पैसे दिले नाहीत, जेम्स फॉकनरने पाकिस्तानची PSL लीग अर्ध्यावरच सोडली, हॉटेलमध्ये झुंबरवर बॅट, हेल्मेट फेकलं

ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू जेम्स फॉकनरने (james Faulkner) मध्यावरच पाकिस्तान सुपर लीगमधून माघार घेतली आहे. पैशांवरुन वाद झाल्यामुळे फॉकनरने हा निर्णय घेतला.

पैसे दिले नाहीत, जेम्स फॉकनरने पाकिस्तानची PSL लीग अर्ध्यावरच सोडली, हॉटेलमध्ये झुंबरवर बॅट, हेल्मेट फेकलं
james falukner ESPN CRICINFO
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 5:35 PM

लाहोर: ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू जेम्स फॉकनरने (james Faulkner) मध्यावरच पाकिस्तान सुपर लीगमधून माघार घेतली आहे. पैशांवरुन वाद झाल्यामुळे फॉकनरने हा निर्णय घेतला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने कराराचा आदर ठेवला नाही. उलट आपल्याशी खोटे बोलत राहिले असा आरोप जेम्स फॉकनरने केला आहे. याउलट PCB ने फॉकनरच्या वर्तनावर बोट ठेवलं आहे. फॉकनर खूप चुकीचं वागला. भविष्य़ात त्याच्यासाठी PSL चे दरवाजे बंद करु, असं पीसीबीने म्हटलं आहे. इमिग्रेशन अधिकाऱ्यांबरोबर फॉकनरने गैरवर्तन केल्याचा आरोप पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केला आहे. जेम्स फॉकनर क्वेटा ग्लॅडिएटर्ससाठी मागचे तीन सामने खेळला नाही. पीसीबी अधिकाऱ्यांबरोबर त्याची पैशांवरुन बोलणी सुरु होती. शुक्रवारी फॉकनर आणि पीसीबीमध्ये पैशांवरुन निर्माण झालेला हा वाद आणखींनच चिघळला.

बॅट झुंबरवर फेकली

बोलणी फिसकटल्यानंतर संतापाच्या भरात फॉकनरने बॅट आणि हेल्मेट लॉबीच्या बाल्कनीतून हॉटेलच्या झुंबरवर फेकून दिले. एअर पोर्टला जाण्यासाठी रुम सोडण्याआधी त्याने हॉटेलला नुकसानभरपाई भरुन दिली.

माफीचे दोन टि्वटस

फॉकनरने पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची माफी मागणारे दोन टि्वटस केले. “मी पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची माफी मागतो. दुर्देवाने मला दोन सामन्यांमधून माघार घ्यावी लागली. मी पीसीएल टी 20 लीग मध्यावरच सोडतोय. पैशांसदर्भात झालेल्या कराराचा पीसीबीने आदर केला नाही, असं त्याने टि्वटमध्ये म्हटलं आहे. मी पूर्ण वेळ इथे होतो. पण पीसीबीचे अधिकारी माझ्याशी खोटं बोलत राहिले” असं फॉकनरने टि्वटमध्ये म्हटलं आहे.

“स्पर्धा मध्यावरच सोडून जाणं दु:खद आहे. पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणण्यासाठी मला मदत करायची होती. इथे मोठ्या प्रमाणात युवा प्रतिभा आहे. फॅन्सही खूप सुंदर आहेत. पण पीसीबी आणि पीएसएलमध्ये मला अपमानास्पद वागणूक मिळाली. तुम्ही माझी परिस्थिती समजून घ्याल, अशी मी अपेक्षा करतो” असं फॉकनरने दुसऱ्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

आरोप निराधार

फॉकनरचे आरोप निराधार असल्याचं पीसीबीने म्हटलं आहे. उलट त्याच्याच वागणुकीत खोट आहे, असा आरोप पीसीबीने केला आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू काहीवेळा पीएसएलची आयपीएल बरोबर बरोबरी करतात. पण आयपीएल क्रिकेट जगतातील एक महागडी टी-20 लीग स्पर्धा आहे. आयपीएलमध्ये मिळणाऱ्या पैशाची PSL मध्ये मिळणाऱ्या पैशाबरोबर बरोबरीच होऊ शकत नाही.

james Faulkner leaves PSL after payment row with PCB threw his bat and helmet onto a hotel chandelier

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.