IPL Auction 2022: कुठल्या संघाकडे किती खेळाडू आणि पर्समध्ये शिल्लक रक्कम किती?
IPL Auction 2022: यंदा आयपीएलमध्ये आठ नाही, तर दहा संघ (Teams) मैदानावर खेळताना दिसणार आहेत. सर्वच फ्रेंचायजींना 25 पर्यंत खेळाडू खरेदी करता येणार होते.
बंगळुरु: मागच्या दोन दिवसांपासून बंगळुरुमध्ये (Banglore) सुरु असलेला TATA IPL 2022 Mega Auction चा सोहळा अखेर संपला आहे. एकूण 600 खेळाडूंची मेगा ऑक्शनसाठी निवड झाली होती. पण त्यातल्या 203 खेळाडूंची फ्रेंचायजींनी खरेदी केली. यंदा आयपीएलमध्ये आठ नाही, तर दहा संघ (Teams) मैदानावर खेळताना दिसणार आहेत. सर्वच फ्रेंचायजींना 25 पर्यंत खेळाडू खरेदी करता येणार होते. त्यांच्याकडे पर्समध्ये 90 कोटी रुपये होते. आता प्रत्येक फ्रेंचायजींकडे किती खेळाडू आहेत आणि किती रक्कम शिल्लक उरली आहे ते जाणून घ्या
चेन्नई सुपर किंग्स – एकूण खेळाडू 25 – परदेशी खेळाडू 8 – पर्समध्ये शिल्लक रक्कम – 2.95 कोटी रुपये
दिल्ली कॅपिटल्स – एकूण 24 खेळाडू – सात परदेशी खेळाडू – पर्समध्ये 10 लाख रुपये शिल्लक
केकेआर – एकूण खेळाडू 25 – पाच परदेशी खेळाडू – पर्समध्ये 45 लाख शिल्लक
मुंबई इंडियन्स – एकूण खेळाडू 25 – आठ परदेशी खेळाडू – पर्समध्ये 10 लाख शिल्लक
पंजाब किंग्स – एकूण खेळाडू 25 – सात परदेशी खेळाडू – पर्समध्ये 3.45 कोटी शिल्लक
राजस्थान रॉयल्स – एकूण खेळाडू 25 – आठ परदेशी खेळाडू – पर्समध्ये 95 लाख शिल्लक
आरसीबी – एकूण खेळाडू 22 – आठ परदेशी खेळाडू – पर्समध्ये शिल्लक 1.55 कोटी
SRH – एकूण खेळाडू 23 – आठ परदेशी खेळाडू – पर्समध्ये शिल्लक 10 लाख
लखनऊ सुपर जायंट्स – एकूण खेळाडू 21 – परदेशी खेळाडू सात – पर्समध्ये शिल्लक शुन्य
गुजरात टायटन्स – एकूण खेळाडू 23 – परदेशी खेळाडू आठ – पर्समध्ये शिल्लक 15 लाख