ipl auction : आयपीएलमध्ये चुरस वाढली, ११६ जागांसाठी ११६६ खेळाडू मैदानात
ipl auction 2023 : आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी यंदा तब्बल ११६६ खेळाडूंनी आपली नाव नोंदवले आहेत. त्यात ८३० भारतीय खेळाडू आहेत. ३३६ खेळाडू विदेशी आहेत. महत्वाचे म्हणजे विदेशी खेळाडूंच्या यादीत जोफ्रा आर्चर याचे नाव यंदा नाही.
चेन्नई | 5 डिसेंबर 2023 : आयपीएलसाठी आता स्पर्धा वाढू लागली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगसाठी खेळाडूंचा लिलाव १९ डिसेंबरला होणार आहे. प्रथमच हा लिलाव दुबईत होणार आहे. तसेच फ्रॅचायझींकडे यावर्षी गेल्या वेळेपेक्षा पाच कोटींची रक्कम जास्त आहे. खेळाडूंच्या खरेदीसाठी प्रत्येक फँचायझीकडे आता ९५ कोटी रुपयांची रक्कम राखून ठेवली होती. त्यात पाच कोटींची भर पडल्यामुळे आता ही रक्कम शंभर कोटी झाली आहे. यामुळे खेळाडूंना चांगला पैसा मिळणार आहे. खेळाडूंची स्पर्धाही वाढली आहे. आयपीएल लिलावासाठी १ हजार १६६ खेळाडूंनी नोंदणी करण्यात आली आहे. यामध्ये अनेक बड्या खेळाडू आहेत. तसेच काही अनोळखी चेहरेसुद्धा आहेत. या चेहऱ्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. यामुळे आयपीएलमध्ये खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडणार आहे.
आयपीएल नोंदणीत ८३० भारतीय
आयपीएल २०२४ च्या लिलावासाठी ११६६ खेळाडूंनी स्वत:चे नाव नोंदवले आहे. त्यात ८३० भारतीय खेळाडू आहेत. ३३६ खेळाडू विदेशी आहेत. महत्वाचे म्हणजे विदेशी खेळाडूंच्या यादीत जोफ्रा आर्चर याचे नाव यंदा नाही.
हे खेळाडू खाणार भाव
मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, गेराल्ड कोएत्झी आणि सचिन रवींद्र हे मोठे खेळाडू यंदाच्या लिलावात भाव खाऊ शकतात. भारतीय खेळाडूंत शार्दूल ठाकूर, हर्षल पटेल, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांच्यासाठी चांगली बोली लागणार आहे. यापैकी काही जणांवर दहा कोटींपेक्षा जास्त बोलू लागणार आहे.
२ कोटी बेस प्राइज असलेले खेळाडू
हर्षल पटेल, शार्दूल ठाकूर, उमेश यादव, केदार जाधव, मुजीब उर रहमान, शॉन एबॉट, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मिचेल स्टार्क, स्टीव्ह स्मिथ, मुस्तफिजुर रहमान, टॉम बँटन, हॅरी बूक, बेन डकेट, जेमी ओवरटन, आदिल रशिद, डेविड विली, क्रिस वोक्स, लॉकी फर्ग्युसन, गेराल्ड कोएत्झी, रिले रोसू, रॉसी वान डर डुसेन, अँजेलो मैथ्यूज.
१.५ कोटी बेस प्राइज असलेले खेळाडू
मोहम्मद नबी, मॉईझेस हेनरिक्स, ख्रिस लिन, केन रिचर्ड्सन, डॅनियल सॅम्स, डॅनियल वोरल, टॉम करन, मर्चेंट डी लांगे, ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, टाइमल मिल्स, फिल सॉल्ट, कोरी अँडरसन, कॉलिन मुन्रो, जिमी नीशम, टिम साउदी, कॉलिन इंग्राम, वानिदू हसरंगा, जेसन होल्डर, शेरफेन रुदरफोर्ड.
१ कोटी बेस प्राइज असलेले खेळाडू
अॅश्टन एगर, रिले मेरिडिथ, डासर्सी शॉर्ट, अॅश्टन टर्नर, गस अॅटकिसन, सॅम बिलिंग्स, माइकल ब्रेसवेल, मार्टिन गुप्तिल, काइल जेमीसन, अॅडम मिल्ने, डॅरिल मिशेल, वेन पार्नेल, डेन प्रिटोरियस, अल्झारी कतो. जोसेफ, रोवमन पॉवेल, डेव्हिड वीजे.