WTC ‘पराभवाच्या जखमेवर दुखापतीचं मीठ’, इंग्लंड मालिकेआधी टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूला टाके!
इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण कसोटी मालिकेपूर्वी संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा जखमी झाला आहे. इशांतला त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे, त्याला टाके पडले आहेत. (Ishant Sharma injured Before india vs England Test Series)
मुंबई : साऊथहॅम्प्टनमधील 23 जूनचा दिवस भारतीय क्रिकेट संघासाठी चांगला नव्हता. दोन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final 2021) पोहोचलेल्या टीम इंडियाला जेतेपद मिळवता आले नाही. या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून न्यूझीलंडने कसोटी क्रिकेटचा पहिला चॅम्पियन होण्याचा मान मिळविला. भारतीय संघासाठी हा पराभव धक्क्यापेक्षा कमी नव्हता, परंतु या धक्क्यातून सावरतो ना सावरतो तोच संघाला आणखी एक धक्का बसला आहे. इंग्लंडविरुद्धच्या (India vs Engand Test Series) महत्त्वपूर्ण कसोटी मालिकेपूर्वी संघाचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा (Ishant Sharma) जखमी झाला आहे. इशांतला त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे, त्याला टाके पडले आहेत. (Ishant Sharma injured Before india vs England Test Series)
फिल्डिंग करताना दुखापत
टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या शेवटच्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात जेव्हा न्यूझीलंड विजयाच्या जवळ होता तेव्हा इशांत गोलंदाजी करताना त्याच्या हाताला दुखापत झाली. रॉस टेलरने खेळलेला फटका रोखण्याचा प्रयत्न करत असताना, त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली त्यामुळे आपली षटके पूर्ण न करता तो पॅव्हिलियनमध्ये परतला. जसप्रीत बुमराहने त्याचं षटक पूर्ण केलं. या अंतिम सामन्यात इशांतने दोन्ही डावात 31.2 षटके टाकली आणि 3 विकेट्स घेतल्या.
बोटांना टाके, गंभीर दुखापत नाही
इशांतच्या दुखापतीविषयी माहिती देताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्याच्या हातातून रक्तस्त्राव झाला आहे आणि म्हणून टाके घालावे लागले. वृत्तसंस्था पीटीआयने बीसीसीआयच्या अधिकाऱ्याचा हवाला देत म्हटले आहे की, “इशांतच्या हाताच्या मधल्या व चौथ्या बोटाला टाके पडले आहेत. परंतु गंभीर दुखापत नाही.”
…तोपर्यंत इशांत सावरेल अशी अपेक्षा
मात्र, इशांत लवकरच दुखापतीतून सावरेल ही दिलासा देणारी बाब आहे. भारतीय संघाला 4 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे आणि त्याआधीच तो या दुखापतीतून सावरेल अशी अपेक्षा आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “हे टाके जवळपास 10 दिवसांत निघून तो पूर्ववत होईल. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अद्याप सहा आठवडे शिल्लक आहेत. त्यामुळे तोपर्यंत तो ठीक होईल”
(Ishant Sharma injured Before india vs England Test Series)
हे ही वाचा :
WTC पराभवानंतर भारतीय खेळाडू 3 आठवडे सुट्टीवर, माजी कर्णधार भडकला, म्हणतो, ‘हा कार्यक्रम बनवला कसा?’