Jason Holder IPL 2022 Auction: होल्डरला खरेदी करण्यासाठी ऑक्शनमध्ये मारामारी, आठपट जास्त किंमतीला विक्री
Jason Holder Auction Price: जेसन होल्डर वेस्ट इंडिजचा ऑलराऊंडर क्रिकेटपटू आहे. त्यांच्यासाठी मोठी बोली अपेक्षित होती.
बंगळुरु: IPL Mega Auction आधी वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरच्या (Jason Holder) नावाची बरीच चर्चा होती. वेस्ट इंडिजच्या या ऑलराऊंडरवर सगळ्यांच्याच नजरा होत्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आधीच टि्वट करुन होल्डरवर नजर असल्याचे स्पष्ट केले होते. होल्डरसाठी RCB ने बोली लावली नाही. पण त्यावरुन अन्य संघांमध्ये जोरदार चुरस दिसून आली. CSK, मुंबई इंडियन्स, RR आणि लखनऊ सुपर जायंट्सने होल्डरसाठी बोली लावली. चार संघांनी होल्डरसाठी बोली लावली. पण यश मिळालं, लखनऊच्या संघाला. या टीमने होल्डरसाठी 8.75 कोटी रुपये मोजले. होल्डरची बेस प्राइस 1.5 कोटी रुपये होती. त्यातुलनेत आयपीएल ऑक्शनमध्ये त्याला आठपट जास्त पैसे मिळाले. आतापर्यंतच्या आयपीएल करीयरमध्ये होल्डर 26 सामन्यात खेळला असून त्याने 189 धावा केल्या आहेत तसेच 35 विकेट काढल्यात.
चेन्नइ सुपर किंग्जमधून होल्डरच्या आयपीएल करीयरला सुरुवात झाली होती. धोनीच्या टीमने होल्डरला 2013 मध्ये 20 हजार डॉलर्समध्ये विकत घेतलं होतं.
चेन्नईकडून खेळताना होल्डरने सहा सामने खेळले पण फक्त दोनच विकेट घेतल्या. हा खेळाडू हैदराबादकडूनही खेळला आहे. पण SRH ने त्याला फक्त एक सामना खेळवला. ज्यात त्याने 16 धावा केल्या. 2015 च्या आयपीएलमध्ये तो खेळला नाही. पण 2016 च्या आयपीएलमध्ये तो कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळला.