IPL Retention 2022: आयपीएलच्या लिलावावर पार्थ जिंदल यांनी उपस्थित केले सवाल, दिल्लीला फटका
दिल्ली कॅपिटल टीमचे सहमालक पार्थ जिंदल यानी बीसीसीआयला विनंती करत लिलाव प्रक्रिया पुन्हा पडताळून पाहण्याची विनंती केली आहे. पार्थ यांच्या म्हणण्यानुसार आताच्या नियमांमुळे खेळाडुंची निवड करण्यात आणि टीम बनवण्यात अडचणी येत आहेत.
मुंबई : आयपीएलच्या रेटेंन्शन प्रक्रियेवर पार्थ जिंदाल यांनी काही सवाल उपस्थित केल्याने आयपीएलची लिलाप्रक्रिया वादात सापडली आहे. आयपीएलच्या टीमनी आपल्या आवडीचे काही दिग्गज खेळाडू रिटेन केले आहेत. मुंबईने कॅप्टन रोहित शर्मा, जसप्रित बुमराह असे दिग्गज खेळाडू रिटेन केले आहेत. तर चेन्नईने धोनी, आयसीबीने कोहलीला रिटेन केलं आहे. मात्र दिल्ली त्यांच्या काही दिग्गज खेळाडुंना रिटेन करू शकली नाही. त्यामुळे दिल्लीला मोठा फटका बसला आहे.
लिलाप्रक्रिया पुन्हा पाहण्याची विनंती
यावरूनच दिल्ली कॅपिटल टीमचे सहमालक पार्थ जिंदल यानी बीसीसीआयला विनंती करत लिलाव प्रक्रिया पुन्हा पडताळून पाहण्याची विनंती केली आहे. पार्थ यांच्या म्हणण्यानुसार आताच्या नियमांमुळे खेळाडुंची निवड करण्यात आणि टीम बनवण्यात अडचणी येत आहेत. आताच्या नियमानुसार दिल्लीने ऋषभ पंत, अक्षर पटेल, पृथ्वी शॉ, एनरिक नॉर्खिया असे काही महत्वाचे खेळाडू रिटेन केले आहेत, मात्र त्यांना शिखर धवन, रविचंद्रन अश्विन, श्रेयश अय्यर अशा दिग्गज खेळाडुंना रिटेन करता आले नाही. त्यामुळेच आयपीएलच्या लिलाव प्रक्रियेवर सवाल उपस्थित झाले आहेत.
फेंचाईसी फक्त 4 खेळाडू रिटेन करु शकते
श्रेयस अय्यर, शिखर धवन, कागिसो रबाडा आणि अश्विन यांना रिलीज करणं वेदनादायी झाल्याचं पार्थ जिंदल यांनी म्हटलं आहे. खेळाडुंच्या रिटेंन्शन प्रक्रियेने काही दिवस झोप उडवल्याचं पार्थ जिंदल यांनी म्हटलं आहे. तसेच युवा खेळाडुंना संधी मिळाली पाहिजे, एक टीम तयार झाली पाहिजे, खेळाडुंची निवड करायची, त्यांना तयार करायचं आणि तीन वर्षांनंतर त्यांंना गमवायचं हे कठीण असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.