Hardik Pandya: हार्दिक पंड्याला कायमस्वरुपी कॅप्टन बनवण्याआधी इरफान पठानने का इशारा दिला?
Hardik Pandya: हार्दिक पंड्याला टी 20 मध्ये कायमस्वरुपी कॅप्टन बनवण्याची चर्चा सुरु आहे. त्याआधी इरफानने हार्दिकच्या कॅप्टनशिपबद्दल एक मोठं विधान केलय.
Irfan Pathan On Hardik Pandya: टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये 3 टी 20 सामन्यांच्या सीरीजमधील पहिला सामना तीन जानेवारीला खेळला जाईल. टी 20 सीरीजमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल या तीन सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियाची कमान हार्दिक पंड्याच्या हाती आहे. टीम इंडियाचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठानने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाबद्दल एक विधान केलय.
इरफान पठानच वक्तव्य
माजी ऑलराऊंडर इरफान पठानने निवडकर्त्यांना एक इशारा दिलाय. हार्दिककडे नेतृत्व देताना त्याच्या फिटनेसवर बारीक लक्ष ठेवा असं इरफानने सांगितलय. “हार्दिकने आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि टीम इंडियाच नेतृत्व केलय. मला हे चांगलं पाऊल वाटलं. त्याच्यात जोश, उत्साह दिसत होता” असं इरफान म्हणाला.
हार्दिकच्या कॅप्टनशिपबद्दल इरफानला काय वाटतं?
“हार्दिकच्या कॅप्टनशिपबद्दल चर्चा सुरु होती, तेव्हा त्याच्या कार्यशैलीने मी प्रभावित झालो. हार्दिकला तुम्ही दीर्घकाळासाठी कॅप्टन बनवत असाल, तर त्याला त्याच्या फिटनेसवर लक्ष द्यावं लागेल” असं इरफान म्हणाला.
ते दुखणं पुन्हा उदभवू शकतं
“हार्दिकचा पाठदुखाची त्रास पुन्हा उदभवू शकतो. तो या दुखण्यामुळे पुन्हा हैराण होऊ शकतो. हार्दिकवर दबाव टाकताना भारतीय टीम मॅनेजमेंट आणि निवडकर्त्यांना सावध राहण्याची गरज आहे” असं इरफान पठान म्हणाला. हार्दिकच्या नेतृत्वाखाली कशी कामगिरी?
हार्दिकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने चांगली कामगिरी केलीय. हार्दिकने मोठ्या दुखापतीनंतर आयपीएलमध्ये पुनरागमन केलं. त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने पहिल्याच सीजमध्ये जेतेपद पटाकवलं. त्यानंतर टीम इंडियाने त्याच्या नेतृत्वाखाली आयर्लंड आणि न्यूझीलंडमध्ये टी 20 सीरीज जिंकली.