IPL 2023 : Mumbai Indians ला झटका, एका मोठ्या खेळाडूसंदर्भात वाईट बातमी

IPL 2023 : टीम इंडियाच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. फक्त टीम इंडियाच नाही, IPL 2023 चा सीजन सुरु होण्याआधी पाचवेळची चॅम्पिनयन मुंबई इंडियन्सच टेन्शनही वाढलं आहे.

IPL 2023 : Mumbai Indians ला झटका, एका मोठ्या खेळाडूसंदर्भात वाईट बातमी
Mumbai indians
Follow us
| Updated on: Feb 27, 2023 | 8:46 AM

IPL 2023 : मागच्या वर्षभरापासून टीम इंडिया आपल्या अनेक खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. टीम इंडियाच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. फक्त टीम इंडियाच नाही, IPL 2023 चा सीजन सुरु होण्याआधी पाचवेळची चॅम्पिनयन मुंबई इंडियन्सच टेन्शनही वाढलं आहे. या टेन्शनच कारण आहे जसप्रीत बुमराह. टीम इंडियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागच्या 7 महिन्यापासून फिटनेसच्या समस्येने त्रस्त आहे. पुढच्या काही काळासाठी सुद्धा चांगले संकेत मिळत नाहीयत.

क्रिकबजच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहला पूर्णपणे फिट होऊन मैदानावर परतण्यासाठी आणखी वेळ लागू शकतो. बुमराह पाठीच्या स्ट्रेस फ्रॅक्चरच्या दुखापतीने त्रस्त आहे. बुमराह अजूनपर्यंत पूर्णपणे फिट झालेला नाहीय. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या सूत्रांनुसार, बुमराहच आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये खेळणं कठीण दिसतय.

मागच्या 7 महिन्यांपासून पाठदुखीने हैराण

मागच्यावर्षी जुलै महिन्यात इंग्लंड दौऱ्यात जसप्रीत बुमराहला पाठदुखीचा त्रास सुरु झाला होता. त्यामुळे तो आशिया कपमध्ये खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलिया विरुद्ध T20 सीरीजमध्ये त्याने पुनरागमन केलं होतं. पण पुनरागमनाचा हा निर्णय घाईगडबडीत घेतल्याच सिद्ध झालं. कारण दोन सामन्यानंतर बुमराहची दुखापत पुन्हा बळावली. त्यामुळे तो टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये सुद्धा खेळू शकला नाही.

आधी नाव जाहीर, मग माघार

जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेविरुद्ध वनडे सीरीजसाठी जसप्रीत बुमराहचा टीममध्ये समावेश करण्यात आला होता. पण सीरीज सुरु होण्याच्या एकदिवस आधी बुमराह खेळणार नसल्याच स्पष्ट झालं. त्यानतंर तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये खेळेल अशी शक्यता होती. पण हे सुद्धा घडलं नाही. संपूर्ण बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या चारही सामन्यांमध्ये बुमराह खेळणार नाहीय.

IPL-WTC Final मध्ये खेळणं कठीण

31 मार्चपासून आयपीएल 2023 चा सीजन सुरु होतोय. बुमराह आपली फ्रेंचायजी मुंबई इंडियन्सकडून पुनरागमन करेल, असा सर्वांचा अंदाज होता. पण या शक्यतेला सुद्धा ग्रहण लागताना दिसतय. फक्त आयपीएलच नाही, तर इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये सुद्धा त्याच पुनरागमन कठीण दिसतय. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल होईल. आता लक्ष्य वर्ल्ड कप

जसप्रीत बुमराह मागच्या काही आठवड्यांपासून NCA मध्ये दुखापतीवर मात करण्यासाठी रिहॅब प्रोसेसमधून जात आहे. अजूनपर्यंत अपेक्षेनुसार, काही घडलेलं नाही. बुमराह काही दिवसांपूर्वी NCA मध्ये सराव करताना दिसला होता. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी बुमराहला तयार करणं हे BCCI, टीम इंडिया मॅनेजमेंट आणि NCA च लक्ष्य आहे.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.