IPL Points Table 2022: दिल्ली जिंकली, पॉइंटस टेबलच गणितच बदललं, तीन टीम्सचे समान 10 गुण, आता अजून ‘काँटे की टक्कर’
IPL Points Table 2022: काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि चेन्नई सुपर किंग्सच्या निकालाचा फटका हैदराबादला बसला होता. बँगलोरने चेन्नईला नमवल्यानंतर त्यांचे 12 पॉइंट झाले.
मुंबई: दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादला (DC vs SRH) नमवून प्लेऑफच्या दिशेने आणखी एक आश्वासक पाऊल टाकलं आहे. दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादवर 21 धावांनी विजय मिळवला. प्लेऑफच्या शर्यतीत पुढचा प्रवास थोडा सोपा करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सला आज विजय मिळवणं आवश्यक होतं. ते काम आज दिल्लीने चोख बजावलं. दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना डेविड वॉर्नर (David Warner) आणि रोव्हमॅन पॉवेलच्या (Rovman powell) फलंदाजीच्या बळावर तीन बाद 207 धावा केल्या. या डोंगराएवढच्या धावसंख्येचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादने निर्धारित 20 षटकात आठ बाद 186 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना SRH ची खराब सुरुवात झाली. सलामीवीर अभिषेक शर्माच्या रुपाने दुसऱ्याच ओव्हरमध्ये पहिली विकेट गेली. त्याने 7 धावा केल्या. कॅप्टन केन विलियमसनही अवघ्या 4 रन्सवर तंबूत परतला. 37 धावात हैदराबादचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले होते.
हैदराबादच्या विजयाची अंधुकशी आशा
पण एडन मार्कराम 25 चेंडूत 45 धावा आणि विकेटकिपर फलंदाज निकोलस पूरनने 34 चेंडूत 62 धावा यांनी प्रतिकार केला. पूरन खेळपट्टीवर असताना विजयाची अंधुकशी आशा निर्माण झाली होती. तो चांगली फटकेबाजी करत होता. पण धावगती वाढवण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. अखेरीस हैदराबादने 186 धावाच केल्या. 21 धावांनी दिल्लीने स्पर्धेतील पाचवा विजय नोंदवला. या विजयामुळे दिल्लीचे आता 10 पॉइंटस झाले आहेत. दिल्ली आणि एसआरएचचे समान पॉइंटस आहेत. पण सरस धावगतीमुळे दिल्ली हैदराबादच्या पुढे आहे. दिल्ली पाचव्या स्थानावर आहे. हैदराबाद सहाव्या क्रमांकावर आहे.
इथे क्लिक करुन मॅचच्या स्पेशल Highlights वर एक नजर मारा
पॉइंटस टेबलच समीकरण समजून घ्या
काल रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि चेन्नई सुपर किंग्सच्या निकालाचा फटका हैदराबादला बसला होता. बँगलोरने चेन्नईला नमवल्यानंतर त्यांचे 12 पॉइंट झाले. त्यामुळे ते चौथ्या स्थानावर पोहोचले आणि हैदराबादचा संघ पाचव्या स्थानावर आला. आज दिल्लीकडून पराभूत झाल्यामुळे हैदराबादच्या क्रमावारीत आणखी एका स्थानाची घसरण झाली आहे. आता ते सहाव्या पोझिशनवर आहेत.
IPL पॉइंट्स टेबल
संघ | सामने | जय | पराजय | पॉइंट्स | नेट रन रेट |
---|---|---|---|---|---|
गुजरात टायटन्स | 14 | 10 | 4 | 20 | 0.316 |
राजस्थान रॉयल्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.298 |
लखनौ सुपर जायंट्स | 14 | 9 | 5 | 18 | 0.251 |
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर | 14 | 8 | 6 | 16 | -0.253 |
दिल्ली कॅपिटल्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.204 |
पंजाब किंग्स | 14 | 7 | 7 | 14 | 0.126 |
कोलकाता नाइट रायडर्स | 14 | 6 | 8 | 12 | 0.146 |
सनरायजर्स हैदराबाद | 14 | 6 | 8 | 12 | -0.379 |
चेन्नई सुपर किंग्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.203 |
मुंबई इंडियन्स | 14 | 4 | 10 | 8 | -0.506 |
वॉर्नर-पॉवेलचा तडाखा
तत्पूर्वी आज डेविड वॉर्नर आणि रोव्हमॅन पॉवेलने जबरदस्त खेळ दाखवला. डेविड वॉर्नरने 58 चेंडूत नाबाद 92 धावा फटकावल्या. यात 12 फोर आणि 3 सिक्स आहेत. वॉर्नरचा खेळ पाहून तो हैदराबादला त्यांच्या चुकांची जाणीव करुन देत होता, असंच वाटलं. मागच्या आठ डावातलं वॉर्नरचं हे चौथ अर्धशतक आहे. आज त्याने चौथ अर्धशतक पूर्ण केलं. या सीजनमध्ये दिल्लीकडून वॉर्नरनेच 300 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
Just 2⃣ Cool Caribbean blokes who set Brabourne on ? tonight ??
Complete Entertainers ??#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #DCvSRH | @Ravipowell26 | #TATAIPL | #IPL | #DelhiCapitals | @nicholas_47 pic.twitter.com/rQWmbeLLKa
— Delhi Capitals (@DelhiCapitals) May 5, 2022
रोव्हमॅन पॉवेलने तर आज रुद्रावतार धारण केला होता. उमरान मलिक सारख्या वेगवान गोलंदाजाचाही त्याने चोप काढला. 35 चेंडूत 67 धावांची तुफान खेळी तो खेळून गेला. यामध्ये तीन चौकार आणि सहा षटकार आहेत.