स, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, राज बावा, मिचेल सँटनर, दीपक चहर, अश्वनी कुमार, विघ्नेश पुथूर, ट्रेंट बोल्ट.