IPL 2025 Points Table: सनरायजर्स हैदराबादला पराभवानंतर तगडा झटका, एक सामना गमावला आणि टॉप 5 मधून आऊट
Ipl 2025 Points Table : आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 7 सामने पूर्ण झाले आहेत. स्पर्धेतील सातवा सामना हा हैदराबाद विरुद्ध लखनौ आमनेसामने होते. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी कोण आहे? जाणून घ्या.

आयपीएलच्या 18 व्या मोसमात गुरुवारी 27 मार्चला 7 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने सनरायजर्स हैदराबादवर 5 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. हैदराबादला पराभवांनतर मोठा झटका लागला आहे. हैदराबाद एका पराभवासह थेट टॉप 5 मधून बाहेर गेली आहे. तसेच पराभवामुळे हैदराबादच्या नेट रनरेटवरही परिणाम झाला आहे. हैदराबादचा नेट रनरेट हा मायनस झाला आहे. तर लखनौला पहिल्या विजयानंतर मोठा फायदा झालाय. लखनऊने पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. लखनौने 2 सामने खेळल्यानंतर विजयाचं खातं उघडलं. मात्र लखनौचं विजयानंतर नेट रनरेटमध्ये सुधारणा झाली आहे. या सातव्या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलमध्ये कोणता संघ कोणच्या स्थानी आहे? हे जाणून घेऊयात.
लखनौला फायदा, नंबर 1कोण?
ताज्या आकडेवारीनुसार, पॉइंट्स टेबलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पहिल्या स्थानी आहे. आरसीबीने या हंगामात विजयी सुरुवात केलीय. आरसीबीच्या खात्यात 2 पॉइंट्स एहत. मात्र आरसीबीचा नेट रनरेट इतर संघांच्या तुलनेत सरस असल्याने ते पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल आहेत. लखनौ सुपर जायंट्सने हैदराबादला पराभूत करत मोठी झेप घेतली आहे. लखनौ दुसऱ्या स्थानी पोहचली आहे. पंजाब किंग्स टीम तिसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई चौथ्या आणि दिल्ली पाचव्या क्रमांकावर आहे. या दोन्ही संघांनी या हंगामात विजयी सुरुवात केली आहे.
हैदराबादला मोठा झटका
हैदराबादला पहिल्याच पराभवासह मोठा झटका लागला. हैदराबादने या हंगामात विजयी सलामी दिली आणि पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली होती. मात्र हैदराबाद एका पराभवासह जोरात आपटलीय. हैदराबाद पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानी घसरली. केकेआरनेही एक सामना जिंकलाय आणि एक गमावलाय. केकेआर सातव्या स्थानी आहे. मुंबई इंडियन्स आठव्या तर गुजरात टायटन्स नवव्या स्थानी आहे. दोन्ही संघांची या हंगामात पराभवाने सुरुवात झालीय. तर राजस्थानची सर्वात वाईट स्थिती आहे. राजस्थान सलग 2 पराभवासह दहाव्या स्थानी आहे.
सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग, हर्षल पटेल आणि मोहम्मद शमी.
लखनौ सुपर जायंट्स प्लेइंग ईलेव्हन : एडन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, ऋषभ पंत (विकेटकीपर आणि कर्णधार), डेव्हिड मिलर, आयुष बडोनी, शार्दूल ठाकुर, रवी बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी आणि प्रिन्स यादव.