IPL Media Rights मुळे फ्रेंचायजींची चांदी, प्रत्येक टीम 500 कोटीने श्रीमंत, समजून घ्या किती आणि कसा पैसा मिळणार?

IPL Media Rights : मीडिया राइट्समधून झालेल्या बम्पर कमाईचा बीसीसीआय बरोबर आयपीएल फ्रेंचायजींनाही तितकाच फायदा होणार आहे. IPL 2023 पासून फ्रेंचायजींच्या मीडिया राइट्समधून मिळणाऱ्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ होणार आहे. इ

IPL Media Rights मुळे फ्रेंचायजींची चांदी, प्रत्येक टीम 500 कोटीने श्रीमंत, समजून घ्या किती आणि कसा पैसा मिळणार?
ipl team owners
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 11:07 AM

मुंबई: जगातील श्रीमंत क्रिकेट बोर्डांपैकी एक असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे BCCI च्या संपत्तीत आणखी वाढ झाली आहे. IPL Media Rights च्या ई-लिलावातून बीसीसीआय आणखी धनाढ्य बनलं आहे. बीसीसीआयने एकूण चार पॅकेजेसमध्ये मीडिया राइट्सची विभागणी केली होती. रिलायन्स समूहातील वायकॉम 18 (Viacom 18) ने डिजिटल प्रसारणाचे हक्क 20,500 कोटींना विकत घेतले. पॅकेज सी चे अधिकारही 2991 कोटींना वायकॉम 18 ने विकत घेतले. डिज्नी स्टारने भारतीय उपखंडासाठीचे टीवी हक्क 23,575 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. पॅकेज डी मध्ये प्रतिसामना बेस प्राइस 3 कोटी रुपये होती. यात परदेशातील प्रसारण हक्क आणि डिजिटल राइट्सचा समावेश होता. वायकॉम 18 आणि टाइम्स इंटरनेटला 1324 कोटींना हे हक्क विकले गेले. बीसीसीआयने या लिलावातून एकूण 48,390 कोटींची कमाई केली आहे.

बम्पर कमाईचा IPL फ्रेंचायजींना फायदा

मीडिया राइट्समधून झालेल्या बम्पर कमाईचा बीसीसीआय बरोबर आयपीएल फ्रेंचायजींनाही तितकाच फायदा होणार आहे. IPL 2023 पासून फ्रेंचायजींच्या मीडिया राइट्समधून मिळणाऱ्या उत्पन्नात दुप्पटीने वाढ होणार आहे. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलं आहे. आयपीएलमधल्या दहाही फ्रेंचायजींना याचा फायदा होणार आहे. प्रत्येक फ्रेंचायजीला मीडिया राइट्समधून मिळणारा महसूल 500 कोटींनी वाढणार आहे.

फ्रेंचायजींना किती फायदा होईल?

आयपीएल फ्रेंचायजी मालकांची फक्त तिजोरीच भरणार नाहीय, तर वाढलेल्या उत्पन्नामुळे संघाचं मुल्य देखील एका उंचीवर पोहोचणार आहे. 10 पैकी 7 आयपीएल संघांच मुल्य आधीच 1 अब्ज डॉलरच्या पुढे आहे. मीडिया राइट्समधून महसूल 196 टक्क्यांनी वाढलाय. नुकत्याच संपलेल्या सीजनमध्ये आयपीएलमधील प्रती सामन्याचे मुल्य 54 कोटी रुपये होते, तेच आता 118 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. आयपीएल मधील सर्व संघांना मीडिया राइट्समधून वाटा मिळणार आहे. बीसीसीआय केलेल्या कॉन्ट्रॅक्टनुसार, ते मीडिया राइट्स आणि स्पॉन्सरशिपमधून मिळणारं 50 टक्के उत्त्पन्न फ्रेंजायचींसोबत शेअर करतात.

हे सुद्धा वाचा

फ्रेंचायजींना आणखी कुठून कमाई होते?

फ्रेंचायजींना संघांसाठी स्वतंत्र स्पॉन्सरशिप मिळते, त्यातून सुद्धा त्यांना पैसा मिळतो. तिकीट विक्री आणि अन्य सुद्धा कमाईचे मार्ग आहेत. सेंट्रल पुलमधून त्यांच्या तिजोरीत जास्त रक्कम जमा होते. बीसीसीआयला 48,390 कोटी रुपये मिळणार आहेत, त्यातील निम्मी रक्कम 10 संघांमध्ये वाटली जाईल.

मीडिया राइट्समुळे प्रत्येक फ्रेंचायजीला किती रक्कम मिळेल?

IPL 2022: फ्रेंचायजींना मीडिया राइट्समधून 201.65 कोटी रुपये मिळाले IPL 2023: प्रत्येक फ्रेंचायजीला पुढच्यावर्षी मीडिया राइट्समधून 436.6 कोटी रुपये मिळतील. IPL 2025: यावर्षी प्रत्येक फ्रेंचायजीला मीडिया राइट्समधून 495.6 कोटी रुपये मिळतील. IPL 2027: यावर्षी प्रत्येक फ्रेंचायजीला 554.6 कोटी रुपये मिळतील.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.