AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

RR vs GT : “आज त्याचा..” कॅप्टन शुबमन गिलला पराभव जिव्हारी, वैभवच्या शतकाबाबत स्पष्टच म्हणाला

Shubman Gill On Vaibhav Suryavanshi : गुजरातला 200 पेक्षा अधिक धावा करुनही पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे गुजरातचा कर्णधार शुबमन गिल याला हा पराभव जिव्हारी लागला. शुबमन वैभवच्या शतकी खेळीबाबत काय म्हणाला?

RR vs GT : आज त्याचा.. कॅप्टन शुबमन गिलला पराभव जिव्हारी, वैभवच्या शतकाबाबत स्पष्टच म्हणाला
Shubman Gill On Vaibhav SuryavanshiImage Credit source: IPL/BCCI
Follow us
| Updated on: Apr 29, 2025 | 2:52 AM

गुजरात टायटन्सला शुबमन गिल याच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्स विरूद्धच्या सामन्यात 8 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात गुजरातला 209 धावा करुनही जिंकता आलं नाही. गुजरातचा 15 व्या ओव्हरमध्ये पराभव झाला. गुजरातचा हा आयपीएल 2025 मधील तिसरा पराभव ठरला. राजस्थानच्या बॅटिंग दरम्यान शुबमनला पाठीच्या दुखापतीमुळे मैदानात येता आलं नाही. त्यामुळे शुबमनच्या जागी राशीद खान मैदानात आला. राजस्थानने सामना जिंकल्यानंतर शुबमनने प्रतिक्रिया दिली. यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनी पावरप्लेमध्येच सामना हिसकावला. तसेच गुजरातच्या खेळाडूंनी खूप चुका केल्या, हे शुबमनने मान्य केलं.

गुजरातचं कुठे चुकलं? कॅप्टन शुबमन गिल म्हणाला…

वैभव आणि यशस्वीच्या झंझावाती खेळीमुळे राजस्थानने पावरप्लेमध्ये बिनबाद 87 धावा केल्या. गुजरातला या दरम्यान विकेट घेण्याची संधी होती. मात्र ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे राजस्थानला विकेट मिळवता आला नाही. शुबमनने पराभवानंतर प्रतिक्रिया दिली. “त्यांनी आम्हाला पावरप्ले मध्येच सामन्यापासून दूर नेलं. याचं श्रेय त्यांना जातं. आम्ही 2-3 गोष्टी चांगल्या करु शकतो असतो. बाहेर बसून असं बोलणं सोपं असतं. मात्र सुरुवातीला आम्हाला विकेट घेण्याची संधी होती. आम्हाला टीम म्हणून एका बाजूवर काम करण्याची गरज आहे”, असं शुबमनने म्हटलं. गुजरातने राजस्थानच्या डावातील दुसर्‍या डावातच विकेट घेण्याची संधी गमावली. विकेटकीपर जोस बटलर याने डावातील दुसर्‍या ओव्हरमध्येच यशस्वी जयस्वाल याचा कॅच सोडला.

शुबमनने वैभव सूर्यवंशीच्या खेळीबाबत काय म्हटलं?

राजस्थानचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने या सामन्यात शतक ठोकून इतिहास घडवला. वैभवने अवघ्या 35 चेंडूत शतक केलं. वैभवने या खेळीत 11 षटकार आणि 7 चौकार लगावले. वैभव 101 धावा करुन आऊट झाला. शुबमनला वैभवच्या खेळीबाबत विचारण्यात आलं. यावर शुबमन म्हणाला की, “वैभवचा आज दिवस होता. तो जोरदार फटकेबाजी करत होता. त्याने त्याच्या दिवसाचा पूर्णपणे फायदा केला”, असं शबमनने म्हटलं.

हे सुद्धा वाचा

वैभवच्या शतकी खेळीमुळे राजस्थानचा विजय सोपा झाला. वैभवने केलेल्या 101 धावांच्या खेळीमुळे राजस्थानाला 210 धावांचा आव्हान हे 2 विकेट्स गमावून 15.5 ओव्हरमध्ये पूर्ण करता आलं. वैभव व्यतिरिक्त यशस्वी जयस्वाल आणि कर्णधार रियान पराग या दोघांनीही विजयात योगदान दिलं. यशस्वीने 70 आणि रियानने 32 धावांची नाबाद खेळी केली.

ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम
ऑपरेश सिंदूरदरम्यान पाकला चकवा, डमी फाइटर जेट धाडून भारताचा माइंड गेम.
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच
पाकची आणखी कोंडी, भारताची तालिबानशी हातमिळवणी, तहानलेला पाक व्याकूळच.
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.