IND VS ZIM: शुभमन गिल विरोधात अपील, OUT झाला इशान किशन, मैदानात काय घडलं, त्याचा VIDEO
IND VS ZIM: या दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्याविकेटसाठी 127 चेंडूत 140 धावा जोडल्या. दोघे क्रीजवर असताना, ही जोडी खूप वेगळ्या पद्धतीने फुटली.
मुंबई: झिम्बाब्वे विरुद्ध (IND vs ZIM) तिसऱ्या वनडे सामन्यात शुभमन गिलने (Shubhaman Gill) शानदार शतक झळकावलं. इशान किशनने (Ishan Kishan) अर्धशतकी खेळी केली. या दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्याविकेटसाठी 127 चेंडूत 140 धावा जोडल्या. दोघे क्रीजवर असताना, ही जोडी खूप वेगळ्या पद्धतीने फुटली. इशान किशन रनआऊट झाल्याने ही जोडी फुटली. इशान किशन ज्या पद्धतीने रनआऊट झाला, ते खूपच इंटरेस्टिंग होतं. झिम्बाब्वेचे खेळाडू शुभमन गिल विरोधात अपील करत होते. त्याचवेळी इशान किशन रनआऊट झाला.
गिल विरुद्ध अपील, विकेट इशानची
43 व्या ओव्हर मध्ये ब्रॅड इव्हान्सच्या पहिल्या चेंडूवर शुभमन गिल विरुद्ध LBW चं अपील झालं. या दरम्यान इशान किशनने एक धाव काढण्याचा प्रयत्न केला. पण गिलने त्याला रोखलं. त्याचवेळी मुनयोंगाने जबरदस्त थ्रो केला. त्यावर इशान किशन नॉन स्ट्राइक एन्डवर रन आऊट झाला. त्यानंतर झिम्बाब्वेने शुभमन गिलविरोधात रिव्यु घेतला. पण तो नॉट आऊट होता. त्यानंतर इशान किशनला रनआऊट देण्यात आलं.
इशान किशनचं अर्धशतक
इशान किशनसाठी ही बाब चांगली राहिली की, त्याने अर्धशतक झळकावलं. हरारेच्या कठीण पीचवर इशान किशनने धीमी सुरुवात केली. पण नंतर त्याने लय पकडली. किशनने 61 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यात 6 चौकार होते.
— Richard (@Richard10719932) August 22, 2022
शुभमन गिलचं शतक
इशान किशन रन आऊट झाल्यानंतर शुभमन गिलने शतक झळकावलं. त्यानंतर तो आऊट झाला. शुभमन गिलने आंतरराष्ट्रीय करीयर मधलं आपलं पहिलं शतक झळकावलं. गिल केएल राहुल बाद झाल्यानंतर क्रीजवर आला होता. मैदानात आल्यानंतर त्याने आक्रमक फलंदाजी केली. गिलने एका कठीण खेळपट्टीवर 51 चेंडूत अर्धशतक फटकावलं. पुढच्या 31 चेंडूत तो शतकाजवळ पोहोचला. गिलच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने 50 षटकात 289 धावा फटकावल्या.