बुम बुम बुमराह, यॉर्कर किंगचा धमाका, कपिल देव यांचा महारेकॉर्ड ब्रेक, ऑस्ट्रेलियात कारनामा
Jasprit Bumrah Break Kapil Dev Record : जसप्रीत बुमराह याने ऑस्ट्रेलियात तिसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी इतिहास घडवला आहे. बुमराहने दिग्गज कपिल देव यांचा महारेकॉर्ड ब्रेक केला आहे.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पाचव्या दिवशी गाबा येथे इतिहास रचला आहे. ‘यॉर्कर किंग’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या बुमराहने मोठा कारनामा केला आहे. बुमराह टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलियात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे. बुमराहने माजी कर्णधार कपिल देव यांचा रेकॉर्ड उद्धवस्त करत ही कामगिरी केली आहे. बुमराहला ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाआधी हा महारेकॉर्ड आपल्या नावे करण्यासाठी 2 विकेट्सची गरज होती. बुमराहने मार्नस लबुशेन याला आऊट करत हा विक्रम केला.
टीम इंडियाच्या गोलंदाजांना या सामन्यातील पहिल्या डावात विकेट्ससाठी संघर्ष करावा लागत होता. तर दुसऱ्या बाजूला एकट्या बुमराहने ऑस्ट्रेलियाला 6 झटके दिले. बुमराहने पहिल्या डावात यासह आणखी एक विक्रम केला. बुमराहने ऑस्ट्रेलियात विकेट्सचं अर्धशतक पूर्ण केलं. तर त्यानंतर दुसऱ्या डावात दुसरी विकेट घेत इतिहास घडवला. बुमराहने दुसऱ्या डावात एकूण 3 विके्टस घेतल्या. बुमराहने उस्मान ख्वाजा, मार्नस लबुशेन आणि कॅप्टन पॅट कमिन्स या तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
ऑस्ट्रेलियात भारताकडून सर्वाधिक कसोटी विकेट्स
- जसप्रीत बुमराह : 53 विकेट्स
- कपिल देव : 51 विकेट्स
- अनिल कुंबळे : 49 विकेट्स
- आर अश्विन : 40 विकेट्स
- बिशन सिंह बेदी : 35 विके्टस
जसप्रीत बुमराहकडून कपिल देव यांचा रेकॉर्ड ब्रेक
Jasprit Bumrah is now the leading wicket-taker for India in Test matches in Australia, achieving this with the lowest average. 🫡
– 52 Jasprit Bumrah (Avg 17.21) – 51 Kapil Dev (24.58) – 49 A Kumble (37.73) – 40 Ashwin (42.42) – 35 B Bedi (27.51)
— Vipin Tiwari (@Vipintiwari952) December 18, 2024
तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेझलवूड.
तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नीतीश कुमार रेड्डी.