IPL 2023 Points Table : मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून CSK कितव्या स्थानावर? जाणून घ्या कोण आहे नंबर-1?

IPL 2023 Points Table in Marathi : पॉइंट्स टेबलमध्ये सध्या 5 टीम्सचे समसमान 4-4 पॉइंट्स आहेत. यात गतविजेते गुजरात टायटन्स सुद्धा आहे. हार्दिक पंड्याची टीम पुन्हा एकदा रविवारी नंबर 1 बनण्यासाठी मैदानात उतरेल.

IPL 2023 Points Table : मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून CSK कितव्या स्थानावर? जाणून घ्या कोण आहे नंबर-1?
IPL 2023 points table Image Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Apr 09, 2023 | 9:10 AM

IPL 2023 Points Table : आयपीएल 2023 चा सीजन हळूहळू रंगत चाललाय. प्रत्येक सामन्यानिशी रोमांच वाढतोय. वीकेंडला डबल हेडर सामन्यांच्यावेळी उत्सुक्ता आणि उत्साह टिपेला पोहोचतो. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्समध्ये मॅच असेल, तर चाहत्यांसाठी ती एक मेजवानी असते. शनिवारी 8 एप्रिलला मुंबई आणि चेन्नईमध्ये डबल हेडरचा दुसरा सामना झाला. या मॅचमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या टीमने आरामात विजय मिळवला. मात्र, तरीही ते राजस्थान रॉयल्सला मागे टाकू शकले नाहीत. सध्या राजस्थान रॉयल्स पहिल्या स्थानावर आहे.

शनिवारी राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सध्ये पहिला सामना झाला. राजस्थानने या मॅचमध्ये 57 धावांनी विजय मिळवला. दिल्लीचा हा सलग तिसरा पराभव आहे.

चेन्नईचा कितवा विजय?

राजस्थान टीम तीन सामन्यात दोन विजयासह पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. दुसऱ्या मॅचमध्ये चेन्नईने मुंबई इंडियन्सला 7 विकेटने हरवलं. चेन्नईचा 3 मॅचमधील हा दुसरा विजय आहे. पण ते राजस्थानला पहिल्या स्थानावरुन हटवू शकले नाहीत.

पहिल्या स्थानावर कोण?

आयपीएल 2023 मधील 12 व्या सामन्यानंतर पॉइंट्स टेबलवर एक नजर मारुया. पाच टीम्सचे एकसमान चार-चार पॉइंट्स आहेत. फक्त नेट रनरेटच्या फरकामुळे राजस्थान रॉयल्सची टीम पहिल्या स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपर जायंट्सला हटवलं. चेन्नईने आपल्या दुसऱ्याविजयासह पंजाब किंग्सला मागे टाकलं. ते चौथ्या स्थानावर आहेत. गुजरात टायटन्स तिसऱ्या स्थानावर आहेत.

टीम सामना विजय पराजय नेट रनरेट पॉइंट्स
राजस्थान रॉयल्स 321+2.0674
लखनौ सुपर जायंट्स 321+1.3584
गुजरात टायटन्स 220+0.7004
चेन्नई सुपर किंग्स321+0.3564
पंजाब किंग्स 220+0.3334
कोलकता नाइट रायडर्स 211+2.0562
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर 211-1.2562
मुंबई इंडियन्स 202-1.3940
दिल्ली कॅपिटल्स 303-2.0920
सनरायजर्स हैदराबाद 202-2.8670
मुंबई इंडियन्स कितव्या स्थानावर?

कालचे सामने हरणारी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सची टीम पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या तीन स्थानांवर आहेत. दिल्ली सलग तीन पराभवांसह नवव्या आणि मुंबई सलग दोन पराभवांसह आठव्या स्थानावर आहे. शेवटच्या स्थानावर अजूनही सनरायजर्स हैदराबादची टीम आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोर सहाव्या स्थानावर आहे. आजच्या मॅचमुळे पॉइंट्स टेबलमध्ये काय चित्र बदलेल?

आता रविवारी डबल हेडरचे सामने होतील. त्यामुळे पुन्हा एकदा पॉइंट्स टेबलमधील चित्र बदलू शकतं. गतविजेते गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सची टीम आमने-सामने येणार आहे. गुजरात टायटन्सने सलग दोन सामने जिंकलेत. सलग तिसरा विजय मिळवल्यास ते नंबर 1 होतील. दुसऱ्या मॅचमध्ये पंजाब किंग्स आणि सनरायजर्स हैदराबादमध्ये सामना होईल. पंजाबची टीम विजयाची हॅट्ट्रिक करुन पहिल्या स्थानावर पोहोचू शकते.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.