Ishan Kishan: ‘भावा, कॅप्टन तर तूच आहेस’, इशान किशनच्या उत्तराने रोहितची बोलती बंद
Ishan Kishan: या मॅचनंतर कॅप्टन रोहित शर्माने शुभमन गिल बरोबर चर्चा केली. त्यावेळी इशान किशनही तिथे उपस्थित होता. बीसीसीआय टीव्हीसाठी रोहित शर्माने शुभमन गिलचा इंटरव्यू घेतला.
IND vs NZ 1st ODI: न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाने 13 रन्सनी विजय मिळवला. शुभमन गिल या विजयाचा हिरो ठरला. त्याने शानदार डबल सेंच्युरी झळकवली. शुभमन गिलने 208 धावा केल्या. शुभमन गिलला सामनावीर पुरस्कार मिळाला. या मॅचनंतर कॅप्टन रोहित शर्माने शुभमन गिल बरोबर चर्चा केली. त्यावेळी इशान किशनही तिथे उपस्थित होता. बीसीसीआय टीव्हीसाठी रोहित शर्माने शुभमन गिलचा इंटरव्यू घेतला. इशान किशन बरोबरही यावेळी चर्चा झाली. इंटरव्यू दरम्यान तिन्ही क्रिकेटर्सनी भरपूर मजा-मस्ती केली. एकवेळ अशी पण आली, की रोहित शर्माला आपलं तोंड लपवाव लागलं.
डबल सेंच्युरी ठोकूनही तीन मॅच बाहेर
रोहित शर्माने चर्चेदरम्यान इशान किशनला एक प्रश्न विचारला. डबल सेंच्युरी झळकवल्यानंतर तू तीन मॅच खेळला नाहीस. त्यावर या युवा प्लेयरने गजब उत्तर दिलं. इशान किशन म्हणाला ‘भावा, कॅप्टन तर तूच आहेस’
1⃣ Frame 3️⃣ ODI Double centurions
Expect a lot of fun, banter & insights when captain @ImRo45, @ishankishan51 & @ShubmanGill bond over the microphone ? ? – By @ameyatilak
Full interview ? ? #TeamIndia | #INDvNZ https://t.co/rD2URvFIf9 pic.twitter.com/GHupnOMJax
— BCCI (@BCCI) January 19, 2023
रोहितला आपलं तोंड लपवाव लागलं
मागच्यावर्षी डिसेंबर महिन्यात बांग्लादेश विरुद्ध तिसऱ्या वनडेत इशान किशनला संधी मिळाली होती. त्यावेळी इशानने थेट डबल सेंच्युरी ठोकली. पण त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध तीन वनडे सामन्यात त्याची निवड झाली नाही. मीडियामध्ये या मुद्यावर भरपूर चर्चा झाली. रोहित शर्माने याच मुद्यावर प्रश्न विचारण्याच्या बहाण्याने इशानची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. इशान किशनच उत्तर ऐकून रोहितला आपलं तोंड लपवाव लागलं. हा सर्व मजा-मस्करीचा भाग होता. इशान किशन आणि शुभमन गिल दोघे रुम पार्टनर्स
बांग्लादेश विरुद्ध शेवटच्या वनडेत इशानने 131 चेंडूत 210 धावा फटकावल्या होत्या. आता 39 दिवसानंतर शुभमन गिलने डबल सेंच्युरी ठोकली आहे. शुभमन गिल सर्वात कमी वयात द्विशतक झळकवणारा खेळाडू बनलाय. महत्त्वाच म्हणजे इशान किशन आणि शुभमन गिल दोघे रुम पार्टनर्स आहेत. रात्रभर टीव्ही लावून इशान किशन मला झोपू देत नाही, अशी तक्रार शुभमनने केली. रात्रभर इशान चित्रपट पाहत असतो. शुभमन गिल हे सर्व मजा-मस्तीमध्ये बोलून गेला.