IPL 2024 Final : तिकीटाची विक्री सुरू; कितीला आहे सर्वात स्वस्त तिकीट?

आयपीएलच्या पहिला प्लेऑफ सामना आज रंगणार आहे. जे दोन संघ प्लेऑफचा सामना जिंकतील ते दोन संघ आयपीएलच्या फायनल सामन्यात धडक देणार आहे. पण ज्यांना मैदानावर जाऊन या सामन्याची मज्जा घ्यायची आहे त्यांच्यासाठी तिकीट विक्री सुरु झाली आहे. पाहा किती आहे त्याची किंमत.

IPL 2024 Final : तिकीटाची विक्री सुरू; कितीला आहे सर्वात स्वस्त तिकीट?
Follow us
| Updated on: May 21, 2024 | 5:19 PM

IPL 2024 Final : आजपासून IPL 2024 चा प्लेऑफ टप्पा सुरू होत आहे. पहिल प्ले ऑफचा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात रंगणार आहे तर दुसरा सामना राजस्थान रॉयल्स (RR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) यांच्यात होणार आहे. तर या दोन्ही सामन्यात जो संघ जिंकेल त्यांच्यात अंतिम सामना होणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना 26 मे रोजी चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे खेळवला जाणार आहे. त्यामुळे फायनल सामन्याची मज्जा घेण्यासाठी ज्या क्रिकेट प्रेमींना मैदानावर जाऊन सामना पाहायचा आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण IPL 2024 फायनलच्या तिकिटांची विक्री सुरू झाली आहे. या अंतिम सामन्याची तिकिटे कशी खरेदी करू शकता जाणून घ्या.

कोणामध्ये रंगणार सामना?

सर्वात स्वस्त आणि महाग तिकीट किती असेल हे देखील आपण जाणून घेणार आहेत. KKR विरुद्ध SRH आणि RR विरुद्ध RCB हे यांच्यात जो संघ जिंकेल ते अंतिम फेरीत पोहोचणार आहेत.

आयपीएल 2024 च्या फायनलसाठी विक्री होत असलेल्या तिकीटांची सुरुवातीची किंमत 3,500 रुपये ठेवण्यात आली आहे आणि स्टँडनुसार, सर्वात महाग तिकिटाची किंमत 7,500 रुपये निश्चित करण्यात आली आहे. आता सध्या फक्त रुपे कार्ड असलेल्या लोकांनाच ती खरेदी करता येणार आहे. इतर सर्व लोकांसाठी उद्यापासून तिकिटांची विक्री सुरू होणार आहे.

आयपीएल 2024 अंतिम तिकीट कसे खरेदी करावे?

पेटीएम इनसाइडर मोबाइल ॲपवर जाऊन तुम्ही फायनल सामन्याची तिकीट खरेदी करू शकता. तुम्हाला तिकीट बुक करण्याची प्रक्रिया जाणून घ्यायची असेल तर ती खालील प्रमाणे आहे.

सर्वात प्रथम पेटीएम इनसाइडर ॲप डाउनलोड करा आणि नंतर ‘चेन्नई’ शहर निवडा कारण अंतिम सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळवला जाणार आहे.

शहरावर क्लिक केल्यानंतर, आयपीएल 2024 फायनलचा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा. फायनल मॅच टॅबवर क्लिक केल्यानंतर ‘Buy Now’ चा पर्याय दिसेल.

तुम्ही स्टेडियममधील उपलब्ध जागांमधून तुमच्या आवडीनुसार कोणतीही जागा निवडू शकता. आसनांची संख्या निश्चित केल्यानंतर तुम्हाला ‘Add to Cart’ वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला पेमेंट करावे लागेल आणि तुमचे ई-तिकीट त्वरित बुक केले जाईल.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.