IPL Points Table 2022: फॉर्म मध्ये असलेल्या लखनौ सुपर जायंट्सवर संकट, लीग स्टेजमध्येच बाहेर होण्याचा धोका

IPL Points Table 2022: RR च्या विजयाने पॉइंट्स टेबलच समीकरण बदलल आहे. गुजरातचा फायदा झाला आहे. गुजरातची टीम आता पहिल्या नंबरवरच कायम राहणार आहे.

IPL Points Table 2022: फॉर्म मध्ये असलेल्या लखनौ सुपर जायंट्सवर संकट, लीग स्टेजमध्येच बाहेर होण्याचा धोका
gt vs rrImage Credit source: bcci
Follow us
| Updated on: May 16, 2022 | 12:27 PM

मुंबई: IPL 2022 मध्ये रविवारी डबल हेडरचे दोन सामने झाले. पण कालही प्लेऑफमध्ये (Play off) दाखल होणारा दुसरा संघ ठरला नाही. गुजरात टायटन्सची (Gujarat Titans) टीम आधीच प्लेऑफमध्ये दाखल झाली आहे. रविवारी आणखी एका विजयासह त्यांनी आपलं पहिलं स्थान कायम राखलं. दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवला. राजस्थानच्या विजयामुळे गुजरातचा फायदा झाला. लखनौच्या पराभवामुळे गुजरातच्या संघाला आता पहिल्या स्थानावरुन कोणीही हटवू शकत नाही. लखनौचा सलग दुसरा पराभव झाला. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या लखनौ संघाचं आता लीगमध्येच आव्हान संपुष्टात येऊ शकतं. रविवारी पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने सीएसकेवर सहज विजय मिळवला. गुजरातने सीएसकेच्या टीमला फक्त 133 धावांवर रोखलं. त्यानंतर 7 विकेटने विजय मिळवला. गुजरातचे एकूण 20 पॉइंटस झाले आहेत.

गुजरात नंबर 1 वरच रहाणार

सीएसकेवरील विजयामुळे गुजरातच्या संघाला दुसऱ्या स्थानावरुन कोणीही हलवू शकणार नाही, हे सुनिश्चित झालं होतं. त्यानंतर राजस्थानच्या विजयामुळे गुजरात टायटन्सचं पहिलं स्थान कायम राहणार हे स्पष्ट झालं.

राजस्थानच्या विजयामुळे गुजरातचा फायदा

लखनौने कालचा सामना जिंकला असता, तर त्यांना प्लेऑफमध्ये दाखल होण्याची संधी होती. आधी गुजरातकडून पराभूत झाल्यामुळे ही संधी हुकली होती. काल राजस्थानकडून पराभूत झाल्यामुळे अजून त्यांना वाट पहावी लागणार आहे. राजस्थानने दिलेलं 179 धावांच लक्ष्य राहुलच्या संघाला पेलवलं नाही. लखनौचा 13 वा सामना होता. त्यामुळे लखनौचे जास्तीत जास्त 18 पॉइंटस होऊ शकतात. त्यामुळे गुजरातचं पहिलं स्थान कायम रहाणार आहे.

हे सुद्धा वाचा

IPL पॉइंट्स टेबल

संघ सामने जय पराजय पॉइंट्स नेट रन रेट
गुजरात टायटन्स 14104200.316
राजस्थान रॉयल्स 1495180.298
लखनौ सुपर जायंट्स1495180.251
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 148616-0.253
दिल्ली कॅपिटल्स 1477140.204
पंजाब किंग्स 1477140.126
कोलकाता नाइट रायडर्स1468120.146
सनरायजर्स हैदराबाद 146812-0.379
चेन्नई सुपर किंग्स 144108-0.203
मुंबई इंडियन्स144108-0.506

लखनौला हटवून राजस्थान दुसऱ्यास्थानी

या विजयामुळे राजस्थानला 2 पॉइंटस मिळाले आहेत. त्यांनी लखनौशी बरोबरी केली आहे. दोन्ही संघांचे समान 16 पॉइंट्स आहेत. राजस्थानच्या नेट रनरेटमध्ये सुधारणा झाली आहे. त्यामुळे पॉइंटस टेबलमध्ये ते आता दुसऱ्या स्थानावर आहेत. पराभवामुळे लखनौचं नुकसान झालं आहे. चांगल्या स्थितीत असूनही लखनौच्या टीमवर स्पर्धेबाहेर होण्याचा धोका कायम आहे.

लखनौची टीम कशी बाहेर होऊ शकते, ते समजून घ्या

फक्त लखनौच नाही, तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्सही 16 पॉइंट्स पर्यंत पोहोचू शकतात. दिल्ली आणि पंजाबमध्ये कुठला एकच संघ इथपर्यंत पोहोचू शकतो. कारण दोन्ही टीम्सचा एक सामना बाकी आहे. बँगलोरला 2 पॉइंट्सची आवश्यकता असून त्यांचा गुजरात विरुद्ध सामना बाकी आहे. बँगलोरचा नेट रनरेट खराब आहे. RCB ने जर आपल्या शेवटच्या सामन्यात गुजरात वर मोठा विजय मिळवला आणि लखनौचा केकेआरने मोठ्या फरकाने पराभव केला, तर नेट रनरेटच्या आधारावर लखनौची टीम बाहेर होऊ शकते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.