Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs GT IPL Match Result : कशामुळे गुजरात टायटन्सने चौथा विजय मिळवला? राजस्थान रॉयल्सचं काय चुकलं? समजून घ्या…

RR vs GT IPL Match Result : आयपीएलच्या (IPL) 24 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानवर (RR vs GT) 37 धावांनी ‘रॉयल’ विजय मिळवला. हार्दिक पंड्या या विजयाचा हिरो आहे.

RR vs GT IPL Match Result : कशामुळे गुजरात टायटन्सने चौथा विजय मिळवला? राजस्थान रॉयल्सचं काय चुकलं? समजून घ्या...
गुजरात टायटन्स पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानीImage Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 14, 2022 | 11:50 PM

मुंबई: आयपीएलच्या (IPL) 24 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने राजस्थानवर (RR vs GT) 37 धावांनी ‘रॉयल’ विजय मिळवला. हार्दिक पंड्या या विजयाचा हिरो आहे. आज त्याने कॅप्टन इनिंग्सचा खेळ दाखवला. गुजरातने राजस्थानला विजयासाठी 193 धावांचे लक्ष्य दिले होते. पण राजस्थानला निर्धारीत 20 षटकात नऊ बाद 155 धावाच करता आल्या. गुजरातकडून लॉकी फर्ग्युसन आणि डेब्यू करणारा डावखुरा वेगवान गोलंदाज यश दयालने (yash Dayal) प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. या विजयासह गुजरात टायटन्सचा संघ पॉइंटस टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आयपीएल स्पर्धेतील गुजरात टायटन्सचा हा पाच सामन्यांपैकी चौथा विजय आहे. राजस्थान रॉयल्सचा हा दुसरा पराभव आहे. राजस्थानने दमदार सुरुवात केली होती. पण ती लय त्यांना कायम राखता येत नाहीय.

  1. गुजरातच्या विजयाचं श्रेय हार्दिक पंड्याच आहे. कारण दोन बाद 15 अशी स्थिती असताना हार्दिक पंड्या मैदानात आला होता. तो शेवटपर्यंत खेळपट्टीवर उभा राहिला हे गुजरातच्या विजयाचं मुख्य कारण आहे. मैदानात असताना त्याने डावाला आकार दिला आणि जम बसल्यानंतर फटकेबाजी सुद्धा केली. 52 चेंडूत नाबाद 87 धावा करताना त्याने आठ चौकार आणि चार षटकार लगावले.
  2. गुजरात टायटन्सकडून आज दोन महत्त्वपूर्ण भागीदाऱ्या झाल्या. हार्दिक आणि अभिनव मनोहरमध्ये चौथ्या विकेटसाठी 86 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर मिलर सोबत पाचव्या विकेटसाठी नाबाद 53 धावा जोडल्या. अभिनवने 28 चेंडूत 43 धावा फटकावल्या. यात चार चौकार आणि दोन षटकार होते. डेविड मिलरने आज जबरदस्त फलंदाजी केली. त्याने 14 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. यात पाच चौकार आणि एक षटकार होते.
  3. ट्रेट बोल्ट आज दुखापतीमुळे राजस्थान रॉयल्सकडून खेळू शकला नाही. त्याचा राजस्थान रॉयल्सला मोठा फटका बसला. कुलदीप सेन आज महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात 51 धावा देऊन फक्त एक विकेट घेतली.
  4. गुजरातच्या विजयाचं श्रेय लॉकी फर्ग्युसनलाही जातं. तुफान बॅटिंग करणाऱ्या बटलरला फर्ग्युसनने क्लीन बोल्ड केलं. जोस बटलरने 24 चेंडूत 54 धावा केल्या. यात आठ चौकार आणि तीन षटकार होते.
  5. पावरप्लेच्या सहा षटकात राजस्थानच्या तीन बाद 65 धावा झाल्या आहेत. चांगली सुरुवात मिळाली होती. पण बटलर आऊट झाल्यानंतर कॅप्टन संजू सॅमसनसह एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकून मोठी खेळी करु शकला नाही. भागीदाऱ्या झाल्या नाहीत.

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान
राज्यात अवकाळी पावसाची हजेरी, शेती पिकांचं नुकसान.
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?
कांदा निर्यात शुल्क रद्द, पण अंमलबजावणी कधी?.
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप
बीड कारागृहात उरली फक्त कराड गँग; आठवले आणि गीते गँगचे गंभीर आरोप.
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला
प्रशांत कोरटकरला कोल्हापूर न्यायालयाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला.
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप
एकाच दिवसात 183 जीआर आणि कोट्यवधींच्या निधीचे वाटप.
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.