Ind vs SA : रबाडाच्या गोलंदाजीवर बुमराहचा शानदार षटकार, पत्नी संजनाची रिअॅक्शन व्हायरल
भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा पहिला डाव 202 धावांवर आटोपला.
डरबन : भारत आणि दक्षिण आफ्रिका (Ind vs SA) यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना जोहान्सबर्ग येथे खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा पहिला डाव 202 धावांवर आटोपला. कर्णधार केएल राहुलने अर्धशतकी खेळी खेळली. मात्र टीम इंडियाची टॉप ऑर्डर अपयशी ठरली. राहुल वगळता एकाही फलंदाजाला क्रीजवर फार काळ टिकाव धरता आला नाही. पण खालच्या फळीतील फलंदाजांनी काही चांगले शॉट्स खेळत संघाची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. (Jasprit Bumrah Hits six to Kagiso Rabada, Sanjana Ganesan’s Reaction viral)
सामन्याच्या 62 व्या षटकात जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या चेंडूवर षटकार मारून सर्वांनाच आश्चर्यचकित केले. या षटकात बुमराहने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. रबाडाने ओव्हरचा तिसरा चेंडू शॉर्ट टाकला, पण बुमराह आक्रमक मूडमध्ये दिसला. रबाडाच्या या चेंडूवर त्याने हुक शॉट लावला आणि चेंडू थेट सीमापार पाठवला.
बुमराहचा हा षटकार पाहून स्टँडमध्ये बसलेली त्याची पत्नी संजना गणेशनही थक्क झाली. ती टाळ्या वाजवताना दिसली. संजना हसत होती. बुमराहच्या सिक्सरवर संजनाची रिअॅक्शन व्हायरल होत आहे. बुमराहने या खेळीत 11 चेंडूत 14 धावा केल्या. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला.
रबाडाचा शॉर्ट बॉल, आक्रमक मूडमध्ये असलेल्या बुमराहचा हुक शॉट, 6 धावा वसूल बायको संजना गणेशन खूश!#INDvsSA #JaspritBumrah #SAvsIND #SanjanaGanesan pic.twitter.com/ol9t2rHotj
— अक्षय चोरगे (Akshay Chorge) (@AkshayChorge1) January 4, 2022
भारताचा पहिला डाव
दरम्यान, पहिल्या दिवसाच्या खेळावर दक्षिण आफ्रिकेने वर्चस्व गाजवले. दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याआधी भारताला एक धक्का बसला. नियमित कर्णधार विराट कोहलीने पाठिच्या दुखण्यामुळे कसोटी खेळणार नसल्याचे जाहीर केले. त्याच्याजागी बदली कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि मयंक अग्रवाल या सलामीच्या जोडीने आश्वासक सुरुवात केली. त्यानंतर चेतेश्वर पुजारा (3) आणि अजिंक्य रहाणे (0) आल्यापावली माघारी परतले. तीन वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ओलिवरने दोघांची विकेट काढली.
हनुमा विहारीने कर्णधार राहुलसोबत मिळून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण विहारी (20) धावांवर बाद झाला. केएल राहुलचे अर्धशतक (50) आणि अश्विनच्या (46) धावा या दोघांचा अपवाद वगळता भारताकडून कोणीही चांगली खेळी करु शकले नाही. मोठ्या भागीदाऱ्या झाल्या नाहीत, परिणामी भारताचा डाव 202 धावात आटोपला. दक्षिण आफ्रिकेचा युवा गोलंदाज मार्को यान्सिनने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. ओलिवर आणि रबाडाने प्रत्येकी तीन-तीन विकेट घेतल्या.
इतर बातम्या
IPL 2022: आशिष नेहरा IPL संघाचा मुख्य प्रशिक्षक होणार, गॅरी कर्स्टनवरही मोठी जबाबदारी!
IND vs SA: पहिला दिवस दक्षिण आफ्रिकेचा, भारत बॅकफूटवर
IND vs SA: कसोटी जिंकण्यासाठी बुमराह, सिराज, शामी आणि ठाकूर करीयरमधला सर्वोत्तम स्पेल आज टाकतील?
(Jasprit Bumrah Hits six to Kagiso Rabada, Sanjana Ganesan’s Reaction viral)