SRH vs GT Match Result: आज ती खूप आनंदी असेल, हार्दिक पंड्याच्या गुजरात टायटन्सचं काय चुकलं?
SRH vs GT Match Result: इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) नवीन संघ असलेल्या गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) विजयी अभियानाला अखेर आज ब्रेक लागला.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL) नवीन संघ असलेल्या गुजरात टायटन्सच्या (Gujarat Titans) विजयी अभियानाला अखेर आज ब्रेक लागला. डी.वाय.पाटील स्टेडियमवर आज झालेल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) गुजरात टायटन्सवर आठ विकेट राखून विजय मिळवला. गुजरातने याआधी विजयाची हॅट्ट्रिक केली आहे. त्यांनी सर्वप्रथम लखनौ सुपर जायंट्स त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स या संघांवर विजय मिळवले होते. आज सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मात्र त्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. सनरायजर्स हैदराबादचा संघ यंदाच्या सीजनमध्ये विशेष फॉर्ममध्ये नाहीय. पहिले दोन सामने त्यांनी गमावले होते. शनिवारी चेन्नई सुपर किंग्स आणि आज गुजरात टायटन्सवर त्यांनी विजय मिळवला. हा त्यांचा सलग दुसरा विजय आहे. SRH च्या विजयामुळे या संघाची मालकीण काव्या मारन नक्कीच आनंदी असेल. हैदराबादच्या प्रत्येक सामन्याच्यावेळी काव्या मारनची देखील सोशल मीडियावर चर्चा होते.
- गुजरात टायटन्सची पहिली विकेट लवकर गेली. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला सलामीवर शुभमन गिल लवकर 7 धावांवर OUT झाला. मागच्या दोन सामन्यात त्याने मॅच विनिंग हाफ सेंच्युरी झळकावली होती. तो खेळपट्टीवर टिकला असता, तर गुजरात टायटन्सला चांगली सुरुवात मिळाली असती.
- हार्दिक पंड्या चांगला कॅप्टन इनिंग्स खेळला पण त्याला सलामीवर मॅथ्यू वेड, डेविड मिलर या परदेशी फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही. दोघांच्या कामगिरीत सातत्य नाहीय. त्याचा फटका गुजरात टायटन्स संघाला बसतोय.
- गुजरात टायटन्सचे गोलंदाज सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेट काढतात. पण आज मोहम्मद शमीला तशी गोलंदाजी करता आली नाही. अभिषेक शर्मा आणि केन विलियमसनने आठ षटकात 64 धावांची सलामी दिली.
- लॉकी फर्ग्युसनने याआधीच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली आहे. पण आज त्याला चांगलाच मार बसला. लॉकीने आज चार षटकात 46 धावा दिल्या पण एकही विकेट काढली नाही.