IPL Final : X फॅक्टर अन् ‘ते’ 5 खेळाडू गेम चेंजर ठरणार?; चेन्नई सुपर किंग्जच्या ‘त्या’ खेळाडूंकडे सर्वांचं लक्ष

| Updated on: May 28, 2023 | 10:08 AM

चेन्नईचे पाच खेळाडू अत्यंत तगडे आहेत. हे पाचही खेळाडू सामन्याचं रुप पालटू शकतात. सामना फिरवू शकतात, एवढी ताकद या खेळाडूंमध्ये आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातील या खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

IPL Final : X फॅक्टर अन् ते 5 खेळाडू गेम चेंजर ठरणार?; चेन्नई सुपर किंग्जच्या त्या खेळाडूंकडे सर्वांचं लक्ष
ipl 2023
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

अहमदाबाद : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स दरम्यान आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम महामुकाबला होणार आहे. चेन्नईचा संघ दहा वेळा फायनलमध्ये गेला आहे. तर गुजरातचा संघ दुसऱ्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये खेळणार आहे. विशेष म्हणजे चेन्नई चारवेळा आयपीएलचा विजेता ठरलेला आहे. तर गुजरात एक वेळी आयपीएल चॅम्पियन ठरला आहे. त्यामुळे आजचा सामना अत्यंत रोमहर्षक ठरणार आहे. त्यामुळेच गुजरात जिंकणार की चेन्नई याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

एमएस धोनी याच्या नेतृत्वाखालील चेन्नईचा संघ अत्यंत मजबूत स्थित आहेत. चेन्नईचे पाच खेळाडू अत्यंत तगडे आहेत. हे पाचही खेळाडू सामन्याचं रुप पालटू शकतात. सामना फिरवू शकतात, एवढी ताकद या खेळाडूंमध्ये आहे. त्यामुळे आजच्या दिवशी हे पाच खेळाडू काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हे सुद्धा वाचा

ऋतुराज गायकवाड

या सीजनमध्ये चेन्नईला अंतिम सामन्यापर्यंत आणण्यात ऋतुराज गायकवाडचं मोठं योगदान राहिलं आहे. गायकवाडने या सीजनमध्ये आतापर्यंत 15 सामन्यात 564 धावा केल्या आहेत. कॉनवेच्या साथीने ऋतुराज चेन्नईच्या डावाला सुरुवात करतो. सलामीचा फलंदाज म्हणून गायकवाड यशस्वी राहिला आहे. त्यामुळे आता फायनलमधील त्याच्या परफॉर्मन्सकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे.

डेवोन कॉनवे

या सीजनमध्ये डेवोन कॉनवेनेही दमदार फलंदाजी केली आहे. त्याला 15 पैकी 14 सामने खेळता आले आहेत. या 14 सामन्यात त्याने 625 धावा केल्या आहेत. त्यामुळे आजच्या त्याच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एवढंच नव्हे तर आज कॉनवे मोठी खेळी करेल अशी आशा सर्वांनाच वाटत आहे. खेळपट्टीवर सर्वाधिक काळ टिकून राहणं ही कॉनवेची खासियत आहे. आजही तो हीच परंपरा सुरू ठेवतो का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तो जर आज खेळपट्टीवर टिकला तर सामन्याचा नूरच बदलेलं असं सांगितलं जात आहे.

शिवम दुबे

शिवम हा धोनी ब्रिगेडमधील आणखी एक तगडा फलंदाज आहे. वेगाने धावा कुटून सामना पूर्णपणे पालटवण्यात त्याची खासियत आहे. या सीजनमध्ये धोनीचा त्याच्यावर संपूर्ण विश्वास राहिला आहे. आता फायनलमध्येही धमाल करून धोनीच्या विश्वासाला पात्र होण्याची त्याला आयतीच संधी मिळाली आहे. शिवमचं एक वैशिष्ट्ये म्हणजे उत्तुंग षटकार मारणं. उत्तुंग षटकारबाजीत त्याचा हातखंडा आहे. त्यामुळे आज प्रेक्षकांना षटकारांची आतषबाजी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

आयपीएलमध्ये शिवमने 158.85च्या रनरेटने धावा कुटल्या आहेत. त्याने 15 सामन्यात 386 धावा केल्या आहेत. त्यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 33 षटकार लगावले आहेत.

दीपक चाहर

दीपक चाहर हा धोनी ब्रिगेडमधील महत्त्वाचा गोलंदाज आहे. सामना सुरु होताच विकेट बाद करण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल. सुरुवातीलाच विकेट घेतल्या तर गुजरातवर दबाव येईल आणि सामना पूर्णपणे चेन्नईच्या हातात येईल. त्यामुळे चाहरला त्या पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे. या सीजनमध्ये चाहरने चांगली कामगिरी केली आहे. त्याने 9 मॅचमध्ये 12 बळी घेतले आहेत.

मथिशा पथिराना

आजच्या सामन्यात बेबी मलिंगावर सर्वांची नजर असणार आहे. मथिशा पथिराना धोनीसाठी अत्यंत खास खेळाडू आहे. डेथ ओव्हरमध्ये टिच्चून गोलंदाजी करत फलंदाजांना घाम फोडण्यात मथिशा फेमस आहे. धोनी आज गुजरातच्या विरोधातील शेवटची षटकं मथिशाच्याच हाती सोपवण्याची शक्यता आहे. मथिशाने 1 सामन्यात 17 बळी घेतले आहेत.

X फॅक्टर

या सामन्यात जडेजाही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. जडेजा अष्टपैलू खेळाडू आहे. तो संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या खेळाडूंसह चेन्नईसाठी सर्वात मोठा X फॅक्टर स्वत: एमएस धोनी आहे. मोठ्या सामन्यात आणि अटीतटीच्या सामन्यात धोनीचे डावपेच नेहमीच उपयोगाचे ठरले आहेत. या मॅचममध्येही धोनी तगडे डावपेच आखण्याची शक्यता आहे. धोनी फॅक्टरमुळे सीएसके आज चॅम्पियन ठरू शकतो.