Hardik pandya ला कॅप्टन बनवायला इरफान पठानचा विरोध आहे का?

इरफान पठानचा नेमका मुद्दा काय आहे? आणि त्याला हार्दिकबद्दल असं का वाटतं?

Hardik pandya ला कॅप्टन बनवायला इरफान पठानचा विरोध आहे का?
Hardik pandya-Irfan pathan
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 3:47 PM

मुंबई: T20 वर्ल्ड कप आता संपला आहे. टीम इंडियाला नव्याने सुरुवात करायची आहे. मागच्या काही वर्षांपासून आयसीसी टुर्नामेंटसमध्ये नॉकआऊट स्टेजवर टीम इंडियाचा पराभव होतोय. यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये तोच सिलसिला कायम राहिला. रोहित शर्माच्या नेतृत्वाबद्दल अनेक माजी क्रिकेटपटू प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत. रोहितच्या शर्माच्या वयाचा दाखल देऊन टी 20 क्रिकेटमध्ये नेतृत्व बदलाची मागणी होत आहे.

इरफान पठान का सहमत नाही?

आता पुढचा टी 20 वर्ल्ड कप दोन वर्षांनी आहे. त्यासाठी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पंड्याला कॅप्टन बनवण्याची मागणी होत आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठान हार्दिक पंड्याला कॅप्टन बनवण्याच्या मागणीशी सहमत नाहीय. त्याने त्यामागच वास्तव सांगितलय.

न्यूझीलंड सीरीजसाठी हार्दिक कॅप्टन

यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये हार्दिकने त्याच्या नेतृत्वाखाली पहिल्याच प्रयत्नात गुजरात टायटन्सला आयपीएलच विजेतेपद मिळवून दिलं. त्यानंतर आयर्लंड दौऱ्यासाठी त्याला कॅप्टन बनवण्यात आलं. आता न्यूझीलंड सीरीजसाठी टीमच नेतृत्व हार्दिक पंड्याकडे सोपवण्यात आलय.

मग त्यावेळी काय करणार?

“कॅप्टन बदलला म्हणून निकाल बदलणार असं मी म्हणणार नाही. कॅप्टन बदलून निकाल बदलणार नाही. हार्दिक पंड्या एक वेगवान गोलंदाजी करणारा ऑलराऊंडर आहे. त्याला दुखापतीच्या सुद्धा समस्या झाल्या आहेत. तुम्ही त्याला कॅप्टन बनवलं आणि वर्ल्ड कप आधी त्याला दुखापत झाली तर? त्यावेळी तुमच्याकडे दुसरा लीडर नसेल, तर तुम्ही अडचणीत याल, त्यामुळे हार्दिकच्या बरोबरीने तुम्ही दुसरं नेतृत्व तयार करा” असं इरफान पठानच मत आहे. तो स्टार स्पोर्ट्सवरील मॅच पॉइंट कार्यक्रमात बोलत होता.

दुसरा लीडर का हवा?

“माझ्या मते हार्दिक पंड्या एक लीडर आहे. गुजरात टायटन्स संघाकडून त्याने चांगली कामगिरी केली. टीम बनवताना एक नाही, तुम्हाला दोन लीडर घडवावे लागतील. आपण ओपनर्सबद्दल बोलतो, आपल्याकडे ओपनर्सचा एक गट असला पाहिजे तसाच लीडर्सचा सुद्धा ग्रुप हवा” असं इरफान पठाण म्हणाला. हार्दिक पंड्याला झालेल्या दुखापती लक्षात घेऊन इरफान पठानने टीमसाठी दोन नेतृत्व तयारी करण्याची मागणी केली आहे.

'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.