Unsold ठरलेल्या अमित मिश्राला दिल्ली कॅपिटल्सचे मालक म्हणाले, ‘तू तर…’

IPL 2022 Auction: IPL : 2022 च्या महा लिलावात या लीगचे (IPL 2022 Mega Auction) दिग्गज मानले जाणारे अनेक खेळाडू होते आणि त्यांनी स्वत:ला याआधीच सिद्ध केलं आहे. पण या हंगामात त्यांना एकही खरेदीदार मिळाला नाही. असेच एक नाव आहे अमित मिश्रा (Amit Mishra).

Unsold ठरलेल्या अमित मिश्राला दिल्ली कॅपिटल्सचे मालक म्हणाले, 'तू तर...'
Amit Mishra
Follow us
| Updated on: Feb 14, 2022 | 3:48 PM

मुंबई : IPL-2022 च्या महा लिलावात या लीगचे (IPL 2022 Mega Auction) दिग्गज मानले जाणारे अनेक खेळाडू होते आणि त्यांनी स्वत:ला याआधीच सिद्ध केलं आहे. पण या हंगामात त्यांना एकही खरेदीदार मिळाला नाही. असेच एक नाव आहे अमित मिश्रा (Amit Mishra). भारताचा अनुभवी फिरकीटू अमित मिश्रा आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स संघाचा एक महत्त्वाचा भाग होता आणि सतत योगदान देत होता परंतु मिशी भाई म्हणून प्रसिद्ध असलेला हा खेळाडू यावेळी आयपीएलमध्ये विकला गेला नाही. यानंतर दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदाल (Parth Jindal) यांनी ट्विटरवर त्याची आठवण काढली आणि म्हणाले की, मिशी भाई दिल्ली कॅपिटल्स ही टीम कायम तुमचीच असेल. यावेळी अमित मिश्राने त्याची बेस प्राईस 1.5 कोटी रुपये ठेवली होती. मात्र हा खेळाडू कोणीही खरेदी केला नाही.

अमित मिश्राने आयपीएलमध्ये 154 सामने खेळले आहेत आणि त्यात 166 विकेट घेतल्या आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.

अमित मिश्रा परत आला तर आम्हाला आनंद होईल असे पार्थ जिंदाल यांनी म्हटले आहे. पार्थ यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “आयपीएलमधल्या महान खेळाडूंपैकी एक अमित, तू गेल्या काही वर्षांत जे काही केलं आहेस त्याबद्दल आम्ही तुला सलाम करतो. तू आमच्यासाठी खूप मौल्यवान आहेस, त्यामुळे तुझ्यासाठी योग्य असलेल्या कोणत्याही भूमिकेत तुला आमच्या संघात पुन्हा सहभागी करून घेण्यास आम्हाला आनंद होईल. मिशी भाई दिल्ली कॅपिटल्स ही कायम तुमची टीम आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅटट्रिक

अमित मिश्राच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक हॅट्ट्रिक्स आहेत. त्याने आतापर्यंत तीन हॅटट्रिक घेतल्या आहेत. त्याने आयपीएलच्या पहिल्या सत्रात त्याने हॅटट्रिक घेतली होती. त्यानंतर तो दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून (आता दिल्ली कॅपिटल्स) खेळत होता. यानंतर 2011 मध्ये डेक्कन चार्जेसमध्ये असताना त्याने हॅटट्रिक घेतली. 2013 मध्येही त्याने हॅट्ट्रिक केली होती. यावेळी तो सनरायझर्स हैदराबादसोबत होता. त्याने आयपीएलमध्ये चार वेळा चार विकेट घेतल्या आहेत. 27 एप्रिल 2021 रोजी त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरसाठी शेवटचा सामना खेळला. या सामन्यात त्याने तीन षटके टाकली आणि 27 धावांत एक विकेट घेतली.

इतर बातम्या

खेळाडूंची किंमत वाढवतो, पण घेत तर नाही! कोणंय हा, जो खाली करतोय प्रतिस्पर्ध्यांची कोटींची पर्स?

DC IPL 2022 Auction: ‘त्या’ माणसाने किंमत वाढवून दुसऱ्यांची पर्स रिकामी केली पण स्वत: कमी बजेटमध्ये बांधला दिल्लीचा उत्तम संघ

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.