आयपीएलमधील 16 वर्षांची परंपरा संपुष्टात, लीगच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले
आयपीएल २०२४ ची सुरुवात झाली आहे. सुरुवाती पासूनच चुरशीचे सामने होताना दिसत आहे. आयपीएल दर सीजनमध्ये नवीन नवीन रेकॉर्ड करत आहे. आता यंदाच्या सीजनमध्ये १६ वर्षांची पंरपरा संपुष्टात आली आहे. कोणती आहे ती गोष्टी जी पहिल्यांदाच घडली आहे जाणून घ्या.
MI vs GT IPL 2024 : IPL 2024 चा 5 वा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात शुभमन गिल गुजरातचे नेतृत्व करत आहे. तर मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या आहे. आयपीएलमध्ये असे काही पाहायला मिळणार आहे जे गेल्या 16 हंगामात कधीही पाहिले नव्हते. 16 वर्षांपासून चालत आलेली परंपरा संपुष्टात आली आहे.
टीम इंडियाचा कर्णधार आणि मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आयपीएलच्या या हंगामात खेळाडू म्हणून खेळत आहे. आयपीएलच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल जेव्हा टीम इंडियाचा पूर्णवेळ कर्णधार या लीगमध्ये खेळाडू म्हणून खेळत असेल. आयपीएल 2008 मध्ये सुरू झाले. तेव्हापासून लीगच्या 16 व्या मोसमापर्यंत टीम इंडियाच्या पूर्णवेळ कर्णधाराने निश्चितपणे एका किंवा दुसऱ्या संघाचे नेतृत्व केले होते.
लीगच्या इतिहासात प्रथमच असे घडले
2008 मध्ये टीम इंडियाचा पूर्णवेळ कर्णधार एमएस धोनी होता. आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून तो चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत होता. 2017 च्या सुरुवातीला त्याने टीम इंडियाचे शेवटचे नेतृत्व केले होते. त्यानंतरच तो एक खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये खेळला. आयपीएल 2022 मध्ये त्याने खेळाडू म्हणून काही सामनेही खेळले. त्याचबरोबर धोनीनंतर विराट कोहली टीम इंडियाचा पूर्णवेळ कर्णधार झाला. भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार असताना तो आयपीएलमध्ये कर्णधार म्हणूनही खेळला होता.
रोहित शर्माचा मोठा विक्रम
रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला 5 वेळा चॅम्पियन बनवले. मुंबई इंडियन्सने आता हार्दिक पांड्याला कर्णधार केले आहे. 2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलमध्ये हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार असेल अशी घोषणा करण्यात आली होती.
मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन : हार्दिक पांड्या (कॅप्टन), रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, नमन धीर, टिम डेव्हिड, शम्स मुलानी, पियुष चावला, जेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि ल्यूक वुड.