शुबमन गिल राजस्थान विरूद्धच्या सामन्यात चुकीची प्लेइंग 11 सांगून बसला! काय झालं ते जाणून घ्या
आयपीएल 2025 स्पर्धेच्या 23 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स हे संघ आमनेसामने आले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर शुबमन गिल चुकीची प्लेइंग सांगून बसला. गिलने संघात कोणताही बदल नाही असं सांगितलं. पण तिथेच मोठी गडबड झाली.

आयपीएल 2025 स्पर्धा आता अशा वळणावर येऊन ठेपली आहे की प्रत्येक जय पराजय प्लेऑफचं गणित बदलणार आहे. या स्पर्धेतील 23व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स आमनेसामने आले. नाणेफेकीचा कौल राजस्थानच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खरचं तर हा निर्णय मनाविरुद्ध असल्याने गुजरातला प्रथम फलंदाजी करावी लागली. गुजरात टायटन्सला हा सामना जिंकायचा तर 200 पार धावांची आवश्यकता होती. गुजरात टायटन्सने 20 षटकात 6 गडी गमवून 217 धावा केल्या आणि विजयााठी 218 धावांचं आव्हान दिलं. पण या सामन्यात कर्णधार शुबमन गिल एक चूक करून बसला. नाणेफेकीवेळी शुबमन गिल चुकीची प्लेइंग 11 सांगून बसला. त्याने सांगितलं की, प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल नाही. खरं तर मागच्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदर हा चांगला खेळला होता. तेव्हा दोन खेळाडूंना बाहेर होते. तर रदरफोर्ड हा इम्पॅक्ट प्लेयरल आणि अर्शद खानला यांना प्लेइंग 11 मध्ये जागा मिळाली नव्हती.
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्सकडून डेब्यू करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदर चांगली फलंदाजी केली होती. त्याने 29 चेंडूत 49 धावांची खेळी केली होती. यात 5 चौकार आणि 2 षटकार मारले होते. पण इतकी चांगली कामगिरी करूनही त्याला गुजरातने बाहेर केलं. त्यामुळे कर्णधार शुबमन गिलच्या निर्णयाने कुजबूज सुरु झाली आहे. शुबमन गिलने नाणेफेकीनंतर सांगितलं की, ‘मीही प्रथम गोलंदाजी केली असती. गेल्या काही सामन्यांकडे पाहता, दुसऱ्या डावात दव पडला होता पण आम्ही येथे प्रथम फलंदाजी केली आहे. आम्ही एका वेळी एक सामना लक्षात घेत आहोत आणि आम्ही किती सामने जिंकले याचा हिशोब ठेवत नाही. जर टॉप 3 किंवा 4 खेळाडू काम करत असतील तर मी त्याबद्दल आनंदी आहे. आमच्या संघात कोणताही बदल नाही.’
दोन्ही संघांची प्लेइंग 11
गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन): साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (विकेटकीपर), शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, फजलहक फारुकी, संदीप शर्मा, तुषार देशपांडे