IND vs SL 1st ODI: जिंकण्यासाठी टीम इंडियाच्या ‘हा’ प्लेयर फॉर्ममध्ये येणं आवश्यक, इरफान पठानचा सल्ला
IND vs SL 1st ODI: टीम इंडियाचा तो कुठला प्लेयर आहे? ज्याच्या फॉर्ममध्ये परतण्याने समीकरण बदलतील.
India vs Sri Lanka ODI Series: टीम इंडिया आणि श्रीलंकेमध्ये तीन वनडे सामन्यांची सीरीज आजपासून सुरु होणार आहे. आज पहिला सामना गुवाहाटी येथे खेळला जाईल. श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजपासून टीम इंडिया वनडे वर्ल्ड कपची तयारी सुरु करणार आहे. यावर्षी भारतात वनडे वर्ल्ड कप 2023 टुर्नामेंट रंगणार आहे. भारताने आतापर्यंत दोन वनडे वर्ल्ड कपचा किताब जिंकलाय. सर्वप्रथम 1983 साली कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली त्यानंतर 2011 मध्ये दुसऱ्यांदा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली वनडे वर्ल्ड कप जिंकला. वनडे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाचा स्टार बॅट्समन रोहित शर्मा फॉर्ममध्ये येणं आवश्यक आहे.
इरफान पठानच म्हणण काय?
श्रीलंकेविरुद्ध आजपासून सुरु होत असलेल्या वनडे सीरीजसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज आहे. टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर इरफान पठानच्या मते, रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतणं टीमसाठी गरजेच आहे. डिसेंबर 2022 मध्ये बांग्लादेश विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात फिल्डिंग करताना रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली होती.
चॅलेंजेस हाताळण्यासाठी पूर्णपणे सक्षम
“व्हाइट बॉल म्हणजे लिमिटेड ओव्हर्समध्ये रोहित शर्माने मागच्या काहीवर्षात टीम इंडियासाठी जबरदस्त प्रदर्शन केलय. त्याने तोच फॉर्म कायम ठेवणं गरजेच आहे. फॉर्ममध्ये परतण्यासह फिटनेस ठेवणं रोहितसाठी एक चॅलेंज असेल. पण मला विश्वास आहे, रोहित ही आव्हान हाताळण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे” असं इरफान पठान स्टार स्पोर्ट्सवरील ‘फॉलो द ब्लूज’ शोमध्ये म्हणाला. इरफान टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर आहे. मागच्या काही काळापासून खराब फॉर्मशी सामना
रोहित शर्माचा समावेश क्रिकेट विश्वातील धोकादायक ओपनर्समध्ये होतो. मागच्या काही काळापासून तो खराब फॉर्मचा सामना करतोय. 2019 वनडे वर्ल्ड कपपासून रोहितने 18 इनिंगमध्ये 44 च्या सरासरीने 96 च्या स्ट्राइक रेटने 745 धावा केल्या आहेत. दुखापतीनंतर पुनरागमन करणं कधीही सोपं नसतं. रोहित शर्मासाठी यशस्वी पुनरागमन चॅलेंज असेल.