IPL 2023 Auction Live: आयपीएलचा लिलाव सुरू, अनेक खेळाडूंवर सुरू आहेत कोट्यवधी रुपयांची बोली

| Updated on: Dec 24, 2022 | 6:22 AM

IPL 2023 Auction Live Updates: आयपीएल 2023 च मिनी ऑक्शन सुरु झाली आहे. अनेक मोठ्या खेळाडूंवर बोली सुरू आहे.

IPL 2023 Auction Live: आयपीएलचा लिलाव सुरू, अनेक खेळाडूंवर सुरू आहेत कोट्यवधी रुपयांची बोली
IPL 2023 AuctionImage Credit source: Social Media

IPL Auction 2023 Live: आयपीएल 2023 मिनी ऑक्शन सुरु झाले आहे. 10 फ्रेंचायजी आपला स्क्वॉड पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरले आहे. ऑक्शनमध्ये 405 प्लेयर्सवर बोली लागणार आहे. या लिलावासाठी बीसीसीआय सचिव जय शाह यांच्यासोबत सर्वच पदाधिकारी कोच्ची येथे पोहोचले असून त्यांच्या उपस्थित लिलाव सुरू झाला आहे. शुक्रवारी बेन स्टोक्स, सॅम करनसह वेगवेळ्या खेळाडूंना आपल्या टीममध्ये घेण्यासाठी फ्रेंचायजींमध्ये स्पर्धा दिसून येईल.

पुढच्या सीजनसाठी ऑलराऊंडर्स खेळाडूंवर विशेष लक्ष असेल. त्यांना सर्वाधिक रक्कम मिळू शकते. मुंबई इंडियन्सला आपली गोलंदाजीची बाजू भक्कम करायची आहे. त्यामुळे तो गोलंदाजांवर बोली लावतील. चेन्नई सुपरकिंग्सच सॅम करनवर विशेष लक्ष असेल. त्याला ताफ्यात घेण्यासाठी ते भरपूर पैसा खर्च करु शकतात. यंदाच्या आयपीएलमध्ये सगळ्याच फ्रेंचायजींकडे समान रक्कम नाहीय. काही फ्रेंचायजींकडे जास्त पैसा आहे, तर काही फ्रेंचायजींकडे कमी रक्कम आहे. त्यामुळे प्रत्येक फ्रेंचायजी आपल्या रणनितीनुसारच बोली लावेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Dec 2022 08:31 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: नवीन उल हक ला कुणी केले खरेदी?

    अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक याला लखनौने दुसऱ्या फेरीत 50 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले.

    लखनऊने युधवीर चरकला 20 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले.

    राघव गोयलला मुंबईने 20 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले.

    अब्दुल पीएला राजस्थानने 20 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले.

  • 23 Dec 2022 08:26 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: अनमोलप्रीत-आसिफ-अश्विनही यांना कुणी केले खरेदी

    SRH ने अनमोलप्रीत सिंगला 20 लाखांना विकत घेतले.

    केएम आसिफला राजस्थानने 30 लाखांना खरेदी केले.

    मुरुगन अश्विनला राजस्थानने 20 लाखांना खरेदी केले.

    केकेआरने मनदीप सिंगला 50 लाखांमध्ये खरेदी केले.

    राजस्थानने आकाश वशिष्ठला 20 लाखांना विकत घेतले

  • 23 Dec 2022 08:24 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: जैम्पा यांना दीड कोटीला कुणी घेतली

    ऑस्ट्रेलियन लेगस्पिनर अॅडम जैम्पाला राजस्थान रॉयल्सने 1.50 कोटींच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे.

  • 23 Dec 2022 08:22 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: अकील हुसेन यांना कोणत्या टीमने केले खरेदी

    वेस्ट इंडिजचा फिरकी अष्टपैलू खेळाडू अकिल हुसेनला एसआरएचने 1 कोटींच्या मूळ किमतीत खरेदी केले.

  • 23 Dec 2022 08:21 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: लिटन दास यांचाही झाला लिलाव

    बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज लिटन दासलाही खरेदी केली आहे. त्याला कोलकाताने 50 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले.

  • 23 Dec 2022 08:19 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: राइली रूसो कुणी केले खरेदी

    रिले रुसोची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. त्याला दिल्ली कॅपिटल्सने तब्बल 4.60 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.

  • 23 Dec 2022 08:13 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: भगत वर्माला कोणत्या संघाने संधी दिली

    चेन्नईने भगतला 20 लाखांना विकत घेतले.

    भगत वर्माला चेन्नई सुपर किंग्जने 20 लाख रुपयांना विकत घेतले.

  • 23 Dec 2022 08:11 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: पंजाबणे घेतले दोन दिग्गज खेळाडूंना

    पंजाबने दोन महत्त्वाच्या अष्टपैलू खेळाडूंना 40 लाखांत खरेदी केले आहे.

    मोहित राठी आणि शिवम सिंग यांना संघाने प्रत्येकी 20 लाख रुपयांना खरेदी केले

  • 23 Dec 2022 08:10 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आरसीबीने सोनू यादवला केले खरेदी

    आरसीबीने सोनू यादवला 20 लाखांना खरेदी केले.

    त्रिलोक नाग, उत्कर्ष सिंग, शुभम कापसे, दीपेश नैनवाल आणि शुभांग हेगडे यांना कुणीही खरेदी केले नाही.

  • 23 Dec 2022 08:07 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: KKR मध्ये कुलवंत खेजरोलियाचा समावेश

    दिल्लीचा डावखुरा मध्यमगती गोलंदाज कुलवंत खेजरोलिया याला KKR ने 20 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे.

  • 23 Dec 2022 08:06 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: टॉम करण कुणी खरेदी केलेच नाही

    इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू टॉम करनला कोणीही खरेदीदार मिळाला नाही. करणसाठी त्याच्या 75 लाखांच्या मूळ किंमतीवर कोणतीही बोली लागली नाही.

    आज करणचा धाकटा भाऊ सॅम करण 18.50 कोटींसह सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

  • 23 Dec 2022 08:04 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: अविनाश सिंगचा आरसीबीच्या टीममध्ये समावेश

    आणखी एक अनकॅप्ड खेळाडू अविनाश सिंगला आरसीबीने सर्वाधिक ६० लाखांची बोली लावून विकत घेतले आहे.

  • 23 Dec 2022 08:02 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: SRH मध्ये नितीश रेड्डीचा समावेश

    अनकॅप्ड खेळाडू नितीश रेड्डीला सनरायझर्स हैदराबादने 20 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे.

  • 23 Dec 2022 08:02 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: डेविड वीजा आयपीएलमध्ये परतला

    नामिबियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू डेविड वीजा आयपीएलमध्ये परतला आहे. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने 1 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे.

  • 23 Dec 2022 08:00 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: लखनऊने स्वप्नीलला केले खरेदी

    स्वप्नील सिंगला लखनऊ सुपर जायंट्सने 20 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे.

  • 23 Dec 2022 07:58 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: शम्स मुलाणी मुंबईच्या टीममध्ये दाखल

    मुंबई इंडियन्सने मुंबई रणजी संघाचा स्टार फिरकीपटू शम्स मुलाणीला 20 लाखाच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे.

  • 23 Dec 2022 07:57 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: मोहित शर्माही गुजरातच्या टीममध्ये

    भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहित शर्माला गुजरात टायटन्सने 50 लाख रुपयांना विकत घेतले आहे.

  • 23 Dec 2022 07:56 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: जॉश लिटिल गुजरात टायटन्सने केले खरेदी

    आयर्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज जोश लिटल यानेही आयपीएलमध्ये प्रवेश केला आहे.

    या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला गुजरात टायटन्सने सर्वाधिक 4.40 कोटी रुपयांची बोली लावून विकत घेतले.

    जॉश लिटिल त्याच्या स्विंगने खूप प्रभावित केले आहे आणि गेल्या टी-20 विश्वचषकात हॅट्ट्रिक घेतली आहे.

  • 23 Dec 2022 07:54 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आरसीबीने राजनला घेतले विकत

    आरसीबीने उत्तराखंडचा मध्यमगती गोलंदाज राजन कुमारला 70 लाखांची बोली लावून विकत घेतले आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज असलेल्या राजनची मूळ किंमत 20 लाख रुपये होती.

  • 23 Dec 2022 07:53 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: डॉनोवन राजस्थान के नाम

    दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक अनकॅप्ड फलंदाज डोनोव्हान फरेरा याला राजस्थान रॉयल्सने 50 लाख रुपयांना विकत घेतले आहे.

  • 23 Dec 2022 07:51 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: डुआन यानसन मुंबईच्या टीममध्ये

    दक्षिण आफ्रिकेचा उंच मध्यमगती गोलंदाज ड्युएन जॅन्सन याला मुंबईने 20 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले.

  • 23 Dec 2022 07:50 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: प्रेरक लखनौने खरेदी केले

    अनकॅप्ड गोलंदाज प्रेरक मांकडला लखनौ सुपर जायंट्सने 20 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले.

  • 23 Dec 2022 07:49 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: मयंकला SRH ने केले खरेदी

    हिमाचल प्रदेशचा अनकॅप्ड अष्टपैलू खेळाडू मयंक डागरचा मोठ्या प्रमाणावर लिलाव होत आहे. SRH ने या खेळाडूला 1.80 कोटी मध्ये खरेदी केले आहे. 20 लाख रुपये त्याची मूळ किंमत होती.

    राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना झाला, त्यात हैदराबादने अखेर बाजी मारली.

  • 23 Dec 2022 07:45 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आरसीबीच्या टीम मनोज भंडगेला संधी

    अनकॅप्ड मनोज भंडगेला आरसीबीने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे.

  • 23 Dec 2022 07:44 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: पंजाबच्या टीममध्ये हरप्रीत भाटिया

    अनकॅप्ड खेळाडू हरप्रीत भाटियाला पंजाब किंग्जने 40 लाख रुपयांना विकत घेतले आहे.

  • 23 Dec 2022 07:43 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: अमित मिश्राला नवी टीम मिळाली

    लेग-स्पिनर अमित मिश्रा, आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक आहे. लखनऊ सुपर जायंट्सने 50 लाखांच्या मूळ किंमतीवर खरेदी केला आहे.

  • 23 Dec 2022 07:42 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: पियुष चावलाला कुणी केले खरेदी?

    45 मिनिटांच्या ब्रेकनंतर IPL दिग्गज लेग-स्पिनर पियुष चावला याला मुंबईने 50 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे.

  • 23 Dec 2022 06:09 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: नीशम ही रिकाम्या हाताने परतला

    न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जेम्स नीशमला त्याच्या 2 कोटींच्या मूळ किमतीत कोणीही स्वीकारले नाही.

    श्रीलंकेचा कर्णधार दासून शानका ही रिकाम्या हाताने परतला.

  • 23 Dec 2022 06:04 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: लखनौ सुपर जायंट्सच्या टीममध्ये सॅम्स आणि शेफर्ड

    ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू डॅनियल सॅम्सला लखनौ सुपर जायंट्सने 75 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे.

    वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू रोमारियो शेफर्डला लखनौ सुपर जायंट्सने 50 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे. शेफर्डला गेल्या हंगामानंतर SRH ने सोडले होते.

  • 23 Dec 2022 05:58 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: विक जॅक्सला आरसीबीने किती कोटीला खरेदी केले

    विक जॅक्सला आरसीबीने 3.20 कोटींना विकत घेतले आहे. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू विक जॅक्सची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये होती. त्याला आरसीबीने 3.20 कोटींना विकत घेतले आहे.

  • 23 Dec 2022 05:56 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: लिलावात मनीष पांडे कोणत्या टीममध्ये गेला

    भारताचा अनुभवी फलंदाज मनीष पांडेला दिल्ली कॅपिटल्सने 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये होती.

    मनीषला लखनौ सुपर जायंट्सने प्रसिद्ध केले. त्याने यापूर्वी आयपीएलमध्ये आरसीबी, एसआरएच आणि केकेआरसाठी खेळले आहे.

  • 23 Dec 2022 05:54 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: पॉल स्टर्लिंग रिकाम्या हाताने परतला

    कॅप्ड बॅट्समनच्या दुसऱ्या सेटची सुरुवात आयर्लंडच्या पॉल स्टर्लिंगने केली परंतु त्यांना कोणीही खरेदी केले नाही.

  • 23 Dec 2022 05:35 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: शिवम मावी हा सर्वात महागडा अनकॅप्ड खेळाडू

    सर्वात महाग अनकॅप्ड खेळाडू-

    शिवम मावी, 6 कोटी रुपये (गुजरात टायटन्स)

    मुकेश कुमार, 5.50 कोटी रुपये (दिल्ली कॅपिटल्स)

    विव्रत शर्मा, 2.60 कोटी रुपये (सनराईजर्स हैदराबाद)

    केएस भारत, 1.20 कोटी (गुजरात टायटन्स)

    एन जगदीशन, 90 लाख रुपये (कोलकाता नाइट रायडर्स)

  • 23 Dec 2022 05:32 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: हिमांशू शर्मा बेंगळुरूच्या टीममध्ये

    दिल्लीचा फिरकी गोलंदाज हिमांशू शर्माला आरसीबीने 20 लाख रुपयांना विकत घेतले आहे.

  • 23 Dec 2022 05:30 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: मुकेश कुमार दिल्लीच्या टीममध्ये दिसणार

    बंगालचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार याचे नशीबही उघड झाले आहे. त्याला दिल्ली कॅपिटल्सने 20 लाखांच्या मूळ किमतीत जोरदार बोली लावल्यानंतर 5.5 कोटी रुपयांना विकत घेतले.

    मुकेशही पहिल्यांदाच आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. गेल्या 2-3 वर्षात मुकेशने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीने खूप प्रभावित केले आहे.

    त्याने 23 टी-20 सामन्यात 25 विकेट घेतल्या आहेत, तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 33 सामन्यांमध्ये 126 विकेट घेतल्या आहेत.

  • 23 Dec 2022 05:20 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: गुजरातने शिवम मावीला केले खरेदी

    उत्तर प्रदेशचा वेगवान गोलंदाज शिवम मावीवर पुन्हा एकदा मोठी बोली लागली आहे. गुजरात टायटन्सने त्याला 6 कोटींना खरेदी केले.

  • 23 Dec 2022 05:19 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: यश ठाकूर लखनौच्या टीममध्ये

    विदर्भाचा मध्यमगती गोलंदाज यश ठाकूरला लखनौ सुपर जायंट्सने 45 लाख रुपयांना विकत घेतले आहे. त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये होती.

    यश ठाकूरने 37 टी-20 सामन्यात 55 विकेट घेतल्या आहेत.

  • 23 Dec 2022 05:17 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: वैभव अरोराला केकेआरने खरेदी केले.

    हिमाचल प्रदेशचा मध्यमगती गोलंदाज वैभव अरोरा याला केकेआरने 60 लाखांना विकत घेतले आहे. त्याची मूळ किंमत 20 लाख रुपये होती.

    वैभवने गेल्या मोसमात पदार्पण केले आणि पंजाब किंग्जकडून 5 सामने खेळले.

  • 23 Dec 2022 05:16 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: उपेंद्र यादवला कोणत्या संघात मिळाले स्थान

    यष्टिरक्षक फलंदाज उपेंद्र यादवला एसआरएचने 25 लाखांना विकत घेतले आहे.

  • 23 Dec 2022 05:14 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: केएस भरत गुजरातच्या संघात

    विकेटकीपर फलंदाज केएस भरतला गुजरात टायटन्सने 1.20 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याला दिल्ली कॅपिटल्सने रिलीज केले होते.

  • 23 Dec 2022 05:09 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: कोलकाताला पहिला खेळाडू मिळाला

    केकेआरने पहिला खेळाडू विकत घेतला आहे. त्याने तामिळनाडूचा आक्रमक फलंदाज नारायण जगदीशन याला 90 लाखांना विकत घेतले आहे.

    जगदीशनला CSK ने रिलीज केले होते तेव्हापासून त्याने विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफीमध्ये शतकांचा आणि धावांचा पाऊस पाडला.

  • 23 Dec 2022 05:07 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: CSK च्या टीममध्ये निशांत सिंधूला मिळाली संधी

    डावखुरा फिरकी गोलंदाज निशांत सिंधूला सीएसकेने 60 लाख रुपयांना विकत घेतले आहे. 20 लाखांची मूळ किंमत असलेल्या या अनकॅप्ड खेळाडूने यावर्षी भारतासाठी अंडर-19 विश्वचषक खेळला होता आणि विजेतेपद मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

  • 23 Dec 2022 05:06 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: पंजाबच्या सनवीर सिंगला SRH ने केले खरेदी

    पंजाबचा मध्यमगती-अष्टपैलू खेळाडू सनवीर सिंगला SRH ने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे.

  • 23 Dec 2022 05:04 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: सौराष्ट्रचा समर्थ व्यास SRH च्या टीममध्ये

    सौराष्ट्रचा सलामीवीर समर्थ व्यासला SRH ने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे.

  • 23 Dec 2022 05:03 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: पहिल्यांदाच विव्रांत शर्मा SRH कडून आयपीएलमध्ये दिसणार

    जम्मू-काश्मीरचा फिरकी अष्टपैलू खेळाडू विव्रत शर्माला SRH ने 2.60 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. 20 लाखांची मूळ किंमत असलेल्या या खेळाडूला प्रथमच आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला आहे.

  • 23 Dec 2022 05:01 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: सीएसकेने शेख रशीदला केले खरेदी

    यंदाच्या हंगामात भारतासाठी अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग असलेल्या शेख रशीदला CSK ने 20 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे.

  • 23 Dec 2022 04:58 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आयपीएलच्या लिलावात अनकॅप्ड खेळाडूंचा लिलाव

    मिनी लिलावात प्रथमच अनकॅप्ड खेळाडूंचा लिलाव होत आहे.

    अनमोलप्रीत सिंग विकला गेला नाही

    चेतन एलआर विकला गेला नाही.

    शुभम खजुरियाही रिकाम्या हाताने परतला

    रोहन कुनुमलचीही देखील विकला गेला नाही

  • 23 Dec 2022 04:54 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आयपीएलच्या लिलावात सर्वाधिक टाळ्या कुणाला वाजल्या?

    कोचीच्या हॉटेलमध्ये आयपीएलचा लिलाव हॉल आज काही प्रसंगी टाळ्यांच्या कडकडाटाणे दुमदुमून गेला होता. सर्वात मोठा प्रसंग सॅम करणसोबत आला. पंजाब किंग्जने या अष्टपैलू खेळाडूला 18.50 कोटी रुपयांना विकत घेतले. ह्यू एडमंड्सने त्यावर शिक्का मारताच लिलाव सभागृहात टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला.

  • 23 Dec 2022 04:50 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: हैदराबादच्या टीममध्ये मयंक मार्कंडेयला स्थान

    अनकॅप्ड भारतीय फिरकीपटू मयंक मार्कंडेयला सनरायझर्स हैदराबादने 50 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे.

  • 23 Dec 2022 04:49 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: अकील होसैन-जैम्पा रिकाम्या हातानेच परतले

    वेस्ट इंडिजचा फिरकीपटू अकिल हुसेन आणि ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अॅडम झम्पा रिकाम्या हाताने परतले

    दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीही विकला गेला नाही.

    अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रहमानही रिकाम्या हातीच परतला आहे

  • 23 Dec 2022 04:46 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आदिल रशीदची आयपीएलमध्ये एन्ट्री

    फिरकीपटूच्या सेटने इंग्लंडचा दिग्गज लेग-स्पिनर आदिल रशीदपासून सुरुवात केली आहे. आणि या टी-20 वर्ल्ड चॅम्पियन स्पिनर असलेल्या आदिलला SRH ने 2 कोटींच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे.

  • 23 Dec 2022 04:44 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: भारताचा इशांत शर्मा दिल्लीच्या टीममध्ये परतला

    भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला पुन्हा दिल्लीने 50 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे.

  • 23 Dec 2022 04:43 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: झाय रिचर्डसन मुंबईच्या टीममध्ये

    ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झ्ये रिचर्डसनला मुंबई इंडियन्सने 1.50 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले आहे.

  • 23 Dec 2022 04:41 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: भारताचा डावखुरा बॉलर उनादकट लखनौच्या टीममध्ये

    भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनादकट याला लखनौ सुपर जायंट्सने 50 लाखांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे.

  • 23 Dec 2022 04:37 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आरसीबीने रीस टॉप्लीला केले खरेदी

    इंग्लंडचा डावखुरा वेगवान गोलंदाज रीस टॉप्ली याला आरसीबीने 1.90 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याची मूळ किंमत 75 लाख रुपये होती. आरसीबीची ही पहिलीच खरेदी होती.

  • 23 Dec 2022 04:35 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आयपीएल लिलावात आता वेगवान गोलंदाजांची सुरुवात

    वेगवान गोलंदाजांची लिलाव सुरुवात झाली, त्यात इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनपासून सुरुवात झाली, पण त्यांना कोणीही खरेदीदार मिळू शकला नाही. त्यामुळे ख्रिसला रिकाम्या हाती परतावे लागले.

  • 23 Dec 2022 04:30 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: इंग्लंडचा आक्रमक यष्टीरक्षक दिल्लीच्या टीममध्ये

    दिल्ली कॅपिटल्सने इंग्लंडचा आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज फिल सॉल्टला 2 कोटी रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले आहे.

  • 23 Dec 2022 04:27 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: मेंडिस-बेंटन रिकाम्या हाती परतले

    श्रीलंकेच्या कुसल मेंडिसला कोणीही खरेदीदार मिळाला नाही. त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये होती.

    इंग्लंडच्या टॉम बेंटनवरही कोणी बोली लावली नाही. त्याची मूळ किंमत २ कोटी रुपये होती.

  • 23 Dec 2022 04:22 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: हैदराबादला दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक

    दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज हेनरिक क्लासेनला सनरायझर्स हैदराबादने 5.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये होती.

  • 23 Dec 2022 04:19 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: वेस्ट इंडिजचा यष्टिरक्षक-फलंदाज मालामाल

    वेस्ट इंडिजचा आक्रमक यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन पुन्हा एकदा मोठी रक्कम घेण्यात यशस्वी ठरला आहे. त्यांच्यासाठी दिल्ली, राजस्थान आणि लखनौमध्ये लढत झाली. अखेर लखनऊने त्याला 16 कोटींना खरेदी केले.

    पूरनला सनरायझर्स हैदराबादने शेवटचे 10.75 कोटींना मेगा लिलावात खरेदी केले होते आणि कामगिरी चांगली होती. तरीही SRH ने त्याला सोडले. T20 विश्वचषकातील त्याची कामगिरी पूर्णपणे फ्लॉप ठरली आहे.

  • 23 Dec 2022 04:16 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: बांगलादेशच्या यष्टिरक्षकाला कुणाचीच पसंती नाही

    बांगलादेशचा यष्टिरक्षक फलंदाज लिटन दासचे नाव लिलावात पहिले होते. त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये होती, पण त्याला कोणीही खरेदी केले नाही.

  • 23 Dec 2022 04:12 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आयपीएल लिलावातील यष्टिरक्षकांचा लिलाव

    फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंनंतर यष्टिरक्षकांचा क्रमांक आला आहे. अनेक संघांना यष्टिरक्षकांची गरज असते आणि त्यांच्यासाठी हा सेट महत्त्वाचा आहे.

  • 23 Dec 2022 04:10 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आयपीएल लिलावातील काही ठळक बाबी

    आतापर्यंत फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंवर बोली लावण्यात आली आहे. त्यात काही खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लागली आहे. दोन स्टेजवर आत्तापर्यंत बोली लावली गेली आहे.

    इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करन हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याला पंजाब किंग्सने 18.50 कोटींना विकत घेतले.

    आयपीएलमध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्सने 17.50 कोटींना विकत घेतले.

    ग्रीन हा मुंबईचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. त्याने ईशान किशनचा 15.25 कोटींचा विक्रम मोडला.

    सीएसकेने इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्सला 16.25 कोटींना विकत घेतले. तो सीएसकेचा सर्वात महागडा खेळाडूही ठरला.

    हैदराबादने इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक (13.25 कोटी) आणि भारतीय सलामीवीर मयंक अग्रवाल (8.25 कोटी) यांच्यावर खूप पैसा खर्च केला आहे.

  • 23 Dec 2022 03:58 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: बेन स्टोक्सला मिळाली धोनीच्या टीममध्ये संधी

    इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक बेन स्टोक्सला CSK ने 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

    इंग्लंडसाठी टी-२० विश्वचषकाच्या फायनलमध्ये लढाऊ अर्धशतकी खेळी खेळून जेतेपद मिळवण्यात मोठी भूमिका बजावणाऱ्या स्टोक्सला मोठी बोली लावावी लागली. महागड्या खेळाडूत त्याचा समावेश झाला आहे.

  • 23 Dec 2022 03:54 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: कॅमेरॉन ग्रीन वर कुणी मारली बाजी, महागड्या खेळाडूच्या ग्रीन

    ऑस्ट्रेलियाचा युवा अष्टपैलू कॅमेरून ग्रीनवरही भरपूर पैसा लावला गेला आहे. प्रथमच आयपीएल लिलावात सहभागी झालेल्या ग्रीनला अखेर मुंबईने 17.50 कोटींना विकत घेतले.

    सॅम करण प्रमाणे ग्रीनलाही मोठी बोली लागण्याची अपेक्षा होती. ग्रीनसाठी MI आणि DC यांच्यात मोठी लढत झाली, त्यामध्ये MI ने बाजी मारली आहे.

  • 23 Dec 2022 03:51 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: राजस्थान रॉयल्सने होल्डरवर बाजी मारली, 5.75 कोटींना विकत घेतले

    होल्डरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू जेसन होल्डरला राजस्थान रॉयल्सने 5.75 कोटी रुपयांना विकत घेतले. होल्डरची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.

  • 23 Dec 2022 03:47 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: झिम्बाब्वेचा स्टार अष्टपैलू खेळाडू सिकंदरची एन्ट्री

    झिम्बाब्वेचा स्टार अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाने आयपीएलमध्ये प्रवेश केला आहे. पंजाब किंग्जने या अष्टपैलू खेळाडूला 50 लाखांच्या मूळ किमतीत खरेदी केले.

  • 23 Dec 2022 03:42 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: इंडिजच्या अष्टपैलू खेळाडूला कुणी केले खरेदी?

    वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ओडियन स्मिथला ही लिलाव प्रक्रियेत होता. त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये होती त्याला गुजरात टायटन्सने त्याच्या मूळ किंमतीलाच खरेदी केले आहे.

  • 23 Dec 2022 03:38 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: सॅम करणवर कोट्यवधी रुपयांचा वर्षाव

    इंग्लंडचा युवा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम करन आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. चुरशीच्या लढाईनंतर पंजाब किंग्जने 18.50 कोटींच्या विक्रमी किमतीत त्याला विकत घेतले.

    नुकताच T20 विश्वचषक जिंकणाऱ्या या स्टार खेळाडूवर इंग्लंडला सुरुवातीपासूनच मोठ्या बोलीची अपेक्षा होती आणि तसेच लिलाव प्रक्रियेत दिसून आले आहे.

  • 23 Dec 2022 03:36 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: शाकिब अल हसन ला कुणीच स्वीकारले नाही

    अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत पहिले नाव शाकिब अल हसनचे होते. बांगलादेशी कर्णधार असलेल्या शाकीबची मूळ किंमत 1.50 कोटी रुपये होती. शाकिबला कोणतीही बोली मिळाली नाही आणि तो विकला गेला नाही.

  • 23 Dec 2022 03:34 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आता अष्टपैलूंची खेळाडूंवर बोली सुरू

    फलंदाजांनंतर दुसरा सेट अष्टपैलू खेळाडूंचा आहे आणि बहुतेकांच्या नजरा त्यावर आहेत. या सेटमध्ये सर्वांच्या नजरा बेन स्टोक्स, सॅम करण, कॅमेरून ग्रीन या नावांवर असतील.

  • 23 Dec 2022 03:31 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: रिले रुसोही विकला गेला नाही

    दक्षिण आफ्रिकेचा स्फोटक फलंदाज रिले रुसोलाही खरेदीदार मिळाला नाही. डावखुरा फलंदाज रूसोची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती पण कोणीही त्याच्यावर बोली लावली नाही.

    रुसोने गेल्या 3 महिन्यांत T20 क्रिकेटमध्ये 2 धडाकेबाज शतके झळकावली होती, त्यापैकी एक T20 विश्वचषकातील शतक होते, परंतु तरीही कोणीही त्याच्यासाठी बोली लावली नाही.

  • 23 Dec 2022 03:25 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: जो रूट रिकाम्या हाताने परतला

    इंग्लंडचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार जो रूटला कोणीही खरेदीदार मिळू शकला नाही. प्रथमच आयपीएल लिलावात आपले नाव सांगणाऱ्या रूटची मूळ किंमत 1 कोटी होती, मात्र कोणीही बोली लावली नाही.

  • 23 Dec 2022 03:17 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आयपीएलमध्ये चौथ्या खेळाडूचा लिलाव पूर्ण

    महेंद्रसिंग धोनीने अजिंक्य रहाणेला निवडलं, अनुभवी बॅट्समन असलेल्या अजिंक्य रहाणेला मूळ किंमत असलेल्या 50 लाखाला खरेदी केले आहे. अजिंक्य रहाणेला KKR ने सोडले होते.

  • 23 Dec 2022 03:12 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आयपीएलमध्ये तिसऱ्या खेळाडूचा लिलाव पूर्ण

    पंजाब किंग्जचा माजी कर्णधार आणि सलामीवीर मयंक अग्रवालनेही चांगली झुंज दिली आणि अखेर त्याला हैदराबादने 8.25 कोटींना विकत घेतले आहे.

    गेल्या हंगामात मयंकला पंजाबने कर्णधार बनवले होते, पण या वेळी त्याला काढून टाकण्यात आले असून त्याची मूळ किंमत ही एक कोटी रुपये लावली होती.

  • 23 Dec 2022 03:08 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आयपीएलमध्ये तिसऱ्या खेळाडूचा लिलाव सुरू

    सलामीवीर मयंक अग्रवालवर बोली लागली आहे. त्याची मूळ किंमत एक कोटी रुपये

    • आरसीबीने मूळ किमतीवर बोली सुरू केली.
    • पंजाब किंग्जनेही लगेच बोली सुरू केली
    • आरसीबी-पंजाबच्या लढतीतील बोली 2 कोटींच्या पुढे गेली
    • CSK नेही मारली एन्ट्री, आता 3 कोटींच्या पुढे बोली
    • मयंकवरची बोली 4 कोटींवर पोहोचली
    • आता CSK आणि SRH यांच्यात संघर्ष आहे
    • बोली 5.50 कोटींवर पोहोचली.
    • CSK ने 6.50 कोटींची बोली लावली.
    • SRH आणि CSK मध्ये संघर्ष सुरूच आहे
    • बोली 7.75 कोटींवर पोहोचली
    • SRH ने 8.25 कोटींना विकत घेतले
  • 23 Dec 2022 02:59 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आयपीएलमध्ये दुसऱ्या खेळाडूचा लिलाव पूर्ण

    इंग्लंडचा खेळाडू हॅरी ब्रूक चा दुसऱ्या क्रमांकावर लिलाव झाला.

    हैरी ब्रूकला हैद्राबादने 13.25 कोटीला खरेदी केले, राजस्थाननेही लावली होती बोली.

    हॅरी ब्रूकवर मोठी बोली लावेल अशी स्थिती होती. आणि घडलं देखील तसेच. इंग्लंडच्या 23 वर्षीय स्फोटक फलंदाज म्हणून ओळख असलेल्या हॅरीने 13.25 कोटींची मोठी रक्कम घेऊन लिलावाचे वातावरण निर्माण आहे.

    ब्रूकने 99 टी-20 सामन्यांमध्ये 148 च्या स्ट्राइक रेटने 2432 धावा केल्या आहेत, ज्यात 102 षटकारांचा समावेश आहे. हा मधल्या फळीतील फलंदाज फिनिशर म्हणून महत्त्वाचा ठरू शकतो.

  • 23 Dec 2022 02:56 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आयपीएलमध्ये दुसऱ्या खेळाडूचा लिलाव सुरू

    इंग्लंडचा खेळाडू  हॅरी ब्रूक दुसऱ्या क्रमांकावर आहे.

    • आरसीबीने 1.5 कोटींच्या मूळ किमतीने बोली सुरू केली.
    • राजस्थान रॉयल्सही बोली लावत आहे.
    • राजस्थान आणि आरसीबी यांच्यातील लढत सुरूच आहे.
    • बोली 3 कोटींच्या पुढे गेली.
    • बोली चार कोटींच्या पुढे गेली
    • SRH ने 6 कोटींची बोली लावून एंट्री केली
    • आरसीबीने माघार घेतली, आता SRH आणि राजस्थान यांच्यात लढत आहे
    • बोली सात कोटींच्या पुढे गेली
    • दोन्ही संघांमधील लढत सुरूच आहे. बोली 12.50 कोटींवर पोहोचली
    • हैदराबादने 13.25 कोटीला खरेदी केले.
  • 23 Dec 2022 02:50 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आयपीएलमध्ये कोणत्या खेळाडूचा पाहिला लिलाव झाला

    न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज आणि कर्णधार केन विल्यमसनचे नाव लिलावात प्रथम आले. गुजरात टायटन्सने 2 कोटींच्या मूळ किंमतीसह बोली उघडली. विल्यमसनवर आणखी बोली लागली नाही आणि माजी SRH कर्णधार आता गुजरातकडून खेळणार आहे.

  • 23 Dec 2022 02:46 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आयपीएलमधील लिलाव करणारी ‘ती’ व्यक्ती यंदा पुन्हा दिसणार!

    प्रसिद्ध लिलावकर्ते म्हणून ओळखले जाणारे ह्यू एडमीड्स यंदाच्या लिलावात दिसणार आहे. ह्यू एडमीड्स यांचा मागील लिलावात समावेश होता, मात्र त्यांना लिलाव प्रक्रिया सुरू असतांना छातीत त्रास झाला होता. लिलावाच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन ते जमिनीवर कोसळले होते. त्यांच्या जागी चारू शर्मा यांनी लिलाव प्रक्रिया पूर्ण केली होती.

  • 23 Dec 2022 02:40 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: खेळाडू भरपूर पण 87 जणांनाच केलं जाणार खरेदी

    आयपीएल 2023 च्या लिलाव प्रक्रियेत 405 खेळाडू सहभागी आहेत. पण त्यामध्ये 87 खेळांडूंनाच संधि मिळेल. याशिवाय 30 पेक्षा जात विदेशी खेळाडूंना खरेदी करता येणार नाहीये. त्यामुळे यंदाच्या लिलाव प्रक्रियेत मोठी रंगत बघायला मिळणार आहे.

  • 23 Dec 2022 02:30 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: काही क्षणातच आयपीएलचा लिलाव सुरू होणार, काय आहे स्थिती?

    काही वेळातच आयपीएल 2023 च्या खेळाडू लिलावाला सुरुवात होणार आहे. आयपीएल 2023 लिलाव सुरू होण्यास फारसा वेळ शिल्लक नाही. लिलावात सनरायझर्स हैदराबादला सर्वाधिक पैसे मिळाले आहे. त्याचबरोबर शाहरुख खानची टीम कोलकाता नाईट रायडर्सकडे सर्वात कमी पैसा आहे. यंदाच्या लिलावात एकूण 405 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. परंतु, सर्व 10 संघांमध्ये केवळ 87 जागा रिक्त आहेत.

  • 23 Dec 2022 02:25 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: यंदाच्या आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलियाचा कोणता मोठा खेळाडू नसणार?

    ऑस्ट्रेलियाच्या बेन मॅकडरमॉटने आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेतून आपलं नाव काढून घेतलं आहे. बेन मॅकडरमॉट हा ऑस्ट्रेलियाचा पॉवरफुल्ल बॅट्समन आहे. 2023 आयपीएलच्या मॅचमध्ये बेन मॅकडरमॉट दिसणार नाहीये.

  • 23 Dec 2022 02:19 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: इंग्लंडच्या रेहान अहमदने आयपीएलच्या लिलावातून माघार का घेतली?

    इंग्लंडच्या टीमकडून पदार्पण करणारा ऑफस्पिनर रेहान अहमदने आयपीएल 2023 लिलाव सुरू होण्यापूर्वी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या जोरदार एन्ट्री करणाऱ्या रेहान अहमदने लिलावातून नावं मागे घेतलं आहे. सात विकेट घेणारा रेहानला फक्त कसोटीवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. या कारणामुळे त्याने आयपीएलमधून नाव मागे घेतले आहे.

  • 23 Dec 2022 02:14 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आयपीएलच्या लिलावात मयंक अग्रवालवर विशेष लक्ष का?

    मयंक अग्रवाल वर आयपीएलच्या अनेक संघांचं लक्ष आहे. मयंक अग्रवाल सर्वात महागडा भारतीय खेळाडू ठरण्याची शक्यता आहे. मयंकला घेण्यासाठी केएल राहुलची टीम प्रयत्न करत आहे, त्याचे कारण म्हणजे केएल राहुलचा मयंक मित्र आहे. त्यांची दोघांची जोडी यशस्वी ठरली आहे.

  • 23 Dec 2022 02:02 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आयपीएलच्या केकेआर टीममध्ये यंदाच्या वर्षी कुणाचा सहभाग

    आयपीएलमधील केकेआर टीमची स्थिती खालीलप्रमाणे :

    KKR ने कायम ठेवलेले खेळाडू : श्रेयस अय्यर, रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, उमेश यादव, वरुण चक्रवर्ती, अनुकुल रॉय, व्यंकटेश अय्यर, शार्दुल ठाकूर, हर्षित राणा, आंद्रे रसेल, सुनील नरेन, नितीश राणा, टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन.

    KKR ने काढून टाकलेले खेळाडू : शिवम मावी, मोहम्मद नबी, अजिंक्य रहाणे, आरोन फिंच, चमिका करुणारत्ने, रमेश कुमार.

  • 23 Dec 2022 01:56 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आयपीएलच्या कोणत्या टीमकडे किती पैसे शिल्लक?

    आयपीएलमधील कोणत्या टीमकडे किती पैसे शिल्लक :

    सनरायझर्स हैदराबाद 42.25 कोटी रु

    पंजाब किंग्ज 32.2 कोटी रु

    लखनौ सुपर जायंट्स रु. 23.35 कोटी

    मुंबई इंडियन्स रु. 20.55 कोटी

    चेन्नई सुपर किंग्ज रु. 20.45 कोटी

    गुजरात टायटन्स 19.25 कोटी रु

    दिल्ली कॅपिटल्स रु. 19.45 कोटी

    राजस्थान रॉयल्स 13.2 कोटी रु

    रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 8.75 कोटी रु

    कोलकाता नाईट रायडर्स 7.05 कोटी रु

  • 23 Dec 2022 01:49 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आयपीएलमध्ये सनराईज हैदराबादला नवीन खेळाडूंना घ्यावं लागणार?

    SRH ने टीममध्ये ठेवलेले खेळाडू : अब्दुल समद, एडन मार्कराम, फजलक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, नटराजन, उमरान मलिक, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, मार्को जॅन्सन, वॉशिंग्टन सुंदर.

    SRH ने काढून टाकलेले खेळाडू : केन विल्यमसन, निकोलस पूरन, शॉन अॅबॉट, शशांक सिंग, जगदीश सुचित, प्रियम गर्ग, रविकुमार समर्थ, रोमॅरियो शेफर्ड, सौरभ दुबे, श्रेयस गोपाल, सुशांत मिश्रा आणि विष्णू विनोद.

  • 23 Dec 2022 01:44 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: मुंबई इंडियन्सच्या संघात कोण-कोण आहेत?

    MI ने कायम ठेवलेले खेळाडू : रोहित शर्मा, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, आर्चर, बुमराह, अर्जुन तेंडुलकर.

    MI ने काढून टाकलेले खेळाडू : किरॉन पोलार्ड, रिले मेरेडिथ, डॅनियल सायम्स, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, जयदेव उनाडकट, फॅबियन ऍलन, टिमल मिल्स, संजय यादव, आर्यन जुयाल, बेसिल थम्पी.

  • 23 Dec 2022 01:41 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: चेन्नई सुपर किंग्सची अशी आहे मजबूत टीम

    CSK ने कायम ठेवलेले खेळाडू : एमएस धोनी, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, डेव्हॉन कॉनवे, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायडू, दीपक चहर, मुकेश चौधरी, ड्वेन प्रिटोरियस, महिष टीक्षाना, प्रशांत सोळंकी, सिमरजीत सिंग, तुषार राजवर्धन, एच. सुभ्रांशु सेनापती, मिचेल सॅन्टनर, महिश पाथीराना.

    CSK ने काढून टाकलेले खेळाडू : ड्वेन ब्राव्हो, अॅडम मिल्ने, ख्रिस जॉर्डन, एन जदगीशन, हरी निशांत, के भगत वर्मा, केएम आसिफ, रॉबिन उथप्पा.

  • 23 Dec 2022 01:35 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: यंदाच्या आयपीएल मधील गुजरातची तगडी टीम

    GT ने कायम ठेवलेले खेळाडू : हार्दिक पंड्या, शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, जयंत यादव, साई किशोर, राहुल तेवतिया, विजय शंकर, ऋद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, रशीद खान, यशन दयाल, संघन दयाल, प्रदीप मोहम्मद शमी, अल्झारी जोसेफ आणि नूर अहमद.

    GT ने काढून टाकलेले खेळाडू : डॉमिनिक ड्रेक्स, गुरकीरत सिंग, जेसन रॉय, रहमानउल्ला गुरबाज, लॉकी फर्ग्युसन आणि वरुण आरोन.

  • 23 Dec 2022 01:30 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: राजस्थान रॉयल संघाची कुणी स्थान मिळवलं कुणी गमावलं

    RR चे कायम ठेवलेले खेळाडू : संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, शिमरन हेटमायर, दीपक पडिकल, जोस बटलर, ध्रुव जुरेल, रियान पराग, प्रसिद्ध कृष्णा, ट्रेंट बोल्ट, ओबेद मॅककॉय, नवदीप सैनी, कुलदीप सेन, कुलदीप यादव, आर अश्विन, युझवेंद्र चहल, केसी करिअप्पा.

    RR ने काढून टाकलेले खेळाडू : अनुनय सिंग, कॉर्बिन बॉश, डॅरेल मिशेल, जेम्स नीशम, करुण नायर, नॅथन कुल्टर-नाईल, रॅसी व्हॅन डर डुसेन, शुभम गढवाल, तेजस बरोका.

  • 23 Dec 2022 01:23 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: लखनऊ सुपर जायंट्समध्ये कुणाचं स्थान कायम कुणाला मिळाला डच्चू

    लखनऊ सुपर जायंट्समध्ये कुणाचं स्थान कायम कुणाला मिळाला डच्चू नावं खालीलप्रमाणे:

    LSG मध्ये कायम ठेवलेले खेळाडू : केएल राहुल, आयुष बडोनी, कर्ण शर्मा, मनन वोहरा, दीपक हुडा, काईल मायर्स, क्रुणाल पंड्या, आवेश खान, मार्क वुड, मयंक यादव, रवी बिश्नोई, क्विंटन डिकॉक, मार्कस स्टॉइनिस, कृष्णप्पा गौतम.

    LSG मधून काढून टाकलेले खेळाडू : अँड्र्यू टाय, अंकित राजपूत, दुष्मंता चमीरा, मनीष पांडे, शाहबाज नदीम, एविन लुईस, जेसन होल्डर

  • 23 Dec 2022 01:16 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: पाच मोठे खेळाडू आयपीएलच्या नसणार

    यंदाच्या आयपीएलमध्ये पाच मोठे खेळाडू आयपीएल खेळणार नाहीत.

    ख्रिस वोक्स, ड्वेन ब्राव्हो, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि स्टीव्ह स्मिथ सारखी मोठे खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार नाहीत.

  • 23 Dec 2022 01:04 PM (IST)

    IPL 2023 Auction Live: आयपीएलच्या कोणत्या टीममध्ये किती आहे जागा?

    कोणत्या टीम मध्ये किती जागा?

    सनराइजर्स हैदराबाद- 13

    कोलकाता नाइट राइडर्स- 11

    लखनऊ सुपर जायंट्स- 10

    राजस्थान रॉयल्स- 9

    पंजाब किंग्स-9

    मुंबई इंडियंस- 9

    चेन्नई सुपर किंग्स- 7

    गुजरात टाइटंस- 7

    रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु- 7

    दिल्ली कैपिटल्स- 5

  • 23 Dec 2022 11:28 AM (IST)

    IPL 2023 Auction Live: 87 स्लॉटमध्ये 30 परदेशी खेळाडू

    लिलावात सर्व 10 फ्रेंचायजी एकूण 87 स्लॉट भरतील. यात 30 परदेशी खेळाडू आहेत.

  • 23 Dec 2022 11:27 AM (IST)

    IPL 2023 Auction Live: ऑक्शनच काऊंटडाऊन सुरु

    आयपीएल 2023 च मिनी ऑक्शन शुक्रवारी कोच्चीमध्ये होणार आहे. या लिलावासाठी 405 खेळाडूंवर बोली लागेल.

Published On - Dec 23,2022 11:25 AM

Follow us
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.