IPL 2022 play of venues: ‘या’ दोन शहरात होणार प्लेऑफचे सामने, BCCI ने केली प्लानिंग

IPL 2022 play of venues: आयपीएलचे लीग स्टेजचे (IPL 2022) सर्व सामने महाराष्ट्रातील चार स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहेत. मुंबई शिवाय पुण्यातील एका स्टेडियममध्ये लीग स्टेजचे सामने खेळवले जात आहेत.

IPL 2022 play of venues: 'या' दोन शहरात होणार प्लेऑफचे सामने, BCCI ने केली प्लानिंग
आयपीएल प्लेऑफ सामने Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Apr 04, 2022 | 5:45 PM

मुंबई: आयपीएलचे लीग स्टेजचे (IPL 2022) सर्व सामने महाराष्ट्रातील चार स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आले आहेत. मुंबई शिवाय पुण्यातील एका स्टेडियममध्ये लीग स्टेजचे सामने खेळवले जात आहेत. मुंबईच्या वानखेडे, ब्रेबॉर्न, डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये सामने खेळले जात आहेत. पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवरही सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. प्लेऑफचे (IPL playoff) सामने कुठे खेळवले जाणार? ते अद्यापपर्यंत बीसीसीआयने सांगितलेलं नाही. स्पोर्टस तकच्या वृत्तानुसार, बीसीसीआय (BCCI) अहमदाबाद आणि लखनौ या दोन शहरांमध्ये प्लेऑफचे सामने आयोजित करण्याचा विचार करत आहे. लखनौ आणि अहमदाबादचे संघ यावर्षीच आयपीएलमध्ये खेळत असून त्यामुळे तिथे सामने आयोजित करणं चांगलं राहिलं, असे स्पोर्ट्स तकने सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे.

अशी आहे प्लानिंग

क्वालिफायर आणि एलिमिनेटरचा पहिला सामना लखनौमध्ये खेळवला जाईल. एलिमिनेटरचा दुसरा सामना आणि फायनल मॅच अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. “काही दिवसांपूर्वीच आम्ही या मुद्यावर चर्चा केली आहे. काही अधिकारी एकसारखाच विचार करतात. काही दिवसात आमची बैठक होईल. सगळं काही व्यवस्थित राहिलं, तर लखनौ आणि अहमदाबादमध्ये प्लेऑफचे सामने होतील” असं सूत्रांनी सांगितलं.

बायो बबलमध्ये लीग

आयपीएल 2022 चं आयोजन यंदाही बायोबबलमध्ये केलं जात आहे. दोन वर्षानंतर यंदाचा सीजन पूर्णपणे भारतात होत आहे. 2020 मध्ये कोविडमुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजन करण्यात आले होते. 2021 च्या सुरुवातीला भारतात ही लीग आयोजित करण्यात आली होती. पण मध्येच बायोबलमध्ये कोरोनाने घुसखोरी केली. त्यामुळे स्पर्धा मध्येच स्थगित करण्यात आली. यूएईमध्ये आयपीएलचे आयोजन करावे लागले.

फॉरमॅटमध्ये मोठा बदल

आयपीएल 15 च्या सीजनमध्ये आठ ऐवजी दहा संघ सहभागी झाले आहेत. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्सचे संघ या लीगमध्ये पहिल्यांदा खेळत आहेत. लीगचा फॉरमॅट सुद्धा बदलण्यात आला आहे. लीग स्टेजमध्ये एकूण 70 सामने होणार आहेत. सर्वच संघ आपल्या ग्रुपमधील टीमसोबत दोन-दोन सामने खेळणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.