IPL 2023 मध्ये एका मोठ्या खेळाडूच्या मैदानातील लज्जास्पद कृतीमुळे वाद, BCCI ने लगेच घेतली Action

IPL 2023 : बीसीसीआयने लगेच थेट कारवाई केली. ओपनर जेसन रॉयने मैदानात एक अशी कृती केली, ज्याची बीसीसीआयने लगेच दखल घेत, शिक्षा सुनावली.

IPL 2023 मध्ये एका मोठ्या खेळाडूच्या मैदानातील लज्जास्पद कृतीमुळे वाद, BCCI ने लगेच घेतली Action
kkr ipl 2023
Follow us
| Updated on: Apr 27, 2023 | 1:37 PM

बंगळुरु : IPL 2023 मध्ये एका क्रिकेटरने मैदानात केलेल्या लज्जास्पद कृतीमुळे वाद निर्माण झालाय. त्यानंतर BCCI ने लगेच Action घेतली. कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमध्ये बुधवारी सामना झाला. केकेआरचा ओपनर जेसन रॉयने मैदानात एक अशी कृती केली, ज्याची बीसीसीआयने लगेच दखल घेत, शिक्षा सुनावली.

जेसन रॉयने रागाच्या भरात कृती केली, ज्याची किंमत त्याला चुकवावी लागली. जेसन रॉयच्या मॅच फी मधून 10 टक्के रक्कम कापण्यात आली आहे.

जेसन रॉयने काय चूक केली?

कोलकाता नाइट रायडर्सचा ओपनर जेसन रॉयला RCB चा वेगवान गोलंदाज विजयकुमार वैशाकने क्लीन बोल्ड केलं. बाद होताच जेसन रॉयने जमिनीवर पडलेल्या स्टम्पच्या बेल्सवर जोरात बॅट मारली. जेसन रॉयला त्याच्या या कृतीसाठी दंड ठोठावण्यात आलाय. क्रिकेट उपकरणाचा अपमान केल्याच्या प्रकरणात जेसन रॉयला दोषी धरण्यात आलय. जेसन रॉयने आयपीएल अचार संहितेच्या अनुच्छेद 2.2 च उल्लंघन केलय.

BCCI कडून लगेच कारवाई

आयपीएलकडून एक प्रेस रिलीज जारी करण्यात आलं. त्यात जेसन रॉयने आयपीएल आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.2 च उल्लंघन केल्यामुळे त्याला दंड ठोठावण्यात आल्याच म्हटलं आहे. अनुच्छेद 2.2 अंतर्गत लेव्हल 1 चा गुन्हा त्याने स्वीकार केलाय. आचारसंहितमध्ये स्तर 1 च उल्लंघन केल्यानंतर मॅच रेफ्ररीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. आयपीएल आचारसंहितेमध्ये अनुच्छेद 2.2 क्रिकेट उपकरण, कपडे, ग्राऊंड उपकरण यांच्याशी संबंधित आहे. दोघांनी रचला केकेआरच्या विजयाचा पाया

ओपनर जेसन रॉयच अर्धशतक आणि कॅप्टन नितीश राणाची वेगवान इनिंग यांच्या बळावर कोलकाता नाइट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीमवर मात केली. केकेआरने RCB ला 21 धावांनी हरवलं. कोलकाता नाइट रायडर्सने विजयासाठी 201 धावांच लक्ष्य दिलं होतं. आरसीबीकडून कॅप्टन विराट कोहलीने (37 चेंडूत 54 धावा) सर्वाधिक धावा केल्या. त्याने 8 विकेटवर 179 धावा केल्या. त्याशिवाय महिपाल लोमरोर (34) आणि दिनेश कार्तिक (22) यांनीच 20 पेक्षा जास्त धावा केल्या.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.