Team India : टीम इंडिया ज्याला संधी देत नाहीय, तो आता थेट रोहित शर्मा किंवा विराट कोहलीला भिडणार
Team India : टीम इंडियाचे खेळाडू सध्या विश्रांती घेत आहेत. आता ते थेट पुढच्या महिन्यात मैदानावर खेळताना दिसतील. बांग्लादेश विरुद्ध टेस्ट सीरीज 19 सप्टेंबरपासून सुरु होतेय. त्याआधी बीसीसीआयने देशातंर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यासाठी या सीनियर क्रिकेटर्सना आदेश दिले आहेत.
भारतीय क्रिकेट चाहत्यांना आता पुढचे काही दिवस वाट पहायाची आहे. टीम इंडियाचा श्रीलंका दौरा संपला. आता लगेचच कुठला टूर नाहीय. टीम इंडिया आता थेट 19 सप्टेंबरला मैदानावर खेळताना दिसेल. त्यांच्यासमोर पुढच आव्हान बांग्लादेशच आहे. भारत-बांग्लादेशमध्ये टेस्ट सीरीज होणार आहे. स्टार भारतीय क्रिकेटर्सना खेळताना पाहण्याची संधी लवकरच मिळेल. मागच्या काही महिन्यापासून टीम इंडियाच्या बाहेर असलेला स्टार खेळाडू लवकरच मैदानात खेळताना दिसेल. तो ही थेट रोहित शर्मा-विराट कोहली या दिग्गजांविरुद्ध खेळताना दिसेल. त्याच नाव आहे इशान किशन.
विकेटकीपर-फलंदाज इशान किशन या वर्षाच्या सुरुवातीपासून टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्याच कारण प्रत्येकाला माहित आहे. मागच्यावर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरीजमधून ब्रेक घेऊन त्याने सगळ्यांनाच चकीत केलं. त्यानंतर बीसीसीआयने सांगूनही तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळला नाही. त्यानंतर इशान किशन टीम इंडियात अजून पर्यंत पुनरागमन करु शकलेला नाही. त्याशिवाय त्याला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधूनही बाहेर करण्यात आलं.
आता भूमिका बदलली
इतका वेळ टीमच्या बाहेर राहिल्यानंतर इशान किशनची भूमिका बदलताना दिसतेय. आता तो देशांतर्गत क्रिकेट खेळायला तयार आहे. त्याचं इनामही त्याला लवकरच मिळेल. बीसीसीआयची सिलेक्शन कमिटी देशांतर्गत क्रिकेट सीजनआधी मोठ्या टुर्नामेंटमध्ये इशानचा समावेश करण्याचा विचार सुरु आहे. क्रिकबजच्या रिपोर्ट्नुसार, सप्टेंबरपासून फर्स्ट क्लास टुर्नामेंट दुलीप ट्रॉफी सुरु होणार आहे. यावेळी इशान किशनला कुठल्या एका टीममध्ये जागा मिळू शकते. या टुर्नामेंट सोबतच डोमॅस्टिक सीजनही सुरु होईल. या टुर्नामेंटमध्ये 4 टीम्स इंडिया-ए, इंडिया-बी, इंडिया-सी आणि इंडिया-डी सहभागी होतात.
टुर्नामेंटमध्ये खेळण्याचा कोणा-कोणाला आदेश?
इशान किशनचा यापैकी कुठल्या एका टीममध्ये समावेश केला तर तो विराट कोहली, रोहित शर्मा, ऋषभ पंत यांच्याविरुद्ध किंवा यांच्यासोबत खेळताना दिसेल. 5 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत टिम इंडियाचे सीनियर खेळाडू खेळताना दिसतील. रिपोर्ट्सनुसार, रोहित आणि विराट सुद्धा दुलीप ट्रॉफीमध्ये खेळू शकतात. सिलेक्शन कमिटीने हा निर्णय दोघांवर सोडलाय. पण दोघे एखादा सामना खेळू शकतात. जेणेकरुन बांग्लादेश विरुद्ध टेस्ट सीरीजआधी थोडी तयारी होईल. बोर्डाने हे दोन दिग्गज, जसप्रीत बुमराह यांना सोडून रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन, श्रेयस अय्यर, केएल राहुल सारख्या स्टार खेळाडूंना या टुर्नामेंटमध्ये खेळण्याचा आदेश दिला आहे.