आयर्लंडच्या 16 वर्षीय महिला क्रिकेटरची कमाल, तोडला मिताली राजचा 22 वर्ष जुना विक्रम

भारतीय महिला क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी क्रिकेटर म्हटलं तर मिताली राजकडेच पाहिलं जात. ती महिला क्रिकेट जगातील अव्वल दर्जाची फलंदाज देखील आहे.

आयर्लंडच्या 16 वर्षीय महिला क्रिकेटरची कमाल, तोडला मिताली राजचा 22 वर्ष जुना विक्रम
मिताली राज
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 5:59 PM

मुंबई: भारताची महान क्रिकेटपटू मिताली राज (Mithali Raj) हिने क्रिकेटच्या जगात अनेक मोठमोठे रेकॉर्ड स्वत:च्या नावे केले आहेत. अनेक असेही रेकॉर्ड आहेत जे तोडणं सहजासहजी अजिबात शक्य नाही. कारकिर्दीच्या सुरुवातीपासून मितालीच्या बॅटमधून अनेक रेकॉर्ड्स निघाले आहेत. पण यातीलच एक रेकॉर्ड आता एका दुसऱ्या महिला क्रिकेटपटूने तोडला आहे. आयर्लंडच्या एका 16 वर्षीय युवा खेळाडूने  मितालीचा 22 वर्षीय जुना रेकॉर्ड तोडला आहे.

1999 साली मितालीने तिच्या एकदिवसीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. मिल्टन कीन्स येथे आयर्लंडविरुद्ध मितालीने तिचा सलामीचा सामना खेळला. ज्यात तिने नाबाद 114 धावा ठोकतं सर्वात कमी वयात अर्थात 16 साल, 205 दिवसांची असताना शतक ठोकण्याचा पराक्रम केला. दरम्यान 22 वर्षानंतर आयर्लंडच्याच एमी हंटर या युवा खेळाडूने शतक ठोकत हा रेक़ॉर्ड तोडला आहे.

असा तोडला रेकॉर्ड

आयर्लंडची युवा स्टार क्रिकेटपटू एमी हंटरने झिम्बाब्वेच्या महिला संघाविरुद्धच्या सामन्यात अप्रतिम शतकीय डाव खेळला.  दोन्ही संघामध्ये सुरु असलेल्या एकदिवसीय सामन्यात एमिलीने 121 धावा ठोकल्या. या शतकासोबतच तिने 22  वर्ष जुना मिताली राजचा रेकॉर्ड मोडिस काढला.

काही दिवसांपूर्वीच मितालीने केला भीमपराक्रम

मिताली राज ही काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा डोंगर रचनारी खेळाडू ठरली होती. याआधी केवळ भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा केलेल्या मितालीने आता आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेेळाडू ठरली आहे. 38 वर्षीय मितालीने 317 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 10 हजार 337 धावा करत इंग्लंडची माजी कर्णधार शार्लोट एडवर्ड्स (Charlotte Edwards) हिचे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचे रेकॉर्ड तोडले आहे. एडवर्ड्सने 10 हजार 273 रन केले आहेत.

हे ही वाचा-

RCB vs KKR, Head to Head: विराटसेना केकेआरशी लढतीसाठी सज्ज, कोण मारणार बाजी?, तर कोण होणार स्पर्धेबाहेर?

IPL 2021: धोनी, पंत, मॉर्गन की कोहली, कोण आहे नंबर-1, गौतम गंभीरचा ‘या’ कर्णधारावर विश्वास

IPL 2021: सहवागच्या स्टाईलमध्ये धोनीने फिनिश केली मॅच, दिल्लीला नमवल्यानंतर सांगितली स्ट्रॅटेजी

(Irelands 16 year old amy hunter breaks mithali raj record of youngest ever centurion in women cricket)

'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.