IPL 2025 : आयपीएलच्या 18 व्या मोसमादरम्यान या’ ‘ऑलराउंडरची अचानक एन्ट्री, कोण आहे तो?
IPL 2025 : आयपीएलच्या 18 व्या मोसमाचा थरार सुरु असताना एका स्टार ऑलराउंडरची अचानक गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स टीममध्ये एन्ट्री झाली आहे. जाणून घ्या तो ऑलराउंडर नक्की कोण आहे.

आयपीएलच्या 18 व्या मोसमात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला आतापर्यंत काही खास असं करता आलेलं नाही. केकेआरने या हंगामात एकूण 5 सामने खेळले आहेत. केकेआरने त्यापैकी 2 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 3 सामन्यांमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. मुंबईकर अजिंक्य रहाणे याच्याकडे केकेआरच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. केकेआरची या मोहिमेची सुरुवात पराभवाने झाली. आरसीबीने केकेआरला पराभूत केलं. मात्र त्यानंतर केकेआरने पलटवार केला. केकेआरने दुसऱ्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सला पराभूत करत विजयाचं खातं उघडलं. त्यानंतर 3 पैकी 1 सामन्यांतच केकेआरला जिंकता आलं. केकेआरने सनरायजर्स हैदराबादवर विजय मिळवला. त्यानंतर आता केकेआरच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे.
केकेआरच्या गोटात 18 व्या मोसमादरम्यान एका ऑलराउंडरची एन्ट्री झाली आहे. स्ट्रीट टेनिस क्रिकेट स्पर्धेतील (ISPL) खेळाडूला केकेआरमध्ये नेट बॉल म्हणून संधी देण्यात आली आहे. अभिषेक कुमार दलहोर याचा नेट बॉलर म्हणून कोलकाता टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. अभिषेकने आयएसपीएल स्पर्धेतील 2 हंगामात ‘माझी मुंबई’ टीमसाठी ऑलराउंडर म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
अभिषेक आयएसपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू आहे. अभिषेकने आयएसपीएल स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधलं. अभिषेकला याच कामगिरीच्या जोरावर केकेआरने नेट बॉलर म्हणून आपल्यासह जोडलं आहे.
केकेआर चेन्नईविरुद्ध भिडणार
दरम्यान केकेआर या हंगामातील आपला सहावा सामना हा 11 एप्रिलला खेळणार आहे. केकेआर या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध भिडणार आहे. हा सामना एमए चिदंबरम स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे.
अभिषेक कुमार दलहोरची एन्ट्री
The journey from Street to Stadium just got bigger! 🤩🏟️
Abhishek Kumar Dalhor is now bowling to Indian T20 League players, ticking boxes and chasing dreams! 🏏✅#ISPLT10 #Street2Stadium #NewT10Era #Season3 #ZindagiBadalLo #ISPL #DikhaApnaGame pic.twitter.com/ITWvk1njSL
— ISPL (@ispl_t10) April 9, 2025
कोलकाता नाईट रायडर्स टीम: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), सुनील नरेन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, अंगकृष रघुवंशी, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, स्पेन्सर जॉन्सन, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, एनरिच नॉर्खिया, मनीष पांडे, वैभव अरोरा, अनुकुल रॉय, लवनीथ सिसोदिया, चेतन साकारिया, रहमानउल्ला गुरबाज, मयंक मार्कंडे, रोवमन पॉवेल आणि मोईन अली.