आयर्लंडच्या फलंदाजाने विराट कोहलीला पछाडलं, खास विक्रम मोडित

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat kohli) सध्या जगातील महान आणि यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. कसोटी असो, वनडे असो किंवा टी - 20, कोहलीने स्वतःला सर्वत्र आपणच किंग असल्याचे सिद्ध केले आहे.

आयर्लंडच्या फलंदाजाने विराट कोहलीला पछाडलं, खास विक्रम मोडित
विराट कोहली
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 5:14 PM

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat kohli) सध्या जगातील महान आणि यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे. कसोटी असो, वनडे असो किंवा टी – 20, कोहलीने स्वतःला सर्वत्र आपणच किंग असल्याचे सिद्ध केले आहे. त्याच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी खूप कमी खेळाडू आहेत. मात्र, अलीकडेच आयर्लंडच्या एका फलंदाजाने मोठा विश्वविक्रम मोडत विराट कोहलीला एक प्रकारे आव्हान दिले आहे. (Ireland’s Paul Stirling surpasses Virat Kohli to become player with most fours in T20 Internationals)

हा विक्रम मोडणाऱ्या फलंदाजाचे नाव पॉल स्टर्लिंग (Paul Stirling) आहे. पॉल स्टर्लिंग आयर्लंडमधील एक दिग्गज खेळाडू आहे. त्याने आपल्या देशासाठी 89 टी -20 सामने खेळले आहेत. या 89 सामन्यांमध्ये त्याने खोऱ्याने धावा जमवल्या आहेत. ज्यात त्याने अनेक विक्रमही केले. रविवारी त्याने यूएईविरुद्ध 40 धावा केल्या आणि त्यासह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडला. स्टर्लिंगने विराट कोहलीला मागे टाकत टी – 20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक चौकार फटकावण्याचा विक्रम स्वतःच्या नावे केला आहे.

स्टर्लिंगने कोहलीला पछाडलं

स्टर्लिंगने आपल्या कारकिर्दीतील 89 व्या सामन्यात विराट कोहलीला मागे टाकले. दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर रविवारी त्याने 35 चेंडूत 40 धावा केल्या आणि त्यात चार चौकार मारले. यासह, त्याच्या नावावर आता आंतरराष्ट्रीय टी – 20 मध्ये 288 चौकार झाले आहे, तर विराटचे 285 चौकार आहेत. कोहलीचा षटकारांचा विक्रमही स्टर्लिंगच्या निशाण्यावर आहे. विराटने 90 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 90 षटकार ठोकले आहेत. तर स्टर्लिंगने 2495 धावा केल्या आहेत आणि त्यात एकूण 87 षटकार ठोकले आहेत. या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल तिसऱ्या क्रमांकावर आहे. गुप्टिलने 102 सामन्यांमध्ये 2939 धावा केल्या आहेत ज्यात त्याच्या नावावर 256 चौकार आणि 147 षटकार आहेत. भारताच्या रोहित शर्माने 111 सामन्यांमध्ये 252 चौकार ठोकले आहेत, तसेच त्याच्या नावावर 133 षटकारांचा रेकॉर्ड आहे.

स्टर्लिंग सहवागचा फॅन

पॉल स्टर्लिंग भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सहवागचा चाहता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी (आयसीसी) बोलताना पॉल स्टर्लिंगने जुन्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला की, कारकिर्दीच्या सुरुवातीला मी सेहवागप्रमाणे खेळण्याचा प्रयत्न करायचो. मला दोन फलंदाजांना खेळताना पाहायला आवडतं. त्यातील एक म्हणजे डेमियन मार्टिन. त्याला खेळताना पाहून आनंद व्हायचा. अजून एक खेळाडू मला आवडतो, मात्र मी त्याच्याप्रमाणे खेळू शकत नाही, तो म्हणजे विरेंद्र सहवाग. मला त्याचा ऑफ साईडचा खेळ खूप आवडायचा. त्याचे बरेच शॉट्स मी रिपीट करण्याचा प्रयत्न केला, मला ते फारसे जमले नाही, पण मी प्रयत्न करायचो.

इतर बातम्या

IPL 2021, DC vs CSK : आजच्या सामन्याचा निकाल ‘या’ 5 खेळाडूंच्या हातात

IPL 2021, DC vs CSK Head to Head Records : चेन्नईचे किंग्स भिडणार दिल्लीच्या नवाबांशी, कोण पोहचणार अंतिम सामन्यात?

यंदा चेन्नईला IPL जिंकायचीय?, तर धोनीला करावा लागणार मोठा त्याग, या हुकमी एक्क्यावर दाखवावा लागणार भरोसा

(Ireland’s Paul Stirling surpasses Virat Kohli to become player with most fours in T20 Internationals)

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.