RCB vs CSK IPL 2022: बँगलोरने धोनीच्या चेन्नईला धुळ चारली, Must Watch Video
RCB vs CSK IPL 2022: RCB ने दोन महत्त्वपूर्ण पॉइंटस मिळवले. प्लेऑफच्या (Playoff) दिशेने एक दमदार पाऊल टाकलं आहे. या पराभवामुळे चेन्नईचा प्लेऑफचा मार्ग अधिक खडतर झाला आहे.
मुंबई: IPL 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने सहावा विजय मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्सला (RCB vs CSK) नमवून RCB ने दोन महत्त्वपूर्ण पॉइंटस मिळवले. प्लेऑफच्या (Playoff) दिशेने एक दमदार पाऊल टाकलं आहे. या पराभवामुळे चेन्नईचा प्लेऑफचा मार्ग अधिक खडतर झाला आहे. आरसीबीने हा सामना 13 धावांनी जिंकला. बँगलोरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात आठ बाद 173 धावा केल्या होत्या. चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super kings) विजयासाठी 174 धावांचे टार्गेट होते. पण त्यांना आठ बाद 160 धावाच करता आल्या. आज चेन्नई खराब खेळ केला असं नाहीय. पण बँगलोरने फलंदाजी आणि गोलंदाजीत सीएसके पेक्षा जास्त चांगला खेळ दाखवला, त्यामुळे ते जिंकले. आरसीबीने आज सांघिक प्रदर्शनाच्या बळावर विजय मिळवला. चेन्नईचा स्पर्धेतील हा सातवा पराभव आहे.
RCB vs CSK क्लिक करुन पहा मॅच मधील सुपर सिक्सेस
चेन्नईच्या पराभवाचं कारण काय?
चेन्नईने 174 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पावरप्लेमध्ये 51 रन्स धावफलकावर लावले. पण ठराविक अंतराने त्यांचे विकेट पडत होते. तेच त्यांच्या पराभवाचं मुख्य कारण ठरलं. चेन्नईकडून डेवन कॉनवेने 37 चेंडूत सर्वाधिक 56 धावा केल्या. कॉनवेचं स्पर्धेतील हे दुसरं अर्धशतक आहे. ऋतुराज गायकवाड आणि कॉनवेने 54 धावाची सलामी दिली. पण त्यानंतर चांगली भागीदारी होऊ शकली नाही. तेच त्यांच्या पराभवाचं कारण ठरलं. ऋतुराज गायकवाडने (28), मोइन अलीने (34) धावा केल्या.
हर्षल पटेल-जोश हेझलवूडची जबरदस्त गोलंदाजी
हर्षल पटेल आरसीबीकडून यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात 35 धावा देत तीन विकेट घेतल्या. जोश हेझलवूडसह अन्य गोलंदाजांनीही टिच्चून गोलंदाजी केली. हेझलवूडने एक विकेट घेतला. पण त्याने चार षटकात फक्त 19 धावा दिल्या.
Back to winning ways on Derby Day! ???
Extremely crucial 2️⃣ points in the bag. ✅
Let’s take this momentum forward now! ??#PlayBold #WeAreChallengers #IPL2022 #Mission2022 #RCB #ನಮ್ಮRCB #RCBvCSK pic.twitter.com/mxqVACaRcE
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) May 4, 2022
RCB vs CSK पहा स्पेशल Highlights
बँगलोरची चांगली सुरुवात, पण…
बँगलोरसाठी विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिसने चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. डू प्लेसिसच्या रुपाने बँगलोरचा पहिला विकेट गेला. त्याने 38 धावा केल्या. मोइन अलीच्या गोलंदाजीवर जाडेजाने त्याला झेल घेतला. विराट कोहलीला आज सूर गवसलाय असं वाटत होतं. तो फॉर्ममध्ये दिसत होता. पण मोइन अलीच्या एका अप्रतिम चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. विराटने 33 चेंडूत 30 धावा केल्या, यात तीन चौकार आणि एक षटकार होता. ग्लेन मॅक्सवेल 3 धावांवर रनआऊट झाला. 80 धावात आरसीबीचे आधाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले होते.