‘अश्विनबद्दल बोलताना रोहितची जीभ घसरली’, जाणून घ्या नेमकं प्रकरण
टीम इंडियाचा ऑफस्पिनर आर. अश्विनने (Ravichandran Ashwin) सर्वाधिक कसोटी विकेट घेण्याच्या बाबतीत कपिल देवला मागे टाकताच कर्णधार रोहित शर्माने त्याचं कौतुक केलं आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) आर. अश्विनचे सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक म्हणून वर्णन केले.
मुंबई : टीम इंडियाचा ऑफस्पिनर आर. अश्विनने (Ravichandran Ashwin) सर्वाधिक कसोटी विकेट घेण्याच्या बाबतीत कपिल देवला मागे टाकताच कर्णधार रोहित शर्माने त्याचं कौतुक केलं आहे. रोहित शर्माने (Rohit Sharma) आर. अश्विनचे सर्वकालीन महान खेळाडूंपैकी एक म्हणून वर्णन केले. रोहित शर्माच्या या वक्तव्याशी अनेक दिग्गज सहमत असतील पण पाकिस्तानचा माजी कर्णधार राशिद लतीफ (Rashid Latif) या वक्तव्याशी अजिबात सहमत नाही. राशिद लतीफ म्हणाला की, रोहित शर्माने आपल्या खेळाडूमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी तसं वक्तव्य केलं असेल. तसेच लतीफने अश्विनला महान गोलंदाज मानण्यास नकार दिला. रशीदने त्याचं कारणदेखील सांगितलं आहे.
रशीद लतीफ म्हणाला की, अश्विन हा भारतीय परिस्थितीत अप्रतिम गोलंदाज आहे पण अनिल कुंबळे, बिशनसिंग बेदी आणि रवींद्र जडेजा सारखे खेळाडू सर्व परिस्थितींमध्ये चांगली कामगिरी करणारे खेळाडू आहेत. रशीद म्हणाला, “अश्विन महान गोलंदाज आहे यात शंका नाही. त्याने आपल्या गोलंदाजीत खूप वैविध्य आणले आहे. तो भारताचा सर्वोत्कृष्ट फिरकीपटू आहे यात शंका नाही पण परदेशी परिस्थितीत मी रोहितशी सहमत नाही. अनिल कुंबळे परदेशी भूमीवर हुशार होता. जडेजाने परदेशी भूमीवरही चांगली कामगिरी केली आहे. बिशनसिंग बेदी यांनीही परदेशी खेळपट्ट्यांवर आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.”
रोहितची जीभ घसरली : लतीफ
लतीफ पुढे म्हणाला, ‘भारतीय खेळपट्ट्यांवरील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास अश्विन उत्तम गोलंदाज आहे पण कदाचित रोहित शर्माची जीभ घसरली असेल. खेळाडूंमध्ये उत्साह आणि जोश भरण्याचा हा एक मार्ग आहे. अश्विनने भारतात 436 पैकी 306 विकेट घेतल्या आहेत आणि दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या 24 सामन्यांमध्ये 70 विकेट घेतल्या आहेत. इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाने अश्विनला एकाही कसोटी सामन्यात संधी दिली नाही, विशेष म्हणजे त्यावेळी तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता.
अश्विनची परदेशात जेमतेम कामगिरी
अश्विनने परदेशी भूमीवर 34 कसोटीत 126 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये श्रीलंका आणि वेस्ट इंडिजविरुद्ध त्याची गोलंदाजीची सरासरी चांगली आहे. ऑस्ट्रेलियात त्याने 42 विकेट घेतल्या आहेत पण गोलंदाजीची सरासरी 40 च्या पुढे आहे. अश्विनची कारकिर्दीतील गोलंदाजीची सरासरी 24.26 आहे.
इतर बातम्या
Shane Warne Death Case: कोण आहे परशुराम पांडे? मृत्यूच्या चार तास आधी शेन वॉर्नने घेतली होती गळाभेट