Video : जेम्स अँडरसनचा करिअरच्या शेवटच्या टप्प्यात कहर, 7 विकेट्स घेत ‘दे धक्का’

जेम्स अँडरसन आपल्या क्रिकेट कारकिर्दितील शेवटची कसोटी खेळणार आहे. तत्पूर्वी त्याच्या गोलंदाजीची धार दिसून आली. काउंटी क्रिकेटमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीने भल्याभल्यांना घाम फोडला. त्यामुळे त्याच्या भेदक गोलंदाजीचा प्रचिती येत आहे.

Video : जेम्स अँडरसनचा करिअरच्या शेवटच्या टप्प्यात कहर, 7 विकेट्स घेत 'दे धक्का'
Follow us
| Updated on: Jul 02, 2024 | 9:01 PM

शेर बूढ़ा हो गया मगर शिकार करना नहीं भूलता.. ही म्हण जेम्स अँडरसनला तंतोतंत लागू होत आहे. जेम्स अँडरसन 41 वर्षांचा झाला आहे. मात्र त्याच्या गोलंदाजीची धार अजूनही कमी झालेली नाही. नुकतंच कसोटी क्रिकेटला रामराम ठोकण्याची घोषणा जेम्स अँडरसनने केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध लॉर्ड्सवर शेवटची कसोटी खेळणार आहे. तत्पूर्वी अँडरसनने काउंटी क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीची धार दाखवली. नॉटिंघमशरच्याविरुद्ध फक्त 35 धावा देत 7 गडी बाद केले. साउथ पोर्टमध्ये खेळत असलेल्या सामन्यात लँकशरने प्रथम फलंदाजी करताना 353 धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या नॉटिंघमशरच्या फलंदाजांना जेम्स अँडरसनने मैदानात टिकूच दिलं नाही. स्विंग आणि अचूक टप्प्याची गोलंदाजी करत फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. अँडरसनने पहिल्यांदा कर्णधार हसीब हमीदला बोल्ड केलं. त्यानंतर यंग विल, जो क्लार्क, जॅक हेन्स, लिंडन जेम्स यांना तंबूचा रस्ता दाखवला. अँडरसनने सुरुवातीच्या सात पैकी 6 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.

जेम्स अँडरसनच्या स्विंगपुढे फलंदाजांचा तसा निभाव लागत नाही. पण साउथ पोर्टमध्ये वेगळंच चित्र पाहायला मिळालं. नॉटिंघमशरच्या फलंदाजांना शॉर्ट आणि अचूक टप्प्याच्या गोलंदाजीने अडचण निर्माण झाली. त्याच्या गोलंदाजीचा सामना करताना खेळाडू चाचपडताना दिसले. जेम्स अँडरसनने 16 षटकात 3 निर्धाव षटकं टाकत 35 धावा देत 7 गडी बाद केले. बेलेने 11 षटकात 3 निर्धाव टाकत 22 धावा देत 2 ग़डी बाद केले. तर डेन पीटरसन धावचीत होत तंबूत परतला. नॉटिंघमशरने पहिल्या डावात सर्वबाद 126 धावा केल्या. त्यामुळे फॉलोऑनची नामुष्की ओढावली. आता 11 षटकात बिनबाद 31 धावा केल्या आहेत.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

नॉटिंगहॅमशायर (प्लेइंग इलेव्हन): हसीब हमीद (कर्णधार), बेन स्लेटर, विल यंग, ​​जो क्लार्क (विकेटकीपर), जॅक हेन्स, लिंडन जेम्स, लियाम पॅटरसन-व्हाइट, केल्विन हॅरिसन, ऑली स्टोन, डिलन पेनिंग्टन, डेन पॅटरसन.

लँकेशायर (प्लेइंग इलेव्हन): कीटन जेनिंग्स (कर्णधार), ल्यूक वेल्स, जोश बोहानन, जॉर्ज बेल, मॅथ्यू हर्स्ट (विकेटकीपर), जॉर्ज बाल्डरसन, ख्रिस ग्रीन, टॉम बेली, विल विल्यम्स, नॅथन लियॉन, जेम्स अँडरसन

Non Stop LIVE Update
वेलकम 'चॅम्पियन्स'... टीम इंडियाचं मुंबई विमानतळावर दणक्यात आगमन
वेलकम 'चॅम्पियन्स'... टीम इंडियाचं मुंबई विमानतळावर दणक्यात आगमन.
VIDEO : गर्दी नव्हे तर क्रिकेटचे दर्दी, मुंबईत क्रिकेटप्रेमींचा जनसागर
VIDEO : गर्दी नव्हे तर क्रिकेटचे दर्दी, मुंबईत क्रिकेटप्रेमींचा जनसागर.
मुंबईचा राजा रोहित शर्मा...मरीनसह वानखेडेवर एकच घोषणा, बघा व्हीडिओ
मुंबईचा राजा रोहित शर्मा...मरीनसह वानखेडेवर एकच घोषणा, बघा व्हीडिओ.
मॅच नसताना वानखेडे खचाखच भरलं, टीम इंडियाच्या स्वागतासाठी तुफान गर्दी
मॅच नसताना वानखेडे खचाखच भरलं, टीम इंडियाच्या स्वागतासाठी तुफान गर्दी.
गुजरात पाकिस्तानात येतं का? टीका करणाऱ्या ठाकरेंना शिरसाटांनी फटकारलं
गुजरात पाकिस्तानात येतं का? टीका करणाऱ्या ठाकरेंना शिरसाटांनी फटकारलं.
'लाडक्या बहिणीं'समोर अडचणींचा डोंगर, योजनेला दफ्तर दिरंगाईचा फटका
'लाडक्या बहिणीं'समोर अडचणींचा डोंगर, योजनेला दफ्तर दिरंगाईचा फटका.
राज्यात रिमझिम, तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस? हवामानखात्याकडून मोठ अपडेट
राज्यात रिमझिम, तुमच्या जिल्ह्यात कसा पाऊस? हवामानखात्याकडून मोठ अपडेट.
मनसे, वंचितची साथ सोडणारे वसंत मोरे ठाकरेंचा हात धरणार,या दिवशी प्रवेश
मनसे, वंचितची साथ सोडणारे वसंत मोरे ठाकरेंचा हात धरणार,या दिवशी प्रवेश.
टीम इंडियानं घेतली मोदींची भेट, दीड तास संवाद, काय झाली चर्चा?
टीम इंडियानं घेतली मोदींची भेट, दीड तास संवाद, काय झाली चर्चा?.
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाची विजयी मिरवणूक कुठून किती वाजता निघणार?
वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाची विजयी मिरवणूक कुठून किती वाजता निघणार?.