BCCI Elections: सौरव गांगुलीला बीसीसीआयमधून बाहेर करण्यामागे ‘हा’ माणूस?
BCCI Elections: रिपोर्ट्समध्ये त्याने बदला घेतल्याची चर्चा
मुंबई: टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार सौरव गांगुलीची (Sourav Ganguly) बीसीसीआय अध्यक्ष (BCCI President) म्हणून इनिंग लवकरच संपुष्टात येणार आहे. इतक्या लवकर सौरव गांगुलीचा बीसीसीआयमधील कार्यकाळ संपुष्टात येईल, असं कोणाला वाटलं नव्हतं. जय शाह सोबत असल्यामुळे सौरव गांगुली बीसीसीआयमध्ये मोठी इनिंग खेळणार असंच सर्वात वाटलं होतं. पण गांगुली बरोबर जे झालं, त्याने त्याच्या हितचिंतकांनाही धक्का बसला आहे.
त्या व्यक्तीच नाव आहे….
सौरव गांगुली बीसीसीआय पदाधिकाऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात कमी पडला. सौरव गांगुलीच्या या एक्झिट मागे कोण आहे? त्यासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा आहे. काही रिपोर्ट्सनुसार, सौरव गांगुलीला बीसीसीआय अध्यपद सोडावं लागलं, त्यामागे माजी बीसीसीआय आणि आयसीसी अध्यक्ष एन. श्रीनिवासन असल्याच म्हटलं जातय. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.
केंद्रीय मंत्र्याचा रोल
श्रीनिवासन यांच्यामते सौरव गांगुलीकडून अपेक्षित काम होऊ शकलं नाही. रॉजर बिन्नी यांच्या अध्यक्षपदाच्या उमेदवारीमागे एका केंद्रीय मंत्र्याने श्रीनिवासन यांच्यासह महत्त्वाची भूमिका बजावली. टेलिग्राफने आपल्या वृत्तात हे म्हटलं आहे.
पण अचानक खेळ पलटला
आधीपासूनच श्रीनिवासन सौरव गांगुली याच्याबद्दल सकारात्मक नव्हते. 2019 मध्ये श्रीनिवासन यांनी ब्रिजेश पटेल यांना बीसीसीआय अध्यक्षपदाच्या खुर्चीत बसवण्याची तयारी पूर्ण केली होती. पण अचानक खेळ पलटला. सौरव गांगुलीची त्या पदावर वर्णी लागली.
आपल्या शब्दाला अजूनही किंमत आहे
रिपोर्ट्नुसार श्रीनिवासन यांच्यासाठी हा प्रतिष्ठेचा विषय होता. आपल्या शब्दाला अजूनही किंमत आहे, हे त्यांना सिद्ध करायचं होतं. सलग दोन टर्म कोणीही बीसीसीआयच अध्यक्षपद भूषवलेलं नाही, असं कारण सौरव गांगुलीला सांगण्यात आलं. सौरव गांगुलीला पुन्हा बीसीसीआय अध्यक्षपद न मिळण्यामागे राजकीय कारण असल्याचही बोललं जातय. सध्यातरी या फक्त चर्चा आहेत.