RCB vs DC : दिल्लीने टॉस जिंकला, आरसीबी घरच्या मैदानात बॅटिंग करणार, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
Royal Challengers Bengaluru vs Delhi Capitals Toss Ipl 2025 : दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकून यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. दिल्लीचे गोलंदाज आरसीबीला किती धावांवर रोखतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 24 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे आरसीबीच्या घरच्या मैदानात अर्थात एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरु येथे करण्यात आलं आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. पाहुण्या दिल्लीच्या बाजूने नाणेफेकीच कौल लागला. कर्णधार अक्षर पटेल याने फिल्डिंगचा निर्णय घेत आरसीबीला पहिले बॅटिंग करण्याची संधी दिली आहे. आता आरसीबी या संधीचा किती फायदा घेते? हे काही तासांनी स्पष्ट होईल.
दिल्ली विजयी चौकार लगावणार?
आरसीबीचा हा या मोसमातील पाचवा आणि दिल्लीचा चौथा सामना आहे. दिल्लीने खेळलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे दिल्ली सलग चौथ्या विजयासाठी सज्ज आहे. तर आरसीबीचा विजयी घोडदौड कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे. आता यात कोण कितपत यशस्वी ठरतं? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
आरसीबी पहिल्या विजयाच्या शोधात
दरम्यान आरसीबीचा हा या मोसमातील घरच्या मैदानातील दुसरा सामना आहे. मात्र आरसीबीला घरात विजयी होता आलेलं नाही. गुजरातने आरसीबीला 2 एप्रिलला एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पराभूत केलं होतं. तर आरसीबीने उर्वरित तिन्ही सामने घराबाहेर जिंकले आहेत. त्यामुळे आरसीबी चाहत्यांना घरच्या मैदानात पहिल्या विजयाची प्रतिक्षा आहे. आता ही प्रतिक्षा दिल्ली कॅपिट्ल्सविरुद्धच्या सामन्याने संपणार की आणखी वाढणार? हे तर निकालानंतरच स्पष्ट होईल.
दिल्लीने टॉस जिंकला
🚨 Toss 🚨@DelhiCapitals won the toss and elected to bowl against @RCBTweets in Bengaluru.
Updates ▶️ https://t.co/h5Vb7sp2Z6#TATAIPL | #RCBvDC pic.twitter.com/mXzcfDp4LX
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2025
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्लेइंग ईलेव्हन : फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, क्रुणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड आणि यश दयाल.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन: फाफ डू प्लेसिस, जेक फ्रेझर-मॅकगुर्क, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, मोहित शर्मा, कुलदीप यादव आणि मुकेश कुमार.